Saturday, August 13, 2022
Home लाईफस्टाईल ‘...म्हणून आम्हाला काहीच फरक पडत नाही’ हॉट अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडचं सडेतोड उत्तर, सगळ्यांचीच...

‘…म्हणून आम्हाला काहीच फरक पडत नाही’ हॉट अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडचं सडेतोड उत्तर, सगळ्यांचीच केली बोलती बंद


प्रेमामध्ये सगळं काही माफ असतं असं बोललं जातं. प्रेम व्यक्ती पाहून केलं जात नाही तर त्याचा स्वभाव, वागणूक पाहून केलं जातं. एकमेकांच्या प्रेमामध्ये आकंठ बुडालेल्या दोन व्यक्तींना इतर कोणत्या गोष्टींचा विचार करण्याची गरजच भासत नाही. दोन वेगवेगळ्या धर्मामधील किंवा जातीमधील व्यक्तींमध्ये जर प्रेम भावना निर्माण होत असेल तर त्यामध्ये गैर असे काहीच नाही. पण दोन वेगवेगळ्य जातीच्या आणि धर्माच्या जोडप्यांना समाजाकडून बरंच काही ऐकावं लागतं. शिवाय त्यांच्या कुटुंबियांबाबत देखील चर्चा होते.

यामुळे बरीच जोडपी विभक्त देखील होतात. जर तुम्ही एखाद्या दुसऱ्या धर्माच्या व्यक्तीवर प्रेम करत असाल तर नात्यामध्ये नेहमी वेगवेगळ्या धर्माबाबत चर्चा होते. यादरम्यान दोन व्यक्तींमध्ये मतभेद निर्माण होण्याची देखील शक्यता असते. पण अभिनेत्री हिना खान (Hina Khan) आणि तिचा बॉयफ्रेंड रॉकी जैस्वाल (Rocky Jaiswal) याला अपवाद आहेत. रॉकीने हिनाबरोबर असणारं त्याचं नातं याबाबत मोठा खुलासा केला आहे. हे ऐकून अनेकांच्या आश्चर्याचा धक्काच बसला आहे.
(फोटो सौजन्य – इंडिया टाइम्स)

​एक नवा अनुभव

गेल्या काही वर्षांपासून अभिनेत्री हिना खान आणि तिचा बॉयफ्रेंड रॉकी जैस्वाल एकमेकांना डेट करत आहेत. अलिकडेच एका मुलाखतीदरम्यान रॉकीने त्याच्या नात्याबाबत पहिल्यांदाच खुलेपणाने बोलणं पसंत केलं. रॉकी या मुलाखतीमध्ये म्हणाला, ‘जेव्हा दोन व्यक्तींना एकत्र राहायचं असतं तेव्हा तुम्ही कोणत्या वातावरणामध्ये वाढलेला आहात याचा काहीच फरक पडत नाही. याउलट वाढत्या वयामध्ये तुम्ही कशाप्रकारे निर्णय घेत आहात हे महत्त्वाचं असतं. जेव्हा दोन व्यक्तींमध्ये मतभेद होतात तेव्हा एक नवा अनुभव मिळतो. आणि तुम्ही पहिल्यापेक्षा अधिक चांगले बनता.’

(‘आता मी सगळं स्वीकारलंय’ आयुष्यभर नवऱ्यासाठी हेमा मालिनी यांना सहन करावी लागली ‘ही’ गोष्ट)

​‘आम्हाला काहीच फरक पडत नाही’

रॉकीने पुढे बोलताना सांगितले की, ‘जेव्हा दोन व्यक्तींचे विचार एकमेकांशी जुळतात तेव्हा एकत्र राहणं फायदेशीर ठरतं. हिना आणि मी आम्ही दोघंही एकमेकांशी संवाद साधण्यास सक्षम आहोत. त्यामुळे आम्हाला इतर कोणत्या गोष्टीचा फरक पडत नाही. आम्ही एकमेकांसाठी अगदी पाण्यासारखे पारदर्शक आहोत. तसेच आमचं एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे. आमच्यामध्ये दोन संस्कृतीचा जो फरक आहे हाच फरक आमची खरी ताकद आहे. आम्ही दोन्ही बाजू चांगल्या पद्धतीने समजून घेतो.’ यावरुनच हिना-रॉकीमध्ये किती प्रेम आहे हे स्पष्टपणे दिसून येतं.

(‘पैसे होते म्हणून घटस्फोट घेऊ शकले’ लग्न मोडताच ‘काटा लगा’ फेम हॉट अभिनेत्रीने केलं अजब वक्तव्य)

​विचारांमध्ये फरक

प्रेमामध्ये जात, धर्म पाहिलं जात नाही असं नेहमीच बोललं जातं. पण जेव्हा दोन धर्माचे किंवा जातीच्या व्यक्ती नात्यामध्ये येतात तेव्हा बऱ्याचदा त्यांच्यामध्ये मतभेद देखील पाहायला मिळतात. काहींच्या विचारांमध्येही फरक जाणवायला लागतो. अशावेळी नात्यामध्ये वाद निर्माण होतात. तुम्ही तुमच्या जोडीदाराला समजून घेत नाही असं फार कमी वेळा घडतं. पण जेव्हा तुमच्या नात्यावर समाजामधून टिका करण्यात येते तेव्हा तुमचं प्रेम देखील कमकूवत होत जातं. पण हिना-रॉकी याला अपवाद आहेत. हे दोघं एकत्र आल्यानंतर त्यांना लोकांकडून अनेक टोमणे ऐकावे लागले. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष करत एकत्र राहण्याचा निर्णय घेतला.

