Friday, August 12, 2022
Home भारत मोठी बातमी! शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, या विषयांवर झाली महत्त्वाची...

मोठी बातमी! शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, या विषयांवर झाली महत्त्वाची चर्चा


नवी दिल्ली, 03 ऑगस्ट: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि यांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली. या बैठकीमध्ये जयप्रकाश दांडेगावकर, प्रकाश नाईक नवरे, सुनील तटकरे देखील उपस्थित होते. केंद्रीय सहकार मंत्री पदाची धुरा सांभाळल्यानंतर अमित शाह यांनी पहिल्यांदाज आज शरद पवारांची भेट घेतली. या बैठकीत महत्त्वाचे म्हणजे, रायगडमध्ये ‘एनडीआरएफ’ केंद्राबाबत आणि NDRF च्या काही नियमांमध्ये आवश्यक बदलासंदर्भात चर्चा झाली. या बैठकीतील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे साखरेची विक्री किंमत वाढवण्याची मागणी करण्यात आली.
एकीकडे आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी विरोधी पक्षांना एकत्र करत मोदी सरकारला घेरण्यासाठी रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. राहुल गांधी यांनी देशातील विरोधी पक्षांच्या खासदारांची एक बैठक बोलावली होती. राहुल गांधींच्या ब्रेकफास्ट डिप्लोमसीची चर्चा सुरू असतानाच शरद पवार-अमित शहा बैठकीमुळे चर्चांना उधाण आलं आहे. राहुल गांधींनी बोलावलेल्या बैठकीत देशातील 14 पक्षांचे जवळपास 100 खासदार उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे.
बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे
या बैठकीत साखरेची विक्री किंमत वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच इथेनॉल मिश्रणाला प्रोत्साहन देण्याची मागणी अमित शहांकडे करण्यात आली. यावेळी गृहमंत्र्यांनी अशी माहिती दिली आहे की, लवकरच सरकार इथेनॉलबाबत नवीन धोरण आणण्याच्या विचारात आहे.
दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रायगडमध्ये एनडीआरएफ केंद्र उभारण्यासाठी आणि पूर आणि वादळातील विनाशापासून सुटका करण्यासाठी एनडीआरएफच्या नियमांमध्ये बदल करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.

Published by:Janhavi Bhatkar

First published:अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#मठ #बतम #शरद #पवर #आज #अमत #शहचय #भटल #य #वषयवर #झल #महततवच #चरच

RELATED ARTICLES

आशिया खंडातील दुसऱ्या सगळ्यात मोठ्या होर्डिंगवर झळकलं दगडी चाळ 2 चं पोस्टर

मुंबई, 12 ऑगस्ट-   मराठी चित्रपटांची सध्या चांगलीच हवा दिसून येत आहे. नुकतंच 'चंद्रमुखी' या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान चित्रपटाचं पोस्टर चक्क विमानावर झळकलं...

सर्वसामान्य दाम्पत्याची ‘असामान्य’ कहाणी; दत्तक मुलीचा आज सर्वानाच अभिमान

गांधीनगर, 12 ऑगस्ट : अनेकजण विरोध झुगारुन असे काही निर्णय घेतात की कालांतराने ते समाजासाठी एक आदर्श उदाहरण बनतात. ही माणसं समाजात आपली...

कोयना धरणाचे 6 वक्री दरवाजे दीड फुटांनी उचलले, 10 हजार 100 क्युसेकने नदीत पाण्याचा विसर्ग 

Koyna Dam : कोयना धरणाची पाणीपातळी 2 हजार 147 फुटांवर गेली असून एकूण पाणीसाठा 85.31 टीएमसी झाला आहे....

Most Popular

पुणे-मुंबई लोहमार्गावर दरड कोसळली; मुंबईकडे येणारी रेल्वे वाहतूक ठप्प

Land Slide on Pune Mumbai Railway : खंडाळा आणि लोणावळ्यादरम्यान दरड कोसळल्यानं पुण्याहून मुंबईच्या दिशेनं होणारी रेल्वे वाहतूक ठप्प...

Nokia मोबाईलची पुन्हा धमाकेदार एन्ट्री! एकदम तगडा 5G Smartphone, मोठा बॅटरी बॅकअप आणि जबरदस्त लूक

मुंबई : Nokia Smartphone : नोकिया बाजारात पुन्हा धमाका करण्याची तयारी करीत आहे. नोकिया नेक्स्ट सीरीजचा फोन आणत आहे. हा  5G Smartphone असणार...

डायमंड लीग अ‍ॅथलेटिक्स : श्रीशंकरला सहावा क्रमांक

मोनॅको : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेता लांब उडीपटू मुरली श्रीशंकरला पदार्पणीय डायमंड लीग अ‍ॅथलेटिक्समध्ये सहावा क्रमांक मिळवत निराशा केली. ७.९४ मीटर ही...

श्रावणात केले जाते जरा-जिवंतिकेचे पूजन; जाणून घ्या पूजा विधी आणि महत्त्व

Jara Jivantika Puja 2022 : श्रावण (Shravan 2022) महिना हा हिंदू पंचांगानुसार वर्षातला पाचवा महिना. श्रावण महिन्याला सुरुवात...

पुणे, कोल्हापूरसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी, आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात यलो अलर्ट

Maharashtra Rain : सध्या राज्यात जोरदार पाऊस (Rain) कोसळताना दिसत आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आले आहेत....

Pune : पुण्यात मुसळधार, खडकवासलातून विसर्ग कमी केल्याने पुणेकरांना काहीसा दिलासा

<p>पुण्यात खडकवासला धरणातून सुरु असलेला विसर्ग कमी करण्यात आलाय... मुसळधार पावसामुळे काल खडकवासला धरणातून २६ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. त्यामुळे डेक्कन...