Sunday, January 16, 2022
Home करमणूक रणवीर सिंहला टक्कर देणार कतरिना कैफ; 'सर्कस' ,'फोन भूत' एकाच दिवशी होणार...

रणवीर सिंहला टक्कर देणार कतरिना कैफ; ‘सर्कस’ ,’फोन भूत’ एकाच दिवशी होणार रिलीज


‘सर्कस’ आणि ‘फोन भूत’ या बॉलीवूड चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. ‘सर्कस’मध्ये रणवीर सिंह मुख्य भूमिकेत दिसणार आहे, तर कतरिना कैफ ‘फोन भूत’मध्ये खास भूमिका साकारत आहे

मुंबई, 27 नोव्हेंबर- लॉकडाऊन   (Lockdown)   शिथिल झाल्यानंतर बॉलिवूडमधील   (Bollywood)  अनेक मोठ्या चित्रपट निर्मात्यांनी त्यांच्या चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली होती. ‘सूर्यवंशी’ चित्रपटाच्या जबरदस्त यशानंतर, सर्व मोठे चित्रपट निर्माते त्यांचे चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याची घोषणा करत आहेत. गेल्या काही दिवसांत काही मोठ्या चित्रपटांच्या रिलीजच्या तारखा समोर आल्या आहेत. ज्यामध्ये रणवीर सिंह   (Ranvir Singh)  आणि कतरिना कैफसारखे   (Katrina Kaif)  स्टार्स मुख्य भूमिकेत आहेत.

‘सर्कस’ आणि ‘फोन भूत’ या बॉलीवूड चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. ‘सर्कस’मध्ये रणवीर सिंह मुख्य भूमिकेत दिसणार आहे, तर कतरिना कैफ ‘फोन भूत’मध्ये खास भूमिका साकारत आहे. दोन्ही स्टार्सच्या चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर जबरदस्त टक्कर होणार आहे.दोन्ही स्टार्सचे चाहते त्यांच्या चित्रपटांच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहेत. आता या लढतीत कोण बाजी मारतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विट करून चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखेची माहिती दिली आहे.

‘फोन भूत’मध्ये असणार हे त्रिकुट-
तरणने ट्विट केले की, गुरमीत सिंग दिग्दर्शित कतरिना कैफ, इशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी फेम फोन भूत पुढील वर्षी १५ जुलै रोजी प्रदर्शित होईल. फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी या चित्रपटाचे निर्माते आहेत.

रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सर्कस’-
तरणने आणखी एका ट्विटमध्ये सांगितले की, रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सर्कस’ पुढील वर्षी 15 जुलै रोजी रिलीज होत आहे. रणवीर सिंगचा रोहितसोबतचा हा तिसरा चित्रपट आहे. तो याआधी रोहित शेट्टीच्या ‘सिम्बा’ आणि ‘सूर्यवंशी’मध्ये दिसला आहे. या चित्रपटात रणवीरशिवाय जॅकलिन फर्नांडिस, पूजा हेगडे आणि वरुण शर्मा यांच्याही विशेष भूमिका आहेत. पाहिले तर, दोन्ही चित्रपटांची स्टारकास्ट जबरदस्त आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर त्यांच्यात एक तगडी टक्कर पाहायला मिळणार हे नक्की.

Published by:Aiman Desai

First published:अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#रणवर #सहल #टककर #दणर #कतरन #कफ #सरकस #फन #भत #एकच #दवश #हणर #रलज

RELATED ARTICLES

लस नव्हे तर यामुळे गेला जीव, घाटकोपरमधील मुलीच्या मृत्यूचं धक्कादायक कारण समोर

मुंबई, 16 जानेवारी: कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यामुळे घाटकोपरमधील एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली होती. संबंधित घटनेबाबतची बातमी...

Fact check- लस घेतल्यानंतर 15 वर्षांच्या मुलीचा मृत्यू?, BMC ने फेटाळला दावा

मुंबई : गेल्या 2 वर्षांपासून आपण कोरोनाच्या महामारीशी लढा देतोय. सध्या कोरोना विरूद्धच्या लढ्यात लस हे सर्वात प्रभावी शस्त्र मानलं जातंय. मात्र मुंबईत...

जगभरात लोकांनी 365 दिवसात मोबाईलवर घालवले 43 कोटी वर्ष; भारतीय देखील मागे नाहीत

मुंबई, 16 जानेवारी : स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनला आहे. कोरोना काळात जणू आपलं सगळं जगच मोबाईलवर एकवटलं आहे. जगभरात लोक...

Most Popular

घर भाड्याने दिलं आहे? मग जाणून घ्या या महत्त्वाच्या गोष्टी, आहेत अतिशय कळीच्या

मुंबई,  15 जानेवारी :  कमाई वाढवण्याचे अनेक मार्ग आहेत. त्यातला एक म्हणजे आपल्या घराचा एक भाग किंवा आपली एखादी जागा भाड्यानं देणे. जेणेकरून आपण...

EV Charging Stations : आता घरी किंवा ऑफीसमध्ये चार्जिंग करा इलेक्ट्रिक कार

EV Charging Stations : केंद्र सरकारने ईव्ही चार्जिंग (Electric Vehicle) इकोसिस्टम सक्षम करण्यासाठी शनिवारी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे....

Goa Election Raj Thackery : गोव्याच्या राजकारणात नव्या पक्षाची एन्ट्री कोण आहेत गोव्याचे राज ठाकरे?

By : abp majha web team | Updated : 16 Jan 2022 11:40 AM (IST) स्थानिक भूमिपुत्र, त्यांचे हक्क आणि त्यासाठी भांडणारा नेता...

covid vaccine : धक्कादायक! देशातील करोनावरील लसीकरण मोहीमेला १ वर्ष पूर्ण, पण…

नवी दिल्ली : देशात करोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. आता गेल्या काही दिवसांपासून करोनाच्या नवीन रुग्णांची संख्या २ लाखांवर आढळून येत...

अमेरिकेत 4 जणांना ठेवलं ओलिस, बंदुकधाऱ्यानं केली ‘ही’ मोठी मागणी

न्यूयॉर्क, 16 जानेवारी: अमेरिकेतील (United States)टेक्सासमध्ये (Texas) 4 जणांना ओलीस (US Hostage) ठेवण्यात आलं आहे. लोकांना ओलीस ठेवणाऱ्यांनी पाकिस्तानी शास्त्रज्ञ आफिया सिद्दिकीची सुटका...

गोंधळलेली प्रेमकथा

|| रेश्मा राईकवार नायक -नायिका आणि त्यांच्या कथेत विघ्न आणू पाहणारा खलनायक. मग खलनायकाला अद्दल घडवून प्रेम जिंकणारा नायक हा ढोबळ प्रेमकथेचा साचा कधीच...