Saturday, August 20, 2022
Home विश्व मेटाचा महत्वपूर्ण निर्णय, इंजिनियरच्या भरतीत होणार मोठी कपात, आर्थिक मंदीचा फटका

मेटाचा महत्वपूर्ण निर्णय, इंजिनियरच्या भरतीत होणार मोठी कपात, आर्थिक मंदीचा फटका


META : सोशल मीडिया साईट फेसबुकची मूळ कंपनी मेटानं (Meta) यावर्षी  10 हजार नवीन इंजिनियरची भरती करणार असल्याचे सांगितले होते. मात्र, आता मेटानं आता आपला निर्णय बदलला आहे. मेटाने या वर्षी नोकरभरती मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. मेटानं आता सहा ते सात हजार इंजिनियर कमी भरण्याचे निश्चित केले आहे. म्हणजे 30 टक्के इंजिनियर कमी घेण्याचा निर्णय घेतला आहे. मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी याबाबतची माहिती दिली. तसेच कंपनी काही पदे रिक्त ठेवत आहे. सध्या सुरु असलेल्या आर्थिक मंदीमुळे इंजिनियरची भरती कमी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती देखील झुकेरबर्ग यांनी दिली.

आर्थिक मंदीचा परिणाम

रशिया-युक्रेन युद्ध, डेटा गोपनीयतेतील बदल आणि उद्योगात सुर असलेली मंदी यामुळे आमच्या व्यवसायावर गंभीर परिणाम झाला आहे. फेसबुकचे तिमाही निकालही अपेक्षेपेक्षा कमी होते. त्यामुळे खर्च कमी करण्याला प्राधान्य देत सध्या नवीन नोकरभरती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुरुवातील आपण 10 हजार नवीन इंजिनियरची भरती करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सध्या मंदीची स्थिती आहे. याचा फटका सर्वच क्षेत्राला बसत आहे. त्यामुळं 30 टक्के इंजिनियरची भरती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, मेटाने गेल्या महिन्यातच भरती न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, याबातची सविस्तर माहितीसह आकडेवारी दिली नव्हती. 

नियुक्ती कमी करण्याच्या निर्णयासह कंपनी काही पदे रिक्त ठेवणार आहे. असल्याचंही मार्क झुकेरबर्ग यांनी सांगितलं. तसेच जे कर्मचारी कामाचं आपलं लक्ष्य पूर्ण करत नाहीत त्यांनाही कमी करण्याच्या संदर्भात व्यवस्थापनावर दबाव असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळं तुमच्यापैकी काही जण ठरवतील की ही जागा तुमच्यासाठी आहे की नाही, असेही ते म्हणाले. सध्याचा काळ कठीण आहे. या प्रतिकूल परिस्थितीतून आपण पुढे जात आहोत. सध्या मंदीची स्थिती असल्यामुळं परिणाम होत आहे. त्यामुळं इंजिनियरच्या भरतीत कपात करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती कंपनीचे मुख्य उत्पादन अधिकारी ख्रिस कॉक्स यांनी दिली. आम्ही सध्या अनेक आव्हानांचा सामना करत आहोत. त्यामुळं आमच्याकडं असलेल्या संधींबद्दल सार्वजनिकपणे सांगणे हा मेमोचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या:

 अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#मटच #महतवपरण #नरणय #इजनयरचय #भरतत #हणर #मठ #कपत #आरथक #मदच #फटक

RELATED ARTICLES

धक्कादायक! तुम्ही खात असलेल्या खेकडे आणि माशांचीही होतेय Corona test

मुंबई : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसतेय. दरम्यान यामध्येच आता कोविडचा प्रसार समुद्रातून येणाऱ्या मासे आणि खेकड्यांमुळे होत असल्याचा संशय...

तुम्हालाही रुद्राक्ष धारण करायला आवडते? मग या गोष्टींची घ्या विशेष काळजी

<!-- --><!-- -->Do you also like to wear Rudraksh? Then take special care of these things mhpj - तुम्हालाही रुद्राक्ष धारण...

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज नऊ वर्ष, प्रकरणात आतापर्यंत काय झालं? वाचा सविस्तर…

Dr. Narendra Dabholkar Murder Case : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर (Dr. Narendra Dabholkar) यांच्या...

Most Popular

पत्नी म्हणाली, मी थकलीये तुम्ही भाजी घेऊन या, ऐकल्यावरच पती संतापला अन् भर…

नवी दिल्ली, 19 ऑगस्ट : अनेकदा पती-पत्नीमध्ये छोट्या मोठ्या गोष्टीवरुन वाद होत असतात. मात्र, काही वेळा हे वाद टोकालाही जातात. तसेच यातून अनेकदा...

तुम्हालाही रुद्राक्ष धारण करायला आवडते? मग या गोष्टींची घ्या विशेष काळजी

<!-- --><!-- -->Do you also like to wear Rudraksh? Then take special care of these things mhpj - तुम्हालाही रुद्राक्ष धारण...

आता UKमध्येही सुरू होणार UPI सेवा! हजारो भारतीय विद्यार्थांना होणार फायदा

मुंबई, 19 ऑगस्ट: यूपीआयच्या माध्यमातून भारतात डिजिटल इंडिया अभियानाला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे. अवघ्या काही मिनिटांमध्ये यूपीआय आयडी किंवा कोड स्कॅन करण्याच्या...

भारत-झिम्बाब्वे एकदिवसीय मालिका : राहुल सलामीला उतरणार?; झिम्बाब्वेविरुद्धच्या उर्वरित एकदिवसीय मालिकेत भारताची नवी रणनीती

पीटीआय, हरारे : झिम्बाब्वेविरुद्ध शनिवारी होणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार केएल राहुलला फलंदाजीची संधी मिळेल अशी आशा आहे. याचप्रमाणे उर्वरित दोन एकदिवसीय सामन्यांत...

क्रिकेटपटू विनोद कांबळीवर आर्थिक मदत मागण्याची वेळ का आली?

प्रशांत केणी नामांकित क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या साथीने शालेय जीवनात क्रिकेट कारकीर्दीला प्रारंभ करणाऱ्या विनोद कांबळीची कारकीर्द २०००मध्ये संपुष्टात आली. बेशिस्त, वाद अशा अनेक प्रसंगांमुळे...

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज नऊ वर्ष, प्रकरणात आतापर्यंत काय झालं? वाचा सविस्तर…

Dr. Narendra Dabholkar Murder Case : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर (Dr. Narendra Dabholkar) यांच्या...