Monday, July 4, 2022
Home लाईफस्टाईल राजकीय भूकंपात कोरोना ब्लास्ट! 24 तासांतच राज्यातील रुग्णांचा आकडा 5000 पार

राजकीय भूकंपात कोरोना ब्लास्ट! 24 तासांतच राज्यातील रुग्णांचा आकडा 5000 पार


मुंबई, 23 जून : महाराष्ट्र सध्या राजकीय भूकंपामुळे हादरलेला आहे. त्यातच आता कोरोनाचाही ब्लास्ट झाला आहे (Maharashtra political crisis). कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असताना राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थिती ढासळली आणि त्यातच कोरोनालाही आपले हातपाय पसरायला मुभा मिळाली (Maharashtra coronavirus update). 24 तासांतच नव्या रुग्णांच्या आकड्याने 5000 चा टप्पा ओलांडला आहे.
राज्यात आज गुरुवारी 5,218 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. बुधवारी ही संख्या 3,260 होती. राज्यातील एकूण नव्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतच आहेत. मुंबईत काल बुधवारी 1,648 नवे रुग्ण होते, ज्यांची संख्या आज गुरुवारी 2,479 वर पोहोचली आहे. म्हणजे राज्यातील एकूण नव्या रुग्णांपैकी जवळपास निम्मे रुग्ण एकट्या मुंबईतच आहे. आज एका रुग्णाच्या मृत्यूचीही नोंद आहे.

राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेतील बंडखोरीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. त्यामुळे कित्येक नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. यावेळी सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी झाली. शिवाय एकाच्याही चेहऱ्यावर मास्क नव्हता. त्याचा परिणाम म्हणून की काय  राज्यात कोरोनाचाही भयंकर उद्रेक झाला आहे. कोरोनाचा हादरवणारा आकडा समोर आला आहे.
हे वाचा – सावधान! कोरोनाच्या दहशतीत देशात आणखी 3 खतरनाक Virus; तज्ज्ञांनी केलं Alert
त्यामुळे आता महाराष्ट्र राजकीय आणि आरोग्य अशा दुहेरी संकटात अडकल्याचं दिसतं आहे. त्यामुळे नागरिकांनो आता तुमची सुरक्षा तुमच्याच हातात आहे. कोरोनापासून तुम्हीच तुमचा बचाव करायला हवा. कोरोना नियमांचं पालन करायला हवं. स्वतःचा बचाव करण्यासाठी बंधनकारक नसला तरी मास्क वापरायला हवा आणि सोशल डिस्टन्सिंगही राखायला हवं.
राज्यपाल, मुख्यमंत्र्यांनाही कोरोना
राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याचे बोलले जात आहे. राज्यपाल आणि मुख्यमंत्री मागच्या 5 दिवसांपूर्वी एका कार्यक्रमानिमीत्त भेटले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही राजभवनावर जात राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या त्यांचा फोटोही व्हायरल झाला होता. दरम्यान दोघे एकमेकांना मास्क न घालता भेटले होते. त्यांना इथेच कोरोनाची लागण झाली, मुख्यमंत्री-राज्यपाल विथाऊट मास्क भेटल्याने ते एकमेकांना कोरोना देऊन गेले असल्याची चर्चा होत आहे.

तुमच्या शहरातून (मुंबई)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#रजकय #भकपत #करन #बलसट #तसतच #रजयतल #रगणच #आकड #पर

RELATED ARTICLES

July Born Baby Names: तुमच्या बाळांना द्या ‘ही’ सर्वात हटके अन् गोंडस नावं

मुंबई, 4 जुलै: आपल्या बाळाचं नाव (Baby Names) हटके असावं, असं प्रत्येकाला वाटतं. त्याचं नाव सुंदर असावं, त्याचा अर्थही चांगला असावा आणि ते नाव प्रत्येकाला...

गुजरातसोबत महाराष्ट्रात निवडणुका होतील, संजय राऊतांचा दावा

मुंबई, 04 जुलै :  'आता ही तात्पुरती केलेली व्यवस्था आहे. ही कायम स्वरुपाची नाही. भाजपला शिवसेना फोडायची होती. त्यांनी फोडून दाखवली. फुटीर गटाला...

Most Popular

…त्यावेळी ब्रिटीशांना जसा आनंद झाला तसा मविआची सत्ता गेल्यावर राज्यपालांना झालाय : शिवसेना

Saamana Shiv Sena Article : काल शिंदे-फडणवीस सरकारच्या अग्निपरीक्षेच्या पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड झाली....

Flu Symptoms : कोरोना आहे की व्हायरल फ्लू? कसा ओळखाल? जाणून घ्या…

Flu Symptoms : देशात एकीकडे कोरोना संसर्ग (Coronavirus) अद्याप कायम असून वाढताना दिसत आहे, तर दुसरीकडे पावसाळा सुरु...

TOP 25 : टॉप 25 न्यूज बुलेटिन : 04 जुलै 2022 : ABP Majha

<p>TOP 25 : टॉप 25 न्यूज बुलेटिन : 04 जुलै 2022 : ABP Majha</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

Sri Lanka Fuel Crisis : श्रीलंकेमध्ये आजपासून सर्व शाळा आठवड्याभरासाठी बंद

Sri Lanka Fuel Crisis : श्रीलंकेमध्ये वीज टंचाईच्या पार्श्वभूमीवर आजपासून आठवडाभर सर्व शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. श्रीलंकेमधील...

Workout Tips: फक्त २ मिनिटांच्या ‘या’ व्यायामाने स्वतःला ठेवा तंदुरुस्त

मुंबई, 4 जुलै: शरीराला तंदुरुस्त (Fit) ठेवण्यासाठी आणि चरबी कमी (Fat Lose) करण्यासाठी व्यायाम (Exercise) ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे, हे आपणा सर्वांना...

‘हे’ दोन खेळाडू टीम इंडियाच्या कॅप्टन्सीचे दावेदार, रोहित शर्माचा पत्ता कट होणार?

मुंबई : रोहित शर्माकडे कॅप्टन्सी जास्त वेळ राहणार नाही अशी एक चर्चा सध्या सुरू झाली आहे. टीम इंडियामध्ये रोहित शर्माला कॅप्टन्सीसाठी टफ देणारे...