Monday, July 4, 2022
Home लाईफस्टाईल मूळव्याधीचा त्रास नकोच असेल तर आहाराची आजपासूनच घ्या अशी काळजी

मूळव्याधीचा त्रास नकोच असेल तर आहाराची आजपासूनच घ्या अशी काळजी


मुंबई, 23 जून : मूळव्याध हा एक असा त्रासदायक आजार आहे की, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला बसून देखील अस्वस्थ वाटतं. यामध्ये बद्धकोष्ठतेचा त्रास देखील सुरू होतो. बद्धकोष्ठता असेल आणि बसण्यासही त्रास होत असेल तर मूळव्याध असू शकतो. या समस्येमध्ये स्टूलमध्ये रक्तस्त्राव होण्याची समस्या असते. यावर वेळीच उपचार न केल्यास प्रकृती बिघडू शकते. NIDDK संशोधनानुसार, गंभीर बद्धकोष्ठतेमध्ये फायबर कमी असलेल्या पदार्थांपासून लांब राहण्याचा सल्ला दिला (Piles diet tips) जातो. परंतु, या परिस्थितीत आहाराचीही मोठी भूमिका असते. त्यामुळे कोणत्या गोष्टी खाव्यात आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात हे माहीत असायला हवे. मुळव्याधीची समस्याही काही प्रमाणात खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवून बरी होऊ शकते आणि त्यामुळे होणारा त्रास टाळता येतो. जाणून घेऊया मूळव्याधीमध्ये कोणते पदार्थ खाणे (Piles Problem) टाळावे.

तळलेले पदार्थ –

तळलेले पदार्थ आरोग्यासाठी चांगले नाहीत. यामुळे पोटात जळजळ होऊ शकते. या गोष्टी खूप जड असतात आणि पचायला खूप वेळ लागतो. त्यामुळे पचनाच्या समस्यांशी संबंधित असलेल्या रुग्णांनीही या गोष्टींपासून दूर राहावे.

मसालेदार पदार्थ –

मूळव्याध झाल्यास मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. त्यामुळे मल पास करताना वेदना होऊ शकतात. त्यामुळे जास्त मसालेदार पदार्थ खाऊ नयेत. यामुळे IBS चा धोका देखील लक्षणीय वाढू शकतो.

दारू पिणे –

अल्कोहोलच्या सेवनाने पचनसंस्थेवरही परिणाम होतो. याचाही विपरीत परिणाम पोटावर होतो. त्यामुळे पचनासही उशीर होतो आणि मल बाहेर पडण्याच्या समस्या दिसून येतात. यामुळे खूप वेदना होऊ शकतात.

हे वाचा – Skin And Hair Care : त्वचा आणि केसांचा तेलकटपणा घालवते तुरटी? वाचा आश्चर्यचकित करणारे फायदे

कच्ची फळे खाणे –

फळे चांगली पक्व होईपर्यंत त्यांचे सेवन करू नये. कच्च्या फळांमध्ये अशी संयुगे असतात जी पोटात जळजळ करतात, ज्यामुळे वेदना आणखी वाढू शकतात. त्यामुळे फळे चांगली पक्व झाल्यावरच खावीत.

हे वाचा – Eye Care : डोळ्यांना खाज आल्यावर चोळू नका; घरच्या घरी करा हे सोपे उपाय

आयरन के सप्लीमेंट –

आयर्न सप्लिमेंट्सचाही आहारात समावेश केल्यास मुळव्याध होण्याचा धोका आणखी वाढू शकतो. काही प्रकारची औषधे आणि लोह सप्लिमेंट्सचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेशी संबंधित इतर दुष्परिणाम होऊ शकतात.

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#मळवयधच #तरस #नकच #असल #तर #आहरच #आजपसनच #घय #अश #कळज

RELATED ARTICLES

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

Most Popular

शिवसेनेचे हिंदूत्व सामान्य माणसाच्या हिताचे..

हर्षल प्रधान शीर्षस्थ नेतृत्व बदलू लागल्यावर भारतीय जनता पक्षाच्या हिंदूत्वाच्या व्याख्येत कमालीचा बदल झालेला आहे. जनसामान्यांचा पक्ष अशी ख्याती असलेल्या भाजपच्या लेखी हिंदूत्व हे...

आरेतील प्रस्तावित मेट्रो कारशेडविरोधात मुंबईत आंदोलन; पाहा फोटो

आरेतील प्रस्तावित मेट्रो कारशेडविरोधात मुंबईत आंदोलन; पाहा फोटो अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित...

SBI कडून मोठा बदल, या नियमांचा तुमच्या व्यवहारावर देखील होऊ शकतो परिणाम

मुंबई :  तुम्हीही देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक SBI चे ग्राहक असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. बँकेने ग्राहकांची सुरक्षितता लक्षात घेऊन...

भाग्यनगर, घराणेशाही ते बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांवर हल्ले, मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद येथील भाजप कार्यकारिणीला संबोधित केलं. यावेळी त्यांनी हैदराबाद शब्दाऐवजी भाग्यनगर असा उल्लेख केला. पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांवर होणाऱ्या...

IND vs ENG : पावसामुळे सामना थांबला, आता किती वाजता सुरु होणार जाणून घ्या…

बर्मिंगहम : पावसामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या सामन्यात पावसामुळे थांबवण्यात आला. त्यावेळी इंग्लंडची ६ बाद २०० अशी स्थिती झाली होती. त्यावेळी भारतीय...