Thursday, July 7, 2022
Home क्रीडा ‘या’ व्यक्तीमुळे बिघडला विराटचा फॉर्म, माजी पाकिस्तानी कर्णधाराचे गंभीर आरोप

‘या’ व्यक्तीमुळे बिघडला विराटचा फॉर्म, माजी पाकिस्तानी कर्णधाराचे गंभीर आरोपभारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि स्फोटक फलंदाज विराट कोहली सध्या वाईट फॉर्ममध्ये आहे. साधारण महिन्यापूर्वी पार पडलेल्या इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेमध्ये तर तो धावांसाठी कमालीचा झगडताना दिसला. विशेष म्हणजे गेल्या अडीच वर्षांच्या काळात त्याच्या बॅटमधून एक शतक निघालेले नाही. एकूणच विराट कोहली खरोखर आपल्या कारकीर्दीतील वाईट काळातून जात आहे. याबाबत जागतिक क्रिकेटमधील अनेक माजी खेळाडूंनी आपापली मते व्यक्त केली आहेत. यामध्ये आता पाकिस्तानचे माजी कर्णधार राशिद लतीफ यांचाही समावेश झाला आहे. लतीफ यांनी कोहलीच्या खराब फॉर्मसाठी माजी भारतीय प्रशिक्षकाला जबाबदार धरले आहे.

‘कॉट बिहाईंड’ या स्पोर्ट्स युट्युब चॅलेनशी बोलताना राशिद लतीफ यांनी भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या कार्यक्षमतेवर जोरदार टीका केली आहे. ‘विराट कोहलीने काही दिवस क्रिकेटमधून सुट्टी घ्यावी,’ असा सल्ला काही दिवसांपूर्वी शास्त्रींनी दिला होता. या मुद्द्याला धरून राशिद लतीफ यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना लतीफ यांनी रवी शास्त्रींवर गंभीर आरोप लावले. लतीफ यांच्या म्हणण्यानुसार, विराट कोहलीच्या खराब फॉर्मसाठी स्वत: शास्त्रीच जबाबदार आहेत.

हेही वाचा – कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या स्थानावर असलेला खेळाडू म्हणतो, ‘मला क्रिकेट आवडत नाही…!’

राशिद लतीफ पुढे म्हणाले, “२०१७ मध्ये कुंबळेसारख्या खेळाडूला बाजूला करून रवी शास्त्रीकडे प्रशिक्षकपद दिले. रवी शास्त्री प्रत्यक्षात एक ब्रॉडकास्टर होते. त्यांचा प्रशिक्षणाशी काहीही संबंध नव्हता. शास्त्रीला आणण्यात विराट कोहलीशिवाय इतरांचीही भूमिका असेल. पण, यामुळे त्यांचेच नुकसान झाले. शास्त्री प्रशिक्षक नसते तर कोहली कधीच फॉर्मबाहेर गेला नसता.”

रवी शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाला चांगले यश मिळाले होते. भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये ऐतिहासिक विजयांची नोंद केली होती. या सर्व कामगिरीनंतरही कुंबळेच्या जागी शास्त्रींना प्रशिक्षक म्हणून नियुक्त केल्याने भारतीय संघाचे नुकसान झाल्याचे राशिद लतीफ यांना वाटते.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#य #वयकतमळ #बघडल #वरटच #फरम #मज #पकसतन #करणधरच #गभर #आरप

RELATED ARTICLES

आज आहे ‘वर्ल्ड चॉकलेट डे’; जगात सगळ्यात जास्त चॉकलेट कोण खातंय माहितेय का?

मुंबई, 07 जुलै : आजच्या युगात कोणताही सण-उत्सव असो, लोकांना चॉकलेट खायला आणि भेटवस्तू म्हणून द्यायला आवडतात. सणांच्या दिवशीही चॉकलेट खाण्याचा ट्रेंड झपाट्याने...

शिंदे कुटुंबीयांसाठी मोठा दिवस, मुख्यमंत्री मुलाचे ऑफिस पाहण्यास बाबा आले

मुंबई, ०७ जुलै: रिक्षाचालक ते मुख्यमंत्रिपदापर्यंत असा प्रवास करणारे एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आज सर्वात मोठा दिवस आहे....

‘राम देव नाही’, ‘मोदी PM झाले तर नागरिकत्त्व सोडेन’; ‘काली’ सिनेमाच्या दिग्दर्शिकेचे जुने Tweets Viral

मुंबई: 'काली' या माहितीपटाचं पोस्टर सोशल मीडियावर (Kaali Film Poster) वादाचं कारण ठरत आहे. यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप माहितीपटाची दिग्दर्शिका 'लीना मणिमेकलई'...

Most Popular

लालू यादव यांची प्रकृती ढासळली; तातडीने दिल्लीला हलणावर, मुलीची भावुक पोस्ट

पाटणा, 6 जुलै : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजद प्रमुख लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांची गेल्या काही दिवसांपासून ढासळत आहे. त्यांना...

Top 10 Maharashtra Marathi News : स्मार्ट बुलेटिन : 07 जुलै 2022 : गुरुवार : एबीपी माझा

दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन,...

OnePlus TV 50 Y1S Pro चा पहिला सेल आज, डिस्काउंटसह मोठ्या स्क्रिनचा टीव्ही स्वस्तात घरी येणार

नवी दिल्ली: OnePlus TV 50 Y1S Pro price: OnePlus ने या आठवड्याच्या सुरुवातीला Y सीरीज अंतर्गत एक नवीन स्मार्ट टीव्ही लाँच केला असून...

Marathi News : Marathi batmya, मराठी बातम्या, Latest News in Marathi, Live Breaking Marathi News | Lokmat News18

भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे. आपल्याकडे तुळस असल्यास रोज सकाळी स्नान केल्यानंतर तुळशीला पाणी अवश्य द्यावे. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया. अस्वीकरण: ही...

Kaali Controversy : …तर तो नुपूर शर्मा, महुआ मोईत्रा यांच्या विचारांचा आदर करेल – तस्लिमा

Kaali Controversy : बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी 'काली' वाद आणि नुपूर शर्मा यांच्यावर झालेल्या वादावर मत व्यक्त...

Plastic Bottle : प्लॅस्टिकच्या बाटलीतून पाणी पिणं आरोग्यासाठी चांगलं आहे का?

Plastic Bottle : आपण जनरली कुठंही घराबाहेर पडत असलो की सोबत पाण्याची बॉटल ठेवतोच. यात बहुतांश बॉटल्स या...