Saturday, May 21, 2022
Home भारत राजस्थानात पक्षाचं चिंतन शिबीर सुरु, फेसबुक लाइव्हद्वारे नेत्याची काँग्रेसला सोडचिठ्ठी

राजस्थानात पक्षाचं चिंतन शिबीर सुरु, फेसबुक लाइव्हद्वारे नेत्याची काँग्रेसला सोडचिठ्ठी


चंदीगड : राजस्थानातील उदयपूरमध्ये काँग्रेसचं तीन दिवस नवचिंतन शिबीर सुरु आहे. दुसरीकडे पंजाबमधील वरिष्ठ काँग्रेस नेते सुनील जाखड यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. सुनील जाखड यांनी फेसबुक लाइव्ह करत पक्ष सोडत असल्याची घोषणा केली आहे. जाखड यांच्यावर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या शिस्तपालन समितीनं दोन वर्षांसाठी निलंबनाची कारवाई केली होती. पंजाब विधानसभा निवडणुकीपासून सुनील जाखड आणि काँग्रेसमध्ये मतभेद निर्माण झाले होते. फेसबुक लाइव्ह करत सुनील जाखड यांनी गुड बाय काँग्रेस आणि या प्रकारे चिंतन शिबीर घेऊन काही होणार नाही, असं म्हटलं. काँग्रेस पक्षाचं ज्यांनी नुकसान केलं त्यांना नोटीस द्यायला हवी होती, असं वक्तव्य सुनील जाखड यांनी केलं आहे. माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासंदर्भात ट्विट केलं आहे.
ना पोलिसांची भीती, ना शिवसैनिकांचा अडसर; राणा दाम्पत्याने ‘या’ कारणांमुळे दिल्ली गाठली?
चिंतन शिबीर औपचारिकता
सुनील जाखड यांनी फेसबुक लाइव्ह करत काँग्रेसचं उदयपूरमधील शिबीर ही औपचारिकता आहे, असं म्हटलं. काँग्रेसला चिंतन शिबीर नाही तर चिंता शिबीराची गरज आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेसला ३९० मतदारसंघात दोन हजार मत मिळाली आहेत. गोवा आणि उत्तराखंडमध्ये सरकार विरोधात लाट असूनही पक्षाला विजय मिळवता आला नाही. काँग्रेसला या गोष्टीवर विचार करण्याची गरज आहे. या गोष्टींसाठी पक्ष नेतृत्त्वाला दोष देता येणार नाही, इतर अनेक उणीवा आहेत, असं जाखड म्हणाले आहेत.

राहुल गांधींचं कौतुक, हरीश रावतांवर टीका
सुनील जाखड यांनी यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं कौतुक केलं आहे. राहुल गांधी यांनी हुजरेगिरी करणाऱ्यांपासून सावध राहायला हवं, असं जाखड म्हणाले. याशिवाय यावेळी त्यांनी पंजाब काँग्रेस प्रभारी हरीश रावत आणि अंबिका सोनी यांच्यावर टीका केली.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या शिस्तपालन समितीनं सुनील जाखड यांच्यावर दोन वर्षांसाठी निलंबनाची कारवाई २६ एप्रिलला केली होती. जाखड यांनी माजी मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी यांच्यावर टीका केली होती. पंजाबमधील विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या पराभवाला चरणजीतसिंह चन्नी जबाबदार असल्याची टीका केली होती.
‘मी जर पूर्वीचा जितेंद्र आव्हाड असतो तर…’, केतकीच्या पोस्टनंतर आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया
माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी ट्वीट करत काँग्रेसनं सुनील जाखड यांना गमावयला नको. काही मतभेद असतील तर ते चर्चा करुन सोडवता येतील, असं सिद्धू म्हणाले.

‘पवारांवरील टीका म्हणजे विकृती’; केतकी चितळेच्या पोस्टवरुन जितेंद्र आव्हाड बरसले!अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#रजसथनत #पकषच #चतन #शबर #सर #फसबक #लइवहदवर #नतयच #कगरसल #सडचठठ

RELATED ARTICLES

IPL 2022 : दोन कारणांमुळे दिल्ली कॅपिटल्स अडचणीत, आता चूक झाली तर खेळ समाप्त

मुंबई, 21 मे : आयपीएल 2022 (IPL 2022) मधील साखळी फेरीचे सामने रविवारी संपणार आहेत. शनिवारी मुंबई इंडियन्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स (Mumbai Indians...

मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 180, वडाळा आरटीओ, विजयनगर

BMC Election 2022 Ward 180, Wadala RTO, Vijayanagar : मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 180  हा वडाळा आरटीओ, विजयनगर...

चार वर्षांपासून फुटकी दमडीही कमवत नाहीये; आर. माधवननं म्हणून सोडला देश?

या सर्व प्रवासात एक मुद्दा महत्त्वाचा की, माधवनला मागील 4 वर्षांपासून पैसे कमवण्यात सपशेल अपयश आलं आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे...

Most Popular

फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा : जोकोव्हिच जेतेपदाचा दावेदार -सोमदेव | French Open tennis tournament Djokovic title contender injury Raphael Nadal Less ysh 95

संकेत कुलकर्णी पुणे : दुखापतीमुळे राफेल नदाल फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत खेळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे नोव्हाक जोकोव्हिच जेतेपदाचा दावेदार असल्याचे मत भारताचा माजी...

Amazon Tablet: अवघ्या ५ हजार रुपये सुरुवाती किंमतीत Amazon चे शानदार टॅबलेट्स लाँच, जाणून घ्या फीचर्स

नवी दिल्ली : Amazon Fire 7 Tablet Launched: Amazon ने आपल्या नवीन टॅबलेटला लाँच केले आहे. कंपनीला कमी किंमतीत दमदार टॅबलेट्ससाठी ओळखले जाते....

मारियुपोलमध्ये रशियाला शरण आलेले युक्रेनी सैनिक युद्धकैदी; झिल्येन्स्की यांनी केली महत्त्वाची मागणी

वृत्तसंस्था, कीव्हः मारियुपोलमधील पोलाद प्रकल्पावर रशियाच्या हल्ल्यापासून नागरिकांचे संरक्षण करताना शरण आलेल्या युक्रेनी सैनिकांना युद्धकैदी ठरवण्यात आले आहे. या सैनिकांना आंतरराष्ट्रीय मदत मिळावी...

Mumbai Water Reduction : मुंबईतील ‘या’ भागांत चार दिवस पाणी कपात

Mumbai Water Reduction : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी. मुंबईत 24 मे ते 27 मे दरम्यान, सकाळी 11 ते दुपारी...

Mumbai : Sanjay Raut CM Uddhav Thackeray यांच्या भेटीला, राज्यसभेच्या जागेबाबच खलंबतं ABP Majha

<p>Mumbai : Sanjay Raut CM Uddhav Thackeray यांच्या भेटीला, राज्यसभेच्या जागेबाबच खलंबतं ABP Majha</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

मोबाइल स्क्रिनवर दिसेल कॉलरचं KYC आधारित नाव, TRAI कडून नव्या सिस्टमवर काम सुरू

नवी दिल्ली, 21 मे : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) लवकरच एका नव्या सिस्टमवर काम सुरू करणार आहे. या सिस्टममध्ये कॉलरचे अर्थात कॉल करणाऱ्या...