Saturday, July 2, 2022
Home क्रीडा रवी शास्त्रींचा खेळ खल्लास! BCCI च्या निर्णयामुळे खळबळ

रवी शास्त्रींचा खेळ खल्लास! BCCI च्या निर्णयामुळे खळबळ


इंग्लंडमध्ये असलेल्या रवी शास्त्रींचं टेन्शन वाढलं

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) हे सध्या इंग्लंडमध्ये आहेत, पण इंग्लंडचा हा दौरा (India vs England) रवी शास्त्री यांच्यासाठी अखेरची टेस्ट सीरिज ठरणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे, याचं कारण बीसीसीआयने (BCCI) घेतलेला निर्णय.

मुंबई, 10 ऑगस्ट : टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) हे सध्या इंग्लंडमध्ये आहेत, पण इंग्लंडचा हा दौरा (India vs England) रवी शास्त्री यांच्यासाठी अखेरची टेस्ट सीरिज ठरणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे, याचं कारण बीसीसीआयने (BCCI) घेतलेला निर्णय. बंगळुरूमध्ये असलेल्या नॅशनल क्रिकेट अॅकेडमीच्या (NCA) प्रमुख पदासाठी बीसीसीआयने अर्ज मागवले आहेत. राहुल द्रविड (Rahul Dravid) सध्या एनसीएमध्ये प्रमुख आहे.
गेल्या काही दिवसांपासून राहुल द्रविड टीम इंडियाचा (Team India) मुख्य प्रशिक्षक होईल अशी चर्चा सुरू आहे. टीम इंडियाचे प्रमुख खेळाडू इंग्लंडला असल्यामुळे श्रीलंका दौऱ्यावर (India vs Sri Lanka) युवा खेळाडूंना पाठवण्यात आलं. या दौऱ्यावरही राहुल द्रविड टीमचा मुख्य प्रशिक्षक होता. आता द्रविडच्या एनसीएमधल्या जागेवर बीसीसीआयने अर्ज मागवले आहेत, त्यामुळे द्रविड टीम इंडियाचा प्रशिक्षक व्हायच्या चर्चा आणखी जोर धरतील.
‘राहुल द्रविड पुन्हा एनसीएच्या प्रमुख पदासाठी अर्ज करू शकतो, पण रवी शास्त्रींचा कार्यकाळ नोव्हेंबर 2021 मध्ये संपत आहे, त्यामुळे द्रविडला प्रशिक्षकपदावर बढती दिली जाऊ शकते, पण यासाठी द्रविड यंत्रणेचा भाग असला पाहिजे,’ असं बीसीसीआयच्या सूत्रांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं.
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ टी-20 वर्ल्ड कपपर्यंत (T20 World Cup) आहे. 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबरमध्ये टी-20 वर्ल्ड कप खेळवला जाईल, यानंतर टीम इंडियाच्या प्रशिक्षकाबाबत निर्णय होईल. 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलनंतर विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यात वाद झाले, त्यानंतर रवी शास्त्रींना टीमचं प्रशिक्षक करण्यात आलं. 2019 वर्ल्ड कपपर्यंत शास्त्रींचा कार्यकाळ होता, पण न्यूझीलंडविरुद्धच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतरही शास्त्रींचा कार्यकाळ वाढवण्यात आला.
श्रीलंका दौरा संपल्यानंतर राहुल द्रविडला आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता, त्यावेळी द्रविडने सूचक वक्तव्य केलं होतं. ‘मी या अनुभवाचा आनंद घेतला, पण मी पुढचा काहीच विचार केला नाही. मी तेच करत आहे, जे मी करत आलोय. हा दौरा पूर्ण करण्याशिवाय माझ्या डोक्यात काही विचार नाही. या मुलांसोबत काम करून मला आनंद मिळाला. आणखी कोणत्याही गोष्टींवर मी विचार केलेला नाही,’ असं द्रविड म्हणाला.
‘पूर्णवेळ ही भूमिका पार पाडण्यासाटी खूप आव्हानं आहेत, त्यामुळे मी सध्या तरी मला याबाबत काहीही माहिती नाही,’ अशी प्रतिक्रिया द्रविडने दिली.

Published by:Shreyas

First published:अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#रव #शसतरच #खळ #खललस #BCCI #चय #नरणयमळ #खळबळ

RELATED ARTICLES

वेबविश्वात आणखी एक खळबळ! रानबाजारनंतर खुर्चीचं राजकारण; पानसेंची नवी वेबसिरीज भेटीला

मुंबई 1 जुलै: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलाढाली होत आहे. एक ना अनेक अनपेक्षित उलथापालथ सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या सध्याच्या याच पार्श्वभूमीवर...

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

‘E म्हणजे एकनाथ आणि D म्हणजे देवेंद्र हे आमचे ED चे राज्य’

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी पणजी, 1 जुलै : मुंबईत सध्या विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज...

Most Popular

sushmita sen shared her experience about work with mahesh bhatt in her debut film | “मी रागात होते अन् त्यांनी माझा हात पकडला…” सुष्मितानं...

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन सोशल मीडियावर नेहमची काही ना काही कारणानं चर्चेत असते. काही वर्षं चित्रपटांतून ब्रेक घेतल्यानंतर सुष्मितानं ‘आर्या’ या वेब सीरिजमधून...

ED Summons to Shivsena MP Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत आज ईडीसमोर हजर राहणार

<p>ED Summons to Shivsena MP Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत आज ईडीसमोर हजर राहणार</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित...

क्या बात है! टू इन वन कार आली; रस्त्यासोबत समुद्रातही धावणार, किंमत किती?

<p style="text-align: justify;"><strong>Trending Car:</strong> आजकाल नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे अनेक जबरदस्त गाड्या बाजारात आल्या आहेत. यातच अशी एक खास कार आहे, जी पाणी आणि...

लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये विश्वास टिकवूणं सर्वात महत्त्वाचं, या टिप्स ठरतील..

लाँग डिस्टन्स रिलेशनशिप (Long Distance Relationship) म्हणजे तुम्ही काय समजता? लाँग डिस्टन्स रिलेशनशिप म्हणजे फक्त एकमेकांना वेळ देणे किंवा एकत्र वेळ घालवणे नव्हे...

Best Deals: स्वस्तात मिळतोय ६००० mAh बॅटरीचा हा सॅमसंग फोन, ६४ GB ७४९ तर, १२८ GB व्हेरियंट ९९९ रुपयांत खरेदी करा

नवी दिल्ली: Samsung Galaxy F13 Price: जर तुम्हाला कमी बजेटमध्ये हेवी रॅम आणि मोठी बॅटरी असलेला फोन हवा असेल तर, Samsung Galaxy F13...

आर्यन खाननं कोर्टात दिली याचिका, म्हणाला माझा पासपोर्ट परत द्या

मुंबई : बाॅलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा लेक आर्यन खानला ड्रग्स खटल्यात अमली पदार्थ नियंत्रण कक्ष अर्थात एनसीबीकडून क्लीनचीट देण्यात आली. पण अजून त्याला...