Saturday, July 2, 2022
Home क्रीडा रवी शास्त्री लवकरच भारतीय संघाबाहेर होणार; BCCI अधिकाऱ्यांनी दिली माहिती

रवी शास्त्री लवकरच भारतीय संघाबाहेर होणार; BCCI अधिकाऱ्यांनी दिली माहिती


नवी दिल्ली: भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री लवकर जबाबदारीतून मुक्त होणार आहेत. या वर्षी युएईमध्ये आयसीसी टी-२० वर्ल्डकपचे आयोजन होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कोच शास्त्री यांचा ही अखेरची स्पर्धा असेल.

वाचा- भारताला आणखी एक ‘गोल्ड’; अमेरिका आणि ब्राझीलला मागे टाकले

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक शास्त्री यांचा कार्यकाळ या वर्षी होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपनंतर संपणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बोर्ड त्याचा करार पुढे वाढवण्यात येणार नाही. शास्त्रींच्या जागी राहुल द्रविडचे नाव मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आहे. नुकत्याच झालेल्या श्रीलंकेच्या दौऱ्यात भारताच्या मर्यादीत षटकाच्या संघासोबत प्रशिक्षक म्हणून राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख राहुल द्रविड गेले होते.

वाचा- ऑलिम्पिक इतिहासातील एकमेव क्रिकेट मॅच; या देशाने जिंकले होते सुवर्णपदक

शास्त्री यांचा करार संपुष्ठात आल्यानंतर ते संघापासून वेगळे होतील. बीसीसीआयच्या काही अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शास्त्रींना देखील आता या पदावरून पायउतार व्हायचे आहे. सध्या भारतीय संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर आयपीएलचा उर्वरीत हंगाम झाल्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी-२० वर्ल्डकप होईल.

वाचा- टोकियोमध्ये पदक जिंकायचे होते म्हणून…पण पुढच्या वेळी भाला ९० मीटरच्या पुढे जाणार

रवी शास्त्री २०१४ साली डायरेक्टर म्हणून संघाशी जोडले गेले होते. २०१६च्या टी-२० वर्ल्डकपपर्यंत ते या पदावर होते. त्यानंतर माजी फिरकीपटू अनिल कुंबळे यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. पण कोहली आणि कुंबळे यांच्यात वाद झाल्याने २०१७च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर कुंबळे यांनी राजीनामा दिला होता. या सर्व घटनेनंतर शास्त्री संघाचे मुख्य प्रशिक्षक झाले होते.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#रव #शसतर #लवकरच #भरतय #सघबहर #हणर #BCCI #अधकऱयन #दल #महत

RELATED ARTICLES

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

2 July 2022 Important Events : 2 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

2 July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

‘उद्धव ठाकरे हे फार मोठे नेते, योग्य वेळ आल्यावर उत्तर देऊ’, केसरकरांचे चिमटे

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी पणजी, 1 जुलै : शिवसेनेच्या शिंदे गटाने नेते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी आज पत्रकार परिषद घेतली. शिंदे गटाचा नेता आज...

Most Popular

रश्मिका मंदानाने देसी अवताराला लावला ग्लॅमरचा तडका, गुलाबी साडीतील फोटो पाहून चाहते घायाळ

'पुष्पा' चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनामनात घर करणारी अभिनेत्री म्हणजे रश्मिका. रश्मिकाच्या दमदार अभिनयानेच नाही तर तिच्या सौंदर्याचे अनेक चाहते पाहायला मिळतात. ती सध्या सोशल...

नुपूर शर्मांना खडसावलं, करोनाकाळात गुजरात सरकारला खडेबोल, न्यायमूर्ती पर्दीवाला पुन्हा चर्चेत

सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती पर्दीवाला यांनी उदयपूर हत्यांकांडाला नुपूर शर्मा यांना जबाबदार ठरवलं आहे. नुपूर शर्मा यांनी टीव्ही वाहिनीवरुन देशाची माफी मागावी, असं कोर्टानं...

इथं ठाकरेंचं, इस्त्राइलमध्ये बेनेट सरकार पडले, साडेतीन वर्षात पाचव्यांदा निवडणुकीची रणधुमाळी

इस्त्राइलमध्ये सार्वत्रिक निवडणुकांमध्ये राजकीय नेत्यांना मतदान करण्याऐवजी पक्षाला मतदान केलं जातं. त्यामुळं आघाडीची सरकार सत्तेवर येतात. आता साडेतीन वर्षात पाचव्यांदा निवडणूक होणार आहे. बेंजामिन...

Smartphone Tips: Memory Card मधून डिलीट झालेले फोटो या ट्रिक्सच्या मदतीने सहज होतील रिकव्हर

नवी दिल्ली: Tips To Recover deleted Photos: आजकाल प्रत्येकाकडे स्मार्टफोन असतो. आणि साहजिकच त्यात एक चांगला कॅमेरा देखील असतो. ज्यामुळे हवे ते फोटो...

Sanju Samsonने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायर्ड व्हावं,क्रिकेट वर्तुळात एकचं चर्चा

मुंबई : टीम इंडियातला प्रतिभावंत खेळाडू संजू सॅमसनच्या निवृत्तीची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगलीय. त्यामुळे संजू चाहते सध्या शॉकमध्ये आहेत. प्रत्येक सामन्यात धावांचा पाऊस...