नव्या रुग्णांच्या आकड्याने 5000 चा टप्पा पार केला आहे. राज्यातील एकूण नव्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतच आहेत (Mumbai new corona cases). त्यामुळे आता चिंता अधिक वाढली आहे (Maharashtra new corona cases increased).
राज्यात आज गुरुवारी 5,218 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 2,479 रुग्ण मुंबईतील आहेत. तसंच एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. पीटीआयने याबाबत ट्विट केलं आहे.
24 तासांतच राज्यातील नव्या कोरोना रुग्णांचा आकडा 5000 पार गेला आहे. बुधवारी 3,260 नव्या रुग्णांची नोंद होती. त्यापैकी 1,648 मुंबईत होते. काल तीन रुग्णांचा मृत्यूही झाला होता.
Maharashtra reports 5,218 new coronavirus infections on Thursday including 2,479 in Mumbai and one death: health department. PTI KK KRK
— Press Trust of India (@PTI_News) June 23, 2022
कोरोनाची ही वाढती आकडेवारी चिंताजनक आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध राहायला हवं. कोरोना नियमांचं पालन करायला हवं. स्वतःचा बचाव करण्यासाठी बंधनकारक नसला तरी मास्क वापरायला हवा.
तुमच्या शहरातून (मुंबई)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#रजकय #भकपत #करन #बलसट #तसतच #रजयतल #रगणच #आकड #पर