Monday, July 4, 2022
Home लाईफस्टाईल मूल व्हावं म्हणून ही मॉडेल खाते अंडी; डॉक्टरांनी सांगितलं किती प्रभावी आहे...

मूल व्हावं म्हणून ही मॉडेल खाते अंडी; डॉक्टरांनी सांगितलं किती प्रभावी आहे उपाय


वॉशिंग्टन, 22 जून : आई होण्याचं सुख प्रत्येक महिलेला अनुभवायचं असतं. महिलांसाठी हा सर्वात अनमोल असा क्षण असतो. पण काही कारणांमुळे काही महिला या सुखापासून वंचित राहतात. त्या प्रेग्नंट होऊ शकत नाही. मग आपली प्रजननक्षमता वाढवण्यासाठी, मूल व्हावं यासाठी महिला कित्येक उपाय करत असतात. पण एक प्रसिद्ध मॉडेल मूल व्हावं यासाठी दररोज अंडी खाते. तिने आपली फर्टिलिटी वाढवण्यासाठी आयुर्वेदाची मदत घेतली आहे. ही मॉडेल आहे कॉर्टनी कार्दशियन (Kourtney Kardashian eats quail eggs for fertility).
अमेरिकेतील मॉडेल कॉर्टनी आणि तिचा नवरा ट्रेव्हिस बार्कर आईबाबा होण्यासाठी प्रयत्न करत आगेत. कॉर्टनीने आपल्या आयव्हीएफ ट्रिटमेंटबाबत सांगितलं होतं. तिने आपण  फर्टिलिटी वाढवण्यासाठी पंचकर्म थेरेपी घेतल्याचंही सांगितलं.
काही दिवसांपूर्वीच कॉर्टनीने याबाबत खुलासा केला आहे की ती आणि तिचा नवरा फूल बॉडी डिटॉक्सवर होते. सेक्स, एक्सरसाइझ  आणि कॉफी पिणं यापासून दूर होते. त्यांनी पंचकर्म थेरेपी घेतली होती. मूल होण्यासाठी ती दररोज क्वील पक्ष्याची अंडी खाते.

एका शोमध्ये तिला याच पक्ष्याची अंडी का कोंबडीची का नाही खात यावर तिने क्वील पक्ष्याची अंडी गर्भधारणेत मदत करत असल्याचं सांगितलं.
हे वाचा – OMG! एका महिलेने तब्बल 69 मुलांना दिला जन्म; VIRAL PHOTO मागील नेमकं सत्य काय?
बेबी कन्सिव्ह करण्यासाठी ती खास डाएट घेत आहे. यानंतर खरंच या पक्ष्याची अंडी खाल्ल्याने प्रजननक्षमता वाढते का, असा प्रश्न पडला आहे.
क्वील पक्ष्याची अंडी खाल्ल्याने खरंच प्रजननक्षमतेवर परिणाम होतो?
वेब एमडी वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार क्वील पक्ष्याच्या अंडीत प्रोटिन, व्हिटामिन सी आणि व्हिटामिन ए असतं. त्यामुळे ही अंडी मांसपेशी बनवण्यात, पचन वाढवण्यात मदत करतात आणि इम्युनिटी मजबूत करतात. एका अंड्यातून पुरेशा प्रमाणात व्हिटामिन बी12 मिळतं, जे मेटाबॉलिज्म वाढीस मदत करतं आणि मेंदूचं आरोग्य सुधारतं.
काही लोकांच्या मते क्वील पक्ष्याची अंडी लैंगिक आरोग्यासाठी चांगली असल्याचं मानलं आहे. पण ती प्रजननक्षमता वाढवण्यात फायदेशीर आहे, याचे पुरावे नाहीत.  2017 साली डायबिटिक उंदरावर केलेल्या संशोधनत या अंड्यामुळे त्या उंदरात ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेल घटल्याचं आणि टेस्टिकुलर सेल रिपेअरला चालना मिळाल्यासं दिसून आलं.
हे वाचा – बेडरूममध्ये एकटं झोपायला घाबरत होती लेक; कारण समजताच हादरली आई
नवभारत टाइम्सच्या वृत्तानुसार टाइम्स ऑफ इंडियातील एका लेखात आहारतज्ज्ञ तमसीन जॉर्डन यांनी सांगितलं की, क्वील पक्ष्याच्या अंड्याचा प्रजननक्षमतेशी काही संबंध नाही. या अंड्यामुळे गर्भधारणेत मदत होते, यावर अधिक संशोधन करण्याची गरज आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#मल #वहव #महणन #ह #मडल #खत #अड #डकटरन #सगतल #कत #परभव #आह #उपय

RELATED ARTICLES

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

Most Popular

Facebook ची भारतातील 1.75 कोटी पोस्टवर कारवाई, वादग्रस्त कंटेंट हटवला 

facebook took action :  सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकने भारतातील 1.75 कोटी पोस्टवर कारवाई केली आहे. फेसबुकने आपल्या मासिक...

धाडसी प्रयत्न | Effort Movies The story of a scientist Rocketry The Numbi Effect writing directing amy 95

रेश्मा राईकवारएखादा विषय, विचार एकाच वेळी सगळय़ांपर्यंत पोहोचवण्यासाठी चित्रपटासारखे प्रभावी माध्यम नाही. हे लक्षात घेऊन इतिहासाच्या पानात हरवलेले आणि लोकांपर्यंत पोहोचायला हवेत असे...

IND vs ENG : कोहलीचं चिडवणं महागात, बेयरस्टो एकटाच पडला टीम इंडियाला भारी!

एजबॅस्टन, 3 जुलै : इंग्लंडचा बॅट्समन जॉनी बेयरस्टो (Jonny Bairstow) यावर्षी जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. भारताविरुद्धच्या एजबॅस्टन टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये (India vs England 5th...

केस नैसर्गिक पद्धतीने काळे करायचेत? अशा पद्धतीने करा भोपळ्याचा वापर

मुंबई, 2 जुलै : सुंदर केस (Beautiful Hair) आपल्या व्यक्तिमत्वात भर घालत असतात. म्हणूनच आपले केस दीर्घकाळ निरोगी, सुंदर आणि घनदाट राहावेत अशी...

64MP कॅमेरा असलेला हा सॅमसंग फोन आजसाठी फक्त 10 हजारांत उपलब्ध; वाचा स्पेशल ऑफर

Amazone Deal : जर तुम्ही स्वस्त फोनची डील शोधत असाल तर Amazon वर Samsung Galaxy M32 नक्की पहा....