Saturday, July 2, 2022
Home विश्व 'या' देशात करोनाचा हाहाकार; दर दोन मिनिटाला एकाचा मृत्यू

‘या’ देशात करोनाचा हाहाकार; दर दोन मिनिटाला एकाचा मृत्यू


तेहरान: जवळपास दीड वर्षानंतरही करोनाचे थैमान सुरू आहे. अनेक देशांमध्ये करोनाचा जोर पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. इराणमध्ये करोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. इराणमध्ये सरासरी दर दोन मिनिटाला एका करोनाबाधिताचा मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे. इराण सरकारने याबाबतची माहिती दिली. सोमवारी एकाच दिवसात ५८८ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.

इराणमध्ये करोना संसर्गामुळे गंभीर परिस्थिती निर्माण होत असल्याचे चित्र आहे. करोनाचा संसर्ग फैलावण्यासाठी प्रशासनाने नागरिकांना जबाबदार ठरवले आहे. सोशल डिस्टेंसिंगच्या नियमांचे पालन न करणे आणि मास्कचा वापर न करणे यामुळे संसर्ग वाढला असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले. तर, दुसरीकडे नागरिकांनी सरकारवर टीका करताना लसीकरण मोहीम धीम्या गतीने सुरू असल्याने संसर्ग फैलावला असल्याचे म्हटले आहे.

वाचा:करोनाची पहिली लाट ‘या’ देशांनी थोपवली, पण डेल्टाने वाढवली चिंता!

इराणमध्ये सध्या करोनाची पाचवी लाट सुरू असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले. येत्या काही दिवसांत करोनाचे थैमान आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे आरोग्य खात्याने म्हटले. येत्या काही दिवसांत करोनाचे संकट मोठे असणार असल्याचे इराण सरकारने म्हटले. इराणमध्ये लस तुटवडा असल्याने लसीकरण मोहिमेवर त्याचा परिणाम झाला आहे.

करोनानंतर चीनमध्ये ‘या’ आजाराचा धोका; रुग्ण आढळल्याने चिंता वाढली
करोना परिस्थिती हाताळण्यात हलगर्जीपणा; ३० अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा
जवळपास ८.३ कोटी लोकसंख्या असलेल्या इराणमध्ये आतापर्यंत चार टक्के लोकांचे लसीकरण झाले आहे. इराणमध्ये करोनाच्या संसर्गाने आतापर्यंत ९४ हजारजणांचा मृत्यू झाला आहे. तर, मागील एका दिवसात ४० हजार बाधित आणि ५८८ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#य #दशत #करनच #हहकर #दर #दन #मनटल #एकच #मतय

RELATED ARTICLES

विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी सुनील प्रभूंकडून व्हीप जारी, बंडखोर काय करणार?

मुंबंई, 2 जुलै : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन शिवसेनेतील संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील मुख्य...

PHOTO : हॉट फोटो शेअर करत दिशा पाटणीने वाढवला सोशल मीडियाचा पारा!

PHOTO : हॉट फोटो शेअर करत दिशा पाटणीने वाढवला सोशल मीडियाचा पारा! अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

Shocking! प्रायव्हेट पार्टमध्ये असं काही केलं इंजेक्ट, तरुणाचा दुर्देवी मृत्यू!

28 वर्षांच्या तरुणाच्या मृत्यूमुळे त्याच्या आईला जबर धक्का बसला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

Most Popular

IND vs ENG, 5th Test : कसोटी सामन्यावर पावसाचे सावट, दुसऱ्या दिवशी उशिराने मॅच सुरु होण्याची शक्यता

टीम इंडिया आणि इग्लंडमध्ये पाचवा आणि शेवटचा सामना एजबॅस्टनमध्ये खेळवला जात आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

तब्बल 2500 कर्मचाऱ्यांना कामावरून का काढलं? Byju’s नं अखेर सांगितलं मोठं कारण

मुंबई, 01 जुलै: 27 जून रोजी संध्याकाळी बायजूस कंपनीनं (Byjus Company) त्यांच्या कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दिला. काही कर्मचाऱ्यांना त्यांच्या व्यवस्थापक आणि एचआरचे फोन...

सैफचा लेक नाही, तर पलक तिवारी ‘या’ अभिनेत्याला करतेय डेट

लेकीच्या अफेअरबद्दल श्वेता तिवारीला कल्पना? इब्राहीम खान नाही, तर 'या' अभिनेत्याला करते डेट   अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...

Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 2 जुलै 2022 : शनिवार : ABP Majha

<p>Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 2 जुलै 2022 : शनिवार : ABP Majha</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

पुरूषांपेक्षा महिलांना ‘या’आजाराचा धोका सर्वाधिक, कर्करोगापेक्षा याची जोखीम दुप्पट, यामागची कारणं अतिशय धक्कादायक

महिला आणि पुरूष हे लिंग विभिन्न असले तरीही निरोगी, सुदृढ आरोग्य दोघांसाठीही महत्वाचे आहे. अनेकदा कामाच्या ओढाताणान आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलं जातं. मात्र...

sacred games actress kubra sait got pregnant after one night stand | वन नाइट स्टँड, प्रेग्नंसी आणि गर्भपात; ‘सेक्रेड गेम्स’ फेम कुब्रा सैतचा धक्कादायक...

वेब सीरिज ‘सेक्रेड गेम्स’ अभिनेत्री कुब्रा सैतचं पुस्तक ‘ओपन बुकः नॉट क्वाइट ए मेमॉयर’ अलिकडेच लॉन्च झालं. या पुस्तकात तिने तिच्या आयुष्यातील अनेक...