(अर्जुन-जान्हवी कपूरचं नातं अजूनही तसंच आहे का? एकमेकांचं तोंड न पाहणाऱ्या सावत्र बहिणीबाबत अभिनेता म्हणतो…)

सन्मान न करणे

वेगवेगळ्या धर्माच्या दोन व्यक्ती जेव्हा प्रेमात पडतात तेव्हा आपला धर्म सोडून इतर धर्माचा सन्मान करणं त्यांना कठीण होऊन बसतं. खरं तर नातं हे सन्मानावर टिकून असतं. अशावेळी तुम्ही तुमच्या जोडीदाराला आणि त्याच्या धर्माला सन्मान देत नसाल तर नात्यामध्ये कटूता निर्माण होण्याची शक्यता असते. तुम्हाला जर इतर धर्माबाबत एखादी गोष्ट पटत नसेल तर तुम्ही जोडीदाराला त्याबद्दल ऐकवता. यामुळे नात्यामध्ये वाद निर्माण होतात. अशावेळी जोडीदाराचं मत जाणून घ्या. त्याच्याशी संवाद साधा. आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाचा सन्मान करायला शिका.

(बायकोची दहशत! ‘मी असं केलं तर…’ पत्नीला प्रचंड घाबरतो सैफ अली खान, विचारलेल्या ‘त्या’ प्रश्नावर म्हणतो…)

​दोन्ही पद्धतीने लग्न करा

वेगवेगळ्या धर्माच्या दोन व्यक्ती जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांच्या नात्याची खरी परीक्षा असते. काहीजणं आपल्या जोडीदाराला साथ देत आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतात. आणि लग्न करतात. पण लक्षात ठेवा जर तुम्ही लग्नाचा निर्णय घेत असाल तेव्हा दोन्ही पद्धतीने विवाह करा. यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे जेव्हा लग्न करण्याची वेळ येते तेव्हा दोन्ही कुटुंबामध्ये मतभेद देखील निर्माण होऊ शकतात. यामुळे दोन्ही पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला तर सगळं काही सुखकर होऊ शकतं.

(अंकिता लोखंडेचा बॉयफ्रेंडसोबतचा रोमँटिक व्हिडिओ व्हायरल, प्रत्येक क्षणी तुझी साथ देईन म्हणत दिली प्रेमाची कबुली)अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#महणन #आमहल #कहच #फरक #पडत #नह #हट #अभनतरचय #बयफरडच #सडतड #उततर #सगळयचच #कल #बलत #बद

RELATED ARTICLES

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

सार्वजनिक ठिकाणी कपल झालं आऊट ऑफ कंट्रोल, व्हिडिओ झाला व्हायरल

सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करणं एका जोडप्याला चांगलंच भोवलं आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली...

राजू श्रीवास्तवची 48 तासांपासून जीवनाशी झुंज; कुटुंबाकडून आली महत्त्वाची अपडेट

नवी दिल्ली, 12 ऑगस्ट : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यानं त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची...

Most Popular

असा साजरा केला सनी लिओनीने रक्षाबंधनाचा सण, जाणून घ्या कोण आहे या अभिनेत्रीचा भाऊ!

असा साजरा केला सनी लिओनीने रक्षाबंधनाचा सण, जाणून घ्या कोण आहे या अभिनेत्रीचा भाऊ! अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

Pune Mumbai Railway Stranded Landslide : पुणे-मुंबई लोहमार्गावर दरड कोसळली, रेल्वे वाहतूक विस्कळीत

<p>मुंबई, पुण्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी... खंडाळा आणि लोणावळ्यादरम्यान दरड कोसळल्यानं पुण्याहून मुंबईच्या दिशेनं होणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.. दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर...

मुली त्यांच्या बॉयफ्रेंडपासून लपवतात या 4 गोष्टी, पाहून तुम्हीही हैराण व्हाल

मुंबई : मुलींच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास आक्षेप असू शकतात, परंतु त्यांच्या नात्यात अशी अनेक वळणे येतात, जिथे मुली अनेकदा अनेक रहस्ये लपवण्याचा...

‘शेरशाह’ चित्रपटाला एक वर्ष पूर्ण! कियाराने दिल्या हटके शुभेच्छा, म्हणाली ‘सिद्धार्थ तू तर…’

Sidharth Malhotra, Kiara Advani : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) यांच्या...

हर घर तिंरगा: इरफान पठाणचा देशवासियांना खास संदेश, VIDEO होतोय व्हायरल

देशभरात हर घर तिरंगा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. य़ामध्ए अनेक सेलिब्रिटींनी देखील सहभाग घेतला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित...

Pune : पुणे – मुंबई लोहमार्गावर दरड कोसळली, रेल्वे वाहतुकीवर कसा परिणाम?

<p>पुणे-मुंबई लोहमार्गावर दरड कोसळली आहे. मंकीहील ते ठाकूरवाडी दरम्यान ही घटना मध्यरात्री घडलेली असून, अद्याप दरड हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.&nbsp;<br />अप...