Saturday, July 2, 2022
Home लाईफस्टाईल 'या' सुप्रसिद्ध अभिनेत्याला झालंय तरी काय? आपल्याला आजार असल्याचं सांगत सोशल मीडियावर...

‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्याला झालंय तरी काय? आपल्याला आजार असल्याचं सांगत सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट


‘बिग बॉस’ फेम अभिनेता अभिनव शुक्ला रिएलिटी शोमुळे सर्वाधिक चर्चेत आला. आता त्याने आपल्याला एक आजार असल्याचं सगळ्यांसमोर उघड केलं आहे. बॉर्डरलाइन डिस्लेक्सिक या आजाराने तो ग्रस्त आहे. सोशल मीडियावरच त्याने एक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली. अभिनव म्हणाला, ‘मला बॉर्डरलाइन डिस्लेक्सिक हा आजार आहे. यामध्ये कोणाचीही चूक नाही. माझी देखील नाही. जे आहे ते आहे. मला या आजाराचा स्वीकार करायला दोन दशकांचा काळ लागला.

आता मला अंक किंवा आकड्यांची लाज वाटत नाही. पण मी इतर बाजूंनी अधिक सक्षम आहे.’ अभिनव पुढे म्हणतो की, ‘हो. आकडे, अक्षर आणि शब्दांमध्ये माझा गोंधळ उडतो. मला तारीख, नाव, तारखेशी असलेल्या नावाचा संबंध लक्षात ठेवता येत नाही. पण काही गोष्टींमध्ये मी अगदी उत्तम आहे. आणि या गोष्टी मी सुधारण्याचा प्रयत्न करत आहे.’ पण अभिनवला झालेला हा आजार नेमका काय आहे? या आजारामध्ये काय होतं? हे आपण या लेखाच्या आधारे जाणून घेणार आहोत.

​डिस्लेक्सिक म्हणजे काय?

डिस्लेक्सिक हा असा आजार आहे ज्याचा संबंध थेट मेंदूशी येतो. काही प्रकरणांमध्ये हा आजार अनुवांशिकसुद्धा असू शकतो. डिस्लेक्सिक हा आजार असणारा व्यक्ती नीट वाचण्यासाठी सक्षम नसतो. शब्द वाचणं तर या व्यक्तींना कठीण जातंच पण त्याचबरोबरीने या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना लिहिण्यासाठी देखील अडचण निर्माण होते. पण तुमची नजर किंवा बौद्धिक क्षमता या आजारामुळे प्रभावित होत नाही हे लक्षात असूद्या. या आजाराच्या सुरुवातीलाच याचे निदान झाले तर तुम्ही या आजारापासून दूर राहू शकता. या आजारावर अद्याप कोणताचा उपचार नाही. पण तुम्ही याची लक्षणं नक्कीच ओळखू शकता.

(Weight Loss : ‘हा’ पदार्थ खाल्ल्यामुळे पोटाची वाढलेली चरबी झटपट होईल कमी, ७ आयुर्वेदिक उपाय ठरतील रामबाण)

लहान मुलांमधील डिस्लेक्सिकची लक्षणं

– लहान मुलांना देखील हा आजार होऊ शकतो. याची काही लक्षण देखील आहेत.

– उशीराने बोलणे.

– नवे शब्द बोलण्यास सक्षण नसणे.

– एखादं वाक्य लिहिण्यास अथवा बोलण्यास कठीण वाटणे. किंवा एखादा शब्द आठवणीत ठेवण्यास समस्या निर्माण होणे.

– शाळा शिकणाऱ्या मुलांमध्ये आढळणारी लक्षणं

– शिक्षण जे काही शिकवतात ते समजण्यामध्ये समस्या निर्माण होण.

– अभ्यास करण्याची क्षमता कमी होणे.

– शब्द उच्चारण्यास अडचण निर्माण होणे.

– शब्द आणि अक्षर ओळखण्यास समस्या निर्माण होणे.

