राज्यात गुरुवारी 5,218 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. बुधवारी ही संख्या 3,260 होती. राज्यातील एकूण नव्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील आहेत. मुंबईत बुधवारी 1,648 नवे रुग्ण होते, ज्यांची संख्या गुरुवारी 2,479 वर पोहोचली आहे. म्हणजे राज्यातील एकूण नव्या रुग्णांपैकी जवळपास निम्मे रुग्ण एकट्या मुंबईतच आहे. गुरुवारी एका रुग्णाच्या मृत्यूचीही नोंद आहे. पावसाळ्यात आधीच साथीचे रोग बळावत असताना कोरोना वाढत असल्याने चिंता वाढली आहे. शिवाय राज्यात अस्थिर राजकीय स्थिती निर्माण झाल्यास आरोग्य व्यवस्था कशा पद्धतीनं कार्य करेल याबाबतही काळजी व्यक्त केली जात आहे.
सरकारकडून मास्क सक्ती नसली तरी आपल्या आणि कुटुंबाच्या काळजीखातर घराबाहेर पडताना मास्क वापरणे गरजेचे आहे. आयुष मंत्रालयाने दिलेल्या कोरोना मार्गदर्शत तत्वांचे पुन्हा कडक पालन करण्याची गरज आहे. एखाद्या छोट्याशा चुकीमुळे कोरोना आपल्या घरात प्रवेश करू शकतो आणि त्यामुळे होणारा त्रास काय असतो, हे आत्तापर्यंतच्या दोन कोरोना लाटांमध्ये कळाले आहे. राज्यातील नागरिकांनी कोरोनाबाबत आत्तापासूनच जागृकता दाखवल्यास वाढणारा कोरोना रुग्णांचा आकडा आटोक्यात येऊ शकतो. मास्कला पर्याय नसून नियमित हात स्वच्छ करत राहण्याची गरज आहे. कोरोनाला दूर ठेवण्यासाठी स्वच्छता राखणे महत्त्वाचे आहे.
कोरोनाला होऊ नये म्हणून हे उपाय करा –
रोज कोमट पाणी प्या. दिवसभरात जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा.
अर्धा चमचा हळद पावडर 150 मिली कोमट दुधात दिवसातून एकदा किंवा दोनदा घ्या.
तुम्ही जे काही खात आहात ते ताजे आणि सहज पचणारे असावे, याची काळजी घ्या.
तुमच्या रोजच्या आहारात यापैकी काही प्रमुख मसाल्यांचा वापर करा. यामध्ये हळद, सुंट, जिरे, धणे पावडर आणि लसूण यांचा समावेश आहे.
हे वाचा – घरातील जुन्या झाडूच्याबाबतीत या चुका टाळा; वास्तुशास्त्रात सांगितलेत उपाय
तुमच्या आहारात ताजा आवळा, आवळ्याचा जाम, लोणची, चटणी किंवा आवळा फळ यांचा समावेश करा.
हळद आणि मीठ टाकून गुळण्या करा.
नाकाच्या दोन्ही नाकपुड्यांमध्ये अनु तेल किंवा खोबरेल तेलाचे एक-दोन थेंब रोज टाकावे.
दिवसभरात एकदा तोंडात थोडे खोबरेल तेल घालून नंतर तोंडात सगळी फिरवून थुंकावे. नंतर कोमट पाण्याने तोंड स्वच्छ धुवा.
पाण्यात पुदिन्याची ताजी पाने किंवा ओवा आणि कापूर टाकून वाफ घेऊ शकता.
दररोज किमान 30 मिनिटे योग, प्राणायाम आणि ध्यान करण्याचा प्रयत्न करा.
हे वाचा – कारल्यामुळे Diabities रुग्णांना होतो ‘हा’ फायदा, लगेच आहारात करा समावेश
रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी –
याशिवाय रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तुम्ही या उपायांचा अवलंब करू शकता.
रोज 10 ग्रॅम च्यवनप्राश खाऊ शकता. मधुमेही रुग्ण साखरमुक्त च्यवनप्राश घेऊ शकतात.
आले किंवा सुंठ, काळी मिरी, दालचिनी, मोठी वेलची आणि मनुके घालून काढा बनवा आणि दिवसातून एक किंवा दोनदा घ्या.
रोज ताजी, हंगामी, रसाळ आणि लिंबूवर्गीय फळे खा. जसे की मोसंबी, संत्री, लिंबू इ.
साखरेऐवजी गूळ खा.
रोज पौष्टिक आहार घ्या.
राज्यपाल, मुख्यमंत्र्यांनाही कोरोना –
राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. राज्यपाल आणि मुख्यमंत्री मागच्या 5 दिवसांपूर्वी एका कार्यक्रमानिमीत्त भेटले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही राजभवनावर जात राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या त्यांचा फोटोही व्हायरल झाला होता. दरम्यान, दोघे एकमेकांना मास्क न घालता भेटले होते. त्यांना इथेच कोरोनाची लागण झाली, मुख्यमंत्री-राज्यपाल विथाऊट मास्क भेटल्याने ते एकमेकांना कोरोना देऊन गेले असल्याची चर्चा होत आहे.
तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#रजकय #घडमड #पवसळयचय #तडवर #करन #बळवतय #नषकळजपण #यईल #अगलट