Monday, July 4, 2022
Home भारत मोठी घडामोड; गुवाहाटीमध्ये शिवसेना आमदार असलेल्या हॉटेलबाहेर तृणमूल काँग्रेसचे जोरदार आंदोलन

मोठी घडामोड; गुवाहाटीमध्ये शिवसेना आमदार असलेल्या हॉटेलबाहेर तृणमूल काँग्रेसचे जोरदार आंदोलन


Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्र झालेल्या गुवाहाटीमधील हॉटेल रॅडिसन बाहेर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज आंदोलन केले. आसाममध्ये पूरस्थिती असल्याने लोकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मात्र, आसामचे भाजप सरकार महाराष्ट्रातील आमदारांची बडदास्त ठेवत असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. 

आसाममध्ये आलेल्या पूरामध्ये आसामच्या नागरिकांचे हाल सुरू आहेत. महाराष्ट्रातील राजकीय नाट्याची चिंता न करता आसाम सरकारने राज्यातील नागरिकांची चिंता करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. हॉटेल रॅडिसन ब्लूमध्ये शिवसेना आमदारांचा घोडेबाजार सुरू आहे. त्यासाठी कोट्यवधींचा चुराडा होत आहे. त्यांच्यावर खर्च करण्याऐवजी सरकारने पूरग्रस्तांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली. केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारने आसामच्या नागरिकांना वाऱ्यावर सोडले असल्याचे त्यांनी म्हटले.

आज सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास अचानकपणे हॉटेल रॅडिसन्स बाहेर घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे गोंधळ उडाला. कोणाताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी हॉटेलच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी असलेले पोलीस सतर्क झाले. आसाम सरकारविरोधात आंदोलन करत असलेल्या आंदोलकांना पोलिसांनी त्वरीत ताब्यात घेण्यास सुरुवात केली. हॉटेलमध्ये शिरण्याचा आमचा इरादा नाही. मात्र, केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारचे आसाममधील पूरस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. 

दरम्यान, शिवसेनेच्या आमदारांचे बंड वणव्यासारखे पसरले आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांची संख्या 46 वर पोहचली आहे. रामटेकचे शिवसेना समर्थक आमदार आशिष जैस्वाल यांच्यासह चार आमदार गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. आज आशिष जैस्वाल यांच्यासह सदा सरवणकर, दीपक केसरकर, संजय राठोड, मंगेश कुडाळकर हे आमदार आज शिंदे यांच्या गटात सामिल झाले आहेत. एकनाथ शिंदे आज मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#मठ #घडमड #गवहटमधय #शवसन #आमदर #असललय #हटलबहर #तणमल #कगरसच #जरदर #आदलन

RELATED ARTICLES

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

Most Popular

टरबूजाच्या बिया विवाहित पुरुषांसाठी वरदान, जोडीदाराकडून होईल प्रेमाचा वर्षाव

मुंबई, 3 जुलै : लग्नानंतर शारीरिक कमजोरी (Men's Health) नसेल तर वैवाहिक जीवन आनंदी (Happy Marital Life) होते. त्यामुळे लग्नानंतर शारीरिक कमजोरी (Physical...

स्टोक्सला मिळाल्या दोन लाईफलाईन, पण लॉर्ड ठाकूरने केलं काम तमाम! Video

एजबॅस्टन, 3 जुलै : भारत आणि इंग्लंड (India vs England 5th Test) यांच्यातल्या पाचव्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी बेन स्टोक्स (Ben Stokes) आणि जॉनी...

पाचव्या टेस्टवर टीम इंडियाची पकड, बॉलर्सच्या धमाक्यामुळे 132 रनची आघाडी

एजबॅस्टन, 3 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्ट मॅचवर टीम इंडियाची (India vs England 5th Test) पकड आणखी मजबूत झाली आहे. मॅचच्या तिसऱ्या दिवशी...

ब्रेस्ट मिल्क विक्रीमुळे कंपनी वादात? आईचं दूध विकणारी आशियातील पहिलीच कंपनी

नवी दिल्ली, 3 जुलै : पैशाने बाजारात सगळं मिळतं, पण आई मिळत नाही, असं मराठीत म्हटलं जातं. मात्र, आई मिळत नसली तरी तिचं...

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

IND vs ENG : पुजाराचं अर्धशतक, पंतची साथ, भारताला 257 रनची मोठी आघाडी

एजबॅस्टन, 3 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टच्या तिसऱ्या दिवसाअखेरीस भारताचा (India vs England 5th Test) स्कोअर 125/3 एवढा झाला आहे, त्यामुळे टीम इंडियाची...