दुरुस्तीच्या कामादरम्यान संबंधित भागातल्या नागरिकांना 14 तास पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. या भागात सकाळी 8.30 ते रात्री 10.30 पर्यंत पाणीपुरवठा बंद असेल.
बीएमसीने (BMC) पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्यानं अंधेरी (पूर्व, पश्चिम), राम मंदिर, कुर्ला, घाटकोपर आणि गोरेगाव या भागात पाणी कपात असणार आहे. तसंच मुंबई शहर आणि पश्चिम उपनगरातील सर्व वॉर्ड, एफ उत्तर आणि एफ दक्षिण वगळता, दिवसभरात 15 टक्के पाणी कपात असेल असं पालिकेनं स्पष्ट केलं आहे.
दिनांक ३ ऑगस्ट रोजी शहर व पश्चिम उपनगरांमध्ये १५% पाणी कपात.
कुर्ला, घाटकोपर, अंधेरी आणि गोरेगांवातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा नाही.
पाणी जपून व काळजीपूर्वक वापरण्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आवाहन. pic.twitter.com/iZItzVnp3o
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 30, 2021
3 ऑगस्ट रोजी शहर आणि पश्चिम उपनगरांमध्ये 15% पाणी कपात. कुर्ला, घाटकोपर, अंधेरी आणि गोरेगांवातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा नाही. पाणी जपून आणि काळजीपूर्वक वापरण्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आवाहन, असं ट्विट मुंबई पालिकेकडून करण्यात आलं आहे.
हेही वाचा- कोरोनाला संपवायचं आहे?, यावर WHO चे अध्यक्ष म्हणतात…
पालिकेनं नागरिकांना पाण्याचा काळजीपूर्वक आणि सावधगिरीने वापर करावा, असं आवाहनही केलं आहे. के-पूर्व, के-पश्चिम, पी-दक्षिण, एल आणि एन वॉर्डमधील काही भागात पाणी येणार नाही आहे. तर के पूर्व आणि पी-दक्षिणमधील काही भागात मंगळवारी 3 ऑगस्टला कमी दाबाने पाण्याचा पुरवठा होईल.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#यतय #मगळवर #य #भगत #मबईत #टकक #पण #कपत #पण #जपन #वपर #पलकच #आवहन