(Food Habits : जेवल्यानंतर अधिक झोप का येते? यामागील कारणं वाचून व्हाल हैराण, नेमकं सत्य काय?)

​तरुणांमध्ये डिस्लेक्सिकची लक्षणं

– शुद्धलेखनामध्ये अडचण

– वाचण्यासाठी समस्या निर्माण होणे

– शब्द तसेच नावांचा चुकीचा उच्चार

– कोणतीही गोष्ट आठवणीत ठेवण्यास सक्षण नसणे

– गणिताविषयी कोणतीही समस्या सोडवणं कठीण वाटणे

– विनोद किंवा इतर भाव समजणं कठीण

डिस्लेक्सिक हा आजार सामान्य असला तरी यामुळे प्रत्येक ठिकाणी वावरताना काही ना काही समस्या निर्माण होतात. अशावेळी तुम्ही काही तज्ज्ञांचा सल्ला देखील घेऊ शकता. पण खचून न जाता अभिनवप्रमाणे या आजाराचा स्वीकार करा. आणि प्रगती करा.

(Ayurvedic Water : आयुर्वेदानुसार ‘या’ भांड्यांमध्ये भरून ठेवा पिण्याचे पाणी, पोटाचे विकार, उच्च रक्तदाबावर रामबाण उपाय, Weight Loss साठी मिळेल मदत)

​डिस्लेक्सिकचं निदान कसं कराल?

– जर एखादं मुल या आजाराने त्रस्त असेल तर फक्त कौटुंबिक व्यक्तींमध्ये नव्हे तर शाळेमधील शिक्षकांना देखील या मुलाच्या आजाराची माहिती असणं गरजेचं आहे. त्यांना सांभाळून शिक्षकांनी शिकवलं पाहिजे.

– हा आजारावर अद्याप कोणताही उपचार नाही. डिस्लेक्सिकमुळे जी मुलं त्रस्त आहेत त्यांची काळजी पालकांनी घेणं गरजेचं आहे. तसेच विशेष शिकवणीमधून तुम्ही मुलांना शिक्षणास मदत करू शकता.

– मोठ्याने वाचन करणे अशापरिस्थितीमध्ये मुलांसाठी फायदेशीर ठरू शकतं. तसेच मुलांच्या विकासाबाबत त्यांच्या शिक्षकांशी सतत संवाद साधा.

– मुलं तुम्हाला ज्या काही समस्या सांगत आहेत त्याकडे दुर्लक्ष न करता लक्ष द्या. वाचन किंवा लिहिण्यासाठी जर त्यांना समस्या निर्माण होत असेल तर याकडे दुर्लक्ष करणं चुकीचं ठरू शकतं. यासाठी तुम्ही मुलांची मदत करा.

– लक्षात ठेवा बालपणातच तुम्ही मुलांची समस्या समजून घेतली नाही तर तरुणपणात देखील ही समस्या त्यांना सतावत राहते.

(Weight Gain Tips : ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्याला ओळखणंही झालं कठीण, तब्बल १५ Kg वजन वाढवल्याने सडपातळ मुलांसाठी ठरतोय आदर्श)

​डिस्लेक्सियाचे प्रकार आणि कारणं

१. प्राथमिक डिस्लेक्सिया (Primary Dyslexia) – प्राथमिक डिस्लेक्सियामध्ये तुम्हाला अनुवांशिक पद्धतीने हा आजार होतो. यामुळे मुलांच्या अक्षरं, संख्या ओळखण्याच्या क्षमतेवर प्रभाव जाणवतो. तसेच गणितं, लेखन, वाचन यावर परिणाम जाणवण्यास सुरुवात होते.

२. सेकेंडरी डिस्लेक्सिया (Secondary Dyslexia) – मुलांच्या जन्मापूर्वीच हा आजार उद्भवतो. गर्भाच्या मेंदूच्या विकासावर परिणाम होत हा आजार उद्भवू शकतो.

