Thursday, May 26, 2022
Home विश्व या हॉस्पिटलच्या 11 नर्स एकाच वेळी प्रेग्नंट; दोघींची तर डिलिव्हरी डेट पण...

या हॉस्पिटलच्या 11 नर्स एकाच वेळी प्रेग्नंट; दोघींची तर डिलिव्हरी डेट पण आहे सेम


नवी दिल्ली, 13 मे : अमेरिकेतील मिसुरी राज्यातील एका रुग्णालयात एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. मिसूरी येथील लिबर्टी हॉस्पिटलमध्ये (Liberty Hospital in Missouri) काम करणाऱ्या 11 वैद्यकीय कर्मचारी एकाच वेळी प्रेग्नंट (pregnant) झाल्या आहेत. यामध्ये 10 नर्सेस आणि एका डॉक्टरचा समावेश आहे. विशेष म्हणजे, त्यापैकी दोघींची डिलिव्हरीची संभाव्य तारीख (delivery due date) एकच आहे. योगायोगाने, यातील बहुतांश परिचारिका रुग्णालयातील प्रसूती विभागात (Maternity department) काम करतात. एका संस्थेत एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येनं महिला कर्मचारी गर्भवती राहण्याची ही पहिलीच घटना आहे.

सर्व परिचारिका एकमेकींना ओळखत असून एकत्रच काम करणाऱ्या

हॉस्पिटलच्या बर्थिंग सेंटरच्या संचालिका निक्की कॉलिंग यांनी सांगितले की, या सर्व परिचारिका एकाच विभागात काम करणाऱ्या आहेत. परंतु त्यापैकी 10 गर्भवती असतील अशी आम्हाला अपेक्षा नव्हती. ते खूपच मजेदार आहे. यातील काही वैद्यकीय कर्मचार्‍यांची प्रसूती पुढील काही आठवड्यांत होईल. तर, उर्वरित परिचारिकांची तारीख सप्टेंबर ते नोव्हेंबर अशी आहे. रुग्णालय प्रशासनाने या सर्व परिचारिकांना स्थानिक कायदा आणि रुग्णालयाच्या नियमांच्या आधारे सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे.

गर्भवती नर्स म्हणाली, हॉस्पिटलच्या पाण्याची अफवा आहे

29 वर्षीय नर्स हॅना मिलरने सांगितलं की, मी माझ्या पहिल्या मुलाच्या जन्माबद्दल उत्साहित आहे. ती गमतीने पुढे म्हणाली की, अनेक परिचारिका हॉस्पिटलचं पाणी पिणार नाही, असं सांगत आहेत. यातील काही परिचारिका घरून पाण्याची बाटली घेऊन कामावर आल्या. कोणीतरी गंमतीनं सांगितलं आहे की, हॉस्पिटलच्या पाण्यात असं काहीतरी आहे की, 11 परिचारिका एकाच वेळी गर्भवती झाल्या आहेत. गंमत म्हणून ही अफवा पसवली होती.

हे वाचा – Corona मध्ये नोकरी गेली, हार न मानता महिलेनं घर चालवण्यासाठी निवडली वेगळी वाट

 रुग्णालयातील प्रसूती-स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरही गर्भवती आहेत

लेबर आणि प्रसूती नर्स केटी बेस्टजेनची प्रसूतीची तारीख 20 जुलै आहे, तर 27 वर्षीय प्रसूती फ्लोट नर्स थेरेसी बायरम नोव्हेंबरच्या अखेरीस आई होणार आहे. क्रिस्टन बर्न्स आणि चेयेन बीटी, दोन 26 वर्षीय लेबर आणि प्रसूती परिचारिका, देखील गर्भवती आहेत. यासोबत प्रसूती-स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अॅना गोरमन, म्हणाल्या की, मला वाटतं की, हे खरोखर खूप जबरदस्त आहे. कारण आपण सर्व एकाच युनिटमध्ये काम करतो. आपल्या दुसऱ्या अपत्याच्या प्रतीक्षेत असलेल्या डॉ. अॅना म्हणाल्या की, इतक्या बाळांचा होणारा जन्म खरोखरच रोमांचक असणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#य #हसपटलचय #नरस #एकच #वळ #परगनट #दघच #तर #डलवहर #डट #पण #आह #सम

RELATED ARTICLES

‘हाय का, पुन्हा याच्या नशिबात दोन बायका!’ नव्या मालिकेमुळे अभिजीत खांडकेकर ट्रोल

मुंबई, 26 मे:  'माझिया प्रियाला प्रीत कळेना' (Maziya Priyala Preet Kalena) मालिकेतून मालिका क्षेत्रात पदार्पण करणारा सर्वांचा लाडका अभिनेता म्हणजे 'अभिजीत खांडकेकर' (Abhijeet...

सलग 13 तासांच्या चौकशीत ईडीने काय प्रश्न विचारले? अनिल परबांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई, 26 मे : ईडी (ED) अधिकाऱ्यांनी आज राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या घरावर धाड (ED Raid) टाकली. ईडीने परब...

Infosys चे CEO सलील पारेख यांची पगारवाढ बघून चक्रावून जाल; इतकं मिळालं Hike

मुंबई, 26 मे: जगभरातील टॉप कंपन्या आणि त्यांच्या CEO ना मिळणाऱ्या पगाराबद्दल आपल्याला माहितीच आहे. या कंपन्यांमध्ये अनेक IT कंपन्यांचा नंबर लागतो. यामध्ये...

Most Popular

स्कीनसाठी गुलाब जल वापरलं असेल; केसांसाठीही त्याचा असा घरच्या-घरी करा उपयोग

मुंबई, 26 मे : उन्हाळ्यात केसांची काळजी घेणं तसं सोपं काम नाही. तीव्र सूर्यप्रकाश आणि गरम हवेमुळे केस कोरडे, निस्तेज आणि खराब होतात....

बंद असलेल्या रिसॉर्टचे सांडपाणी समुद्रात जाते यावरुन ईडीची कारवाई: अनिल परब

मुंबई: दापोलीतील बंद असलेल्या रिसॉर्टमधून सांडपाणी हे समुद्रात जात असल्याचं कारण देत ईडीने आज आपल्यावर कारवाई केली, यामध्ये...

Rajya Sabha Election 2022 : संजय राऊत आणि संजय पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेना नेते संजय राऊत आणि संजय पवार हे दोघेही आज आपला उमेदवारी अर्ज दाखल...

देशातील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीची आयोजन पिंपरी चिंचवडमध्ये

पिंपरी - चिंचवड : बैलगाडा (Bailgada Sharyat) शौकीनांसाठी आनंदाची बातमी आहे. पिंपरी चिंचवडमध्ये सर्वात मोठी बैलगाडा शर्यत भरणार...

IPL 2022 : रजतचं शतक राहुलवर भारी, लखनऊला धक्का, RCB फायनलच्या आणखी जवळ

कोलकाता, 26 मे : आयपीएल 2022 च्या (IPL 2022 Eliminator) एलिमिनेटरमध्ये आरसीबीने लखनऊ सुपर जाएंट्सना (RCB vs LSG) पराभवाचा धक्का दिला आहे, त्यामुळे...