Friday, August 12, 2022
Home विश्व युएईतील परदेशी डॉक्टरांना सरकारकडून 'ही' भेट; भारतीयांना होणार फायदा

युएईतील परदेशी डॉक्टरांना सरकारकडून ‘ही’ भेट; भारतीयांना होणार फायदा


दुबई: संयुक्त अरब अमिरातीमध्ये राहणाऱ्या भारतीय डॉक्टरांना तेथील सरकारने मोठी भेट दिली आहे. या डॉक्टरांना गोल्डन व्हिसा मिळणार आहे. गोल्डन व्हिसा देण्यासाठी फेडरस ऑथिरिटी फॉर आयडेंटिटी अॅण्ड सिटिझनशीपने (ICA) ‘गोल्डन रेजिडेसी सर्व्हिसेस’ची सुरुवात करण्यात येणार आहे. दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांच्या निर्देशानंतर या गोल्डन व्हिसाची सुरूवात होणार आहे.

भारतीय डॉक्टर्स आणि त्यांच्या कुटुंबीयांना १० वर्षासाठी गोल्डन व्हिसा मिळणार आहे. आयसीएचे कार्यवाहक महासंचालक मेजर जनरल सुहैल सईद अल खली यांनी म्हटले की, युएईतील सर्व डॉक्टरांना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना गोल्डन व्हिसा देण्यात येणार आहे. करोना महासाथीचा आजार रोखण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले. संयुक्त अरब अमिरातीमध्ये भारतीय डॉक्टर मोठ्या प्रमाणावर वास्तव्य करत आहेत. त्यांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे.

वाचा:अमेरिका: मोठ्या प्रमाणावर लसीकरण, तरीही ‘या’ कारणाने बाधितांच्या संख्येत वाढ

आयसीए आरोग्य आणि संसर्ग आजार नियंत्रण मंत्रालय व अन्य अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत आहे. जेणेकरून युएईतील नोंदणीकृत डॉक्टरांसाठी गोल्डन व्हिसा देण्याच्या प्रक्रियेला वेग देता येईल असे खली यांनी म्हटले. या निर्णयामुळे जगभरातील वैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिक अमिरातीकडे आकर्षित होण्याचा विश्वास असून त्याद्वारे देशातील आरोग्य व्यवस्था अधिक चांगली होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

करोनाचा विषाणू आणखी घातक होण्याआधी नियंत्रण मिळवा; WHO चा इशारा

परदेशातील नोकरीसाठी भारतीयांची अमेरिका नव्हे ‘या’ देशाला पसंती
हा व्हिसा देण्यामागे अमिराती सरकारचे काही उद्दिष्ट्य आहे. शिक्षण, नोकरी आणि वास्तव्यासाठी जगात प्राधान्य असलेल्या देशांच्या यादीत अमिरातीचा समावेश व्हावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे म्हटले जात आहे.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#यएईतल #परदश #डकटरन #सरकरकडन #ह #भट #भरतयन #हणर #फयद

RELATED ARTICLES

सर्वसामान्य दाम्पत्याची ‘असामान्य’ कहाणी; दत्तक मुलीचा आज सर्वानाच अभिमान

गांधीनगर, 12 ऑगस्ट : अनेकजण विरोध झुगारुन असे काही निर्णय घेतात की कालांतराने ते समाजासाठी एक आदर्श उदाहरण बनतात. ही माणसं समाजात आपली...

Paytm New Feature: तुमची ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्मवर येणार? कितीला पोहचणार? आता लगेच समजणार

मुंबई: अनेकदा प्रवाशांना रेल्वे (Railway) प्रवासापुर्वी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. ट्रेनची वाट पाहत असताना ती नेमकी कोणत्या प्लॅटफॉर्म येईल याची माहिती नसते....

घरच्या घरीच करा हा सोपा उपाय आणि अपचनाला करा बायबाय!

मुंबई, 12 ऑगस्ट : मसाल्यातील प्रमुख घटक असलेला हिंग आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही फायदेशीर आहे. सर्वसाधारणपणे जेवणाची चव वाढवण्यासाठी हिंगाचा वापर केला जातो. हिंगाचे अनेक...

Most Popular

हृदयद्रावक! राखी बांधण्यासाठी निघालेल्या बहिणींना यमुनेत जलसमाधी, ४ जणांचा मृत्यू, १७ जण अद्यापही बेपत्ता

बांदा (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात मोठी दुर्घटना समोर आली आहे. रक्षाबंधनाला महिला मुलांसोबत राखी बांधण्यासाठी बोटीतून माहेरी जात असताना यमुना...

घरच्या घरीच करा हा सोपा उपाय आणि अपचनाला करा बायबाय!

मुंबई, 12 ऑगस्ट : मसाल्यातील प्रमुख घटक असलेला हिंग आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही फायदेशीर आहे. सर्वसाधारणपणे जेवणाची चव वाढवण्यासाठी हिंगाचा वापर केला जातो. हिंगाचे अनेक...

JEE Advanced साठी अर्ज करण्याची आणखी एक संधी; IIT Bombay नं वाढवली मुदत

JEE Advanced 2022 : इंडियन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी बॉम्बे (IIT Bombay) आजपासून जेईई अॅडव्हान्ससाठी अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख...

Health Tips: डोळे अधिक सक्षम आणि दृष्टी वाढवण्यासाठी आहारात या 3 गोष्टींचा समावेश करा, चष्म्याचे नो टेन्शन !

Health Tips: डोळे हा आपल्या शरीराचा सर्वात संवेदनशील आणि महत्त्वाचा भाग आहे. आपण फक्त आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो. पण आजच्या काम करण्याचा सवईमुळे आणि...

मुंबई इंडियन्सची मोर्चेबांधणी सुरु, पाहा कोणत्या पाच खेळाडूंशी केला करार?

केपटाऊन, 11 ऑगस्ट: आयपीएलमधली सर्वात लोकप्रिय फ्रँचायझी मुंबई इंडियन्सनं आता परदेशातल्या टी20 लीगमध्येही आपला संघ उतरवण्याचं ठरवलं आहे. संयुक्त अरब अमिरात (UAE) आणि...

12th August 2022 Important Events : 12 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

12th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. याचबरोबर श्रावण महिन्यालाही सुरुवात झाली आहे. श्रावण...