३. सरफेस डिस्लेक्सिया (Surface Dyslexia) – यामध्ये शुद्धलेखन आणि शब्द समजण्यास समस्या निर्माण होते. तसेच प्रत्येक शब्दाचे उच्चार या आजाराने त्रस्त असणाऱ्या व्यक्तींसाठी वेगळे असतात.

४. ध्वन्यात्मक डिस्लेक्सिया (Phonological Dyslexia) – या प्रकारच्या डिस्लेक्सियामध्ये व्यक्तीगत शब्द उच्चारण्यास आणि शब्दांचा ध्वनी ओळखण्यास समस्या निर्माण होते.

५. व्हिज्युअल डिस्लेक्सिया (Visual Dyslexia) – यामध्ये वाचन आणि प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी समस्या निर्माण होते.

६. एक्वायर्ड डिस्लेक्सिया (Acquired Dyslexia) – एखादा अपघात किंवा मेंदूविषयी काही समस्या असल्यास हा आजारा होतो. यामुळे तुमची वाचण्याची क्षमता कमी होत जाते.

(Healthy Soup And Salad : सूप-सलाडचं अशाप्रकारे सेवन केल्यास होईल फक्त नुकसान, वेट लॉसलाही लागेल ब्रेक)

अभिनवने दिली माहिती

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#य #सपरसदध #अभनतयल #झलय #तर #कय #आपलयल #आजर #असलयच #सगत #सशल #मडयवर #शअर #कल #पसट

RELATED ARTICLES

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

2 July 2022 Important Events : 2 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

2 July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

‘उद्धव ठाकरे हे फार मोठे नेते, योग्य वेळ आल्यावर उत्तर देऊ’, केसरकरांचे चिमटे

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी पणजी, 1 जुलै : शिवसेनेच्या शिंदे गटाने नेते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी आज पत्रकार परिषद घेतली. शिंदे गटाचा नेता आज...

Most Popular

OnePlus Nord 2T 5G की Poco F4 5G ? कोणता स्मार्टफोन खरेदी करणे आहे तुमच्या फायद्याचे?

नवी दिल्ली. Nord 2T 5G VS Poco F4 5G: स्मार्टफोन निर्माता OnePlus ने OnePlus Nord 2T 5G स्मार्टफोन भारतात लाँच केला असून या...

जसप्रीत बुमरा आणि इंग्लंडच्या खेळाडूमध्ये पहिल्याच दिवशी झाला वाद, व्हिडिओ जगभरात व्हायरल

जसप्रीत बुमराकडे या पहिल्यांदाच यावेळी भारताचे कर्णधारपद भूषवण्याची संधी मिळाली. पण कर्णधारपद भूषवल्यावर बुमराचा पहिल्याच दिवशी मोठा वाद झाला. या वादाचा व्हिडिओ जगभरात...

व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये वाजत होती ‘शिट्टी’; तपासणीत शॉकिंग कारण समोर

वॉशिंग्टन, 30 जून : एका व्यक्तीच्या शरीरातून शिट्टी वाजल्यासारखा आवाज येत होता. पण हा आवाज शरीराच्या नेमक्या कोणत्या भागातून येतो आहे, हे त्यालाही...

IND vs ENG Edgbaston Test Ollie Pope to field at short leg with Camera on Helmet vkk 95

इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाचवा कसोटी सामना आजपासून (१ जुलै) एजबस्टन येथे होत आहे. या कसोटीदरम्यान ब्रॉडकास्टर एक अनोखा प्रयोग करण्याची तयारी करत...

ठाकरे सरकारनेही फडणवीस सरकारचे निर्णय केले होते रद्द

<p style="text-align: justify;">मुंबई : राज्यात नवीन सरकार आले की, सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांसोबतच मागील सरकारने घेतलेले अनेक निर्णय बदलले जातात. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा...