Thursday, July 7, 2022
Home टेक-गॅजेट मोबाइल स्क्रिनवर दिसेल कॉलरचं KYC आधारित नाव, TRAI कडून नव्या सिस्टमवर काम...

मोबाइल स्क्रिनवर दिसेल कॉलरचं KYC आधारित नाव, TRAI कडून नव्या सिस्टमवर काम सुरू


नवी दिल्ली, 21 मे : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) लवकरच एका नव्या सिस्टमवर काम सुरू करणार आहे. या सिस्टममध्ये कॉलरचे अर्थात कॉल करणाऱ्या व्यक्तीचं KYC आधारित नाव फोन स्क्रीनवर दिसेल. ट्रायचे अध्यक्ष पीडी वाघेला यांनी सांगितलं, की हे सिस्टम सुरू करण्यासाठी पुढील दोन महिन्यात चर्चा सुरू होऊ शकते. ट्रायला या सिस्टमवर चर्चा सुरू करण्यात दूरसंचार विभागाकडून संकेतही मिळाले आहेत.

ज्यावेळी कोणी कॉल करेल त्यावेळी त्याचं मोबाइल कंपन्यांकडून केलं गेलेलं केव्हायसी आधारित नाव मोबाइलवर स्क्रिनवर येईल. हे सिस्टम दूरसंचार विभागाच्या नियमांनुसार, दूरसंचार कंपन्यांकडून केल्या गेलेल्या केव्हायसीनुसार कॉल करणाऱ्यांचं नाव मोबाइल स्क्रिनवर दाखवण्यास सक्षम असेल. नव्या सिस्टममुळे KYC आधारित ओळख करण्यास मदत होईल. हे सिस्टम कॉलरची ओळख किंवा नाव दाखवणाऱ्या काही Apps पेक्षा अधिक अचूकता आणि पारदर्शकता आणेल.

हे वाचा – डेटा लीक करणाऱ्या फेक वेबसाइटपासून सावधान, या गोष्टींकडे लक्ष द्या

या केव्हायसी आधारित नव्या सिस्टमसाठी ब्लू प्रिंट तयार झाल्यानंतर ओळख अधिक स्पष्ट आणि कायदेशीर रुपात मान्य होईल. याचा परिणाम म्हणजे युजर्सची फसवणूक टळेल. तसंच क्राउडसोर्सिंग Apps वर डेटा क्लिअर होईल.

हे वाचा – भारतीयांना दररोज किती Spam Call येतात? रिपोर्टमधून झाला खुलासा

पीडी वाघेला यांनी सांगितलं, की लवकरच या सिस्टमवर काम सुरू केलं जाईल. ज्यावेळी कोणी कॉल करेल त्यावेळी त्याचं केव्हायसी आधारित नाव मोबाइल स्क्रिनवर येईल. ट्राय आधीपासूनच या सिस्टमवर काम करण्यासाठी विचार करत आहे. आता दूरसंचार विभागाच्या विशेष सल्ल्यानंतर यावर लवकरच काम केलं जाईल असं ट्रायचे अध्यक्ष पीडी वाघेला यांनी सांगितलं

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#मबइल #सकरनवर #दसल #कलरच #KYC #आधरत #नव #TRAI #कडन #नवय #ससटमवर #कम #सर

RELATED ARTICLES

कोच बदलल्यानंतर टीम इंडियाची कामगिरीही बदलली, राहुल द्रविड का आलाय निशाण्यावर?

मुंबई, 6 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये टीम इंडियाची (India vs England 5th Test) कामगिरी निराशाजनक झाली आहे. चौथ्या इनिंगमध्ये इंग्लंडला विजयासाठी 378...

एक-दोन नाही 38 खून मीच केले’; जामकरसमोर कबुली देणाऱ्या अजितची नवी खेळी?

मुंबई 6 जुलै: झी मराठीवरील (Zee Marathi) देवमाणूस 2 (Devmanus 2) ही मालिका सध्या वेगवेगळ्या ट्विस्टने भरून गेली आहे. एकीकडे डिम्पल आणि डॉक्टर...

पीटी उषा, इलैयाराजांसह 4 दिग्गज राज्यसभेत, पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली, 6 जुलै : भारताची महान ऍथलीट पीटी उषा (PT Usha) यांची राज्यसभा खासदार (Rajya Sabha Nominated) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे....

Most Popular

जबरदस्त! धोनीच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी उभारला चक्क 41 फुटांचा CUTOUT

मुंबई, 6 जून : भारतीय क्रिकेट टीममधील सर्व कर्णधारांपैकी महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) सर्वात यशस्वी कर्णधार मानला जातो. त्याचा उद्या (7 जुलै)...

IND vs ENG Test Series: भारतीय संघात होणार मोठे बदल? द्रविड गुरुजींच्या वक्तव्याने वाढली खेळाडूंची चिंता

एजबस्टन येथे झालेल्या कसोटी सामन्यात भारताला इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागला. या कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये ऋषभ पंत आणि रविंद्र जडेजा वगळता इतर फलंदाजांनी निराशाजनक...

चार हात चार पाय असलेल्या मुलाचा जन्म, अन् देवच प्रकट झाला म्हणत लोकांची पाहण्यासाठी गर्दी!

Hardoi : उत्तर प्रदेशातील हरदोई येथे एका महिलेने चार पाय आणि चार हात असलेल्या मुलाला जन्म दिला आहे....

… अशी करा खमंग आणि कुरकुरीत चकली, चव लक्षातच राहणार! Recipe

सणासुदीच्या दिवशी आपण चकली खातोच, पण पावसाळा आला की, गरम-गरम चहासोबत कुरकुरीत चकली खायला मिळणं, एक पर्वणीच असते. साऊथ इंडियामध्ये 'मुरुक्कू', गुजरातमध्ये 'चक्री'...

रोहितला डच्चू शिखर धवन नवा कॅप्टन, BCCI ने चालवलेय काय? मीम्समधून उडवली जातेय खिल्ली

वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी कसा आहे?शिखर धवन (कर्णधार), रविंद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दिपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर)...