Saturday, May 21, 2022
Home करमणूक "यावर तुझं नियंत्रण नाही..." लेक सुहानासाठी शाहरुखनं लिहिलेली पोस्ट चर्चेत | shah...

“यावर तुझं नियंत्रण नाही…” लेक सुहानासाठी शाहरुखनं लिहिलेली पोस्ट चर्चेत | shah rukh khan wrote emotional post for daughter suhana khan after the archies first look releaseबॉलिवूड किंग शाहरुख खानची मुलगी सुहाना खान लवकरच दिग्दर्शक झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लुक नुकताच समोर आला आहे. झोया अख्तरचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात लोकप्रिय कॉमिक बुक ‘द आर्चीज’चं देसी व्हर्जन पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचा फर्स्ट लुक प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेता शाहरुख खाननं त्याच्या लेकीसाठी खास पोस्ट लिहिली आहे.

सुहाना खानसाठी आजचा दिवस खास आहे. या दिवशी शाहरुखनं तिच्यासाठी खास नोट शेअर केली आहे. त्यानं लिहिलं, “सुहाना लक्षात ठेव. तू कधीच परफेक्ट असणार नाहीस. पण तू फक्त तू आहेस. नेहमीच दयाळू राहा आणि एक कलाकार म्हणून तुला जे शक्य असेल ते सर्व दे… तुझ्यावर टीका केली जाईल, तुझं कौतुक होईल पण यावर तुझं नियंत्रण असणार नाही. तुमचा जो अर्धा भाग पडद्यावर सुटतो तो नेहमीच तुमचा असतो… तुला अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे. लोकांच्या हृदयापर्यंत जाणाऱ्या रस्त्याला अंत नाही. त्यामुळे पुढे जात राहा. जेवढं शक्य असेल हसत राहा. आता लाइट कॅमेरा अॅक्शन होऊन जाऊ दे. एका दुसऱ्या कलाकाराकडून”

आणखी वाचा- “पतीच्या विवाहबाह्य संबंधांमुळे मी एकटी पडले होते अन्…” मुमताज यांचा धक्कादायक खुलासा

याशिवाय सुहाना खानची आई गौरी खाननं देखील तिच्या मुलीसाठी एक प्रेमळ पोस्ट लिहिली होती. आपल्या इन्स्टाग्रामवर सुहानाच्या चित्रपटाचं पोस्टर शेअर करताना तिने लिहिलं, “सुहाना अखेर तू करून दाखवलंस” आपल्या या पोस्टमध्ये गौरीनं सर्व स्टारकास्टला शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच तिनं या पोस्टमध्ये झोया अख्तरचं कौतुक केलं आहे.

आणखी वाचा- “मला स्पष्टीकरण द्यायची गरज नाही…” रणवीर सिंगचं टीकाकारांना सडेतोड उत्तर

प्रसिद्ध दिग्दर्शक झोया अख्तरच्या या चित्रपटात सुहाना खान, खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा या स्टार किड्ससोबतच अभिनेत्री डॉट, मिहिर आहूजा, वेदांग रैना, युवराज मेंडा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजेच २०२३ मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट कॉमिक बुकमधील पात्र आर्ची एंड्रयूज आणि त्याचे मित्र यावर आधारित आहे. या चित्रपटात झोया अख्तरनं कॉमिक बुकमधील पात्रांना भारतीय लुक देण्याचा प्रयत्न केला आहे.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#यवर #तझ #नयतरण #नह #लक #सहनसठ #शहरखन #लहलल #पसट #चरचत #shah #rukh #khan #wrote #emotional #post #daughter #suhana #khan #archies #release

RELATED ARTICLES

नवाब मलिकांचं मंत्रिपद वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंची भागीदारी; किरीट सोमय्यांचा घणाघात

BJP Leader Kirit Somaiya On Nawab Malik : राष्ट्रवादी (NCP) नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचे...

”भारतातील परिस्थिती चांगली नाही”,लंडनमध्ये जाऊन राहुल गांधींचा BJP वर हल्लाबोल

लंडन, 21 मे: काँग्रेस (Congress) पक्षाची सध्याची स्थिती फारशी चांगली नाही. गुजरातमध्ये तर विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकण्यास सुरुवात केली आहे....

आता Traffic पोलीस थांबवू शकणार नाहीत Car, चेकिंगही करणार नाही; काय आहे नवा आदेश

नवी दिल्ली, 21 मे : जर तुम्ही कार चालवत असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी (Car Driving) महत्त्वाची आहे. सरकारने ट्रॅफिकबाबत नवे नियम लागू...

Most Popular

छातीत दुखण्याची ही आहेत 5 कारणं; वेळीच सावध व्हा !

Chest Pain Recognization : आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेक कारणांमुळे शारीरिक समस्या उद्भवू लागतात. अचानक सांधे दुखू लागतात, मानेचा...

Nashik CNG Rate : नाशिकमध्ये मध्यरात्रीपासून सीएनजी दरात ३ रुपयांनी वाढ

Nashik CNG Rate : नाशिककरांसाठी (Nashik) मोठी बातमी असून शहरात मध्यरात्रीपासून सीएनजीचे (CNG Rate Increased) दर प्रतिकिलो 3...

नवाब मलिकांचा पाय खोलात?मलिकांनी डी-गँगसोबत मनीलॉन्ड्रिंग केलं,कोर्टाचं निरीक्षण

मुंबई, 21 मे : महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीने (ED) अटक केली आहे. या प्रकरणात...

BMC Election 2022 : आपनं कंबर कसली; दिल्ली, पंजाबनंतर आता मुंबई जिंकण्यासाठी सज्ज

Mumbai Mahapalika Election 2022 : संपुर्ण देशाचं लक्ष लागलेलं शहर म्हणजे मुंबई (Mumbai) शहर. या मुंबई शहरात आगामी...

TOP 25 : महत्त्वाच्या 25 बातम्यांचा वेगवान आढावा 21 मे 2022 : ABP Majha

इंडियन प्रीमियर लीग, 2022 | सामना 69 | वानखेडे स्टेडियम, मुंबई - 21 May, 07:30...

माणसांपेक्षाही संवेदनशील हत्ती, मृत्यूनंतरही एकटं सोडत नाही; रिसर्चमधून खुलासा

या हत्तींकडून माणसानं शिकायला हवं... जिवंतपणीच नाही तर मृत्यूनंतरही कशी साथ निभावायची अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...