Friday, May 20, 2022
Home भारत मुली झाल्यानं नवऱ्यानं घराबाहेर काढलं! हिंमत न हारता तिनं धरलंय बसचं स्टेरिंग

मुली झाल्यानं नवऱ्यानं घराबाहेर काढलं! हिंमत न हारता तिनं धरलंय बसचं स्टेरिंग


नवी दिल्ली, 14 मे : ‘मी एक मुलगी आहे आणि मला मुलगी म्हणून जगायचं आहे. मला मुलगा म्हणून गाडी चालवायची नाही. माझ्या आई-वडिलांची सात मुली आहेत. मी चौथ्या क्रमांकावर होते. या समाजात मुलींची अशी दुर्दशा आहे की, माझ्याशी लग्न करून मला स्वतःच्या घरी नेणारा, मला दोन मुली असताना रात्री दोन वाजता घराबाहेर काढतो,’ अशी मन हेलावून टाकणारी कहाणी लक्ष्मी सांगते.

त्यावेळी मला मुलगी होणं हा शाप वाटू लागला. पण मी हार मानली नाही. मी माझ्या दृष्टिकोनातून या समाजात राहण्याचा निर्णय घेतला आहे. मुलीही काही करू शकतात, हा आरसा समाजाला दाखवावा लागतो. हे लक्ष्मीचे (वय 30) म्हणणं आहे. ती सध्या अवजड वाहन चालवण्याचे प्रशिक्षण (heavy motor training) घेत आहे.

सध्या, लक्ष्मी बुरारी येथी ड्रायव्हर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, येथे हेवी मोटार वाहनाच्या प्रशिक्षणाच्या शेवटच्या टप्प्यात आहे. ती सफाईदारपणे एका हाताने बसचं स्टेअरिंग सांभाळत असताना, दुसरा हात गिअरवर ठेवून बसचा वेग वाढवताना दिसते. काही दिवसांत लक्ष्मी दिल्लीच्या रस्त्यांवर बस किंवा ट्रक चालवताना दिसली तर आश्चर्य वाटायला नको. लक्ष्मी सांगते की, मी एक चांगली ड्रायव्हर बनू शकेन, यासाठी मी इथे महिनाभर प्रशिक्षण घेत आहे. आता एकच परीक्षा उरली आहे. त्यानंतर मी बस आणि ट्रक चालवू शकते. मी एका वर्षापासून दिल्लीत टॅक्सी चालवत आहे. जेव्हा प्रशिक्षण सुरू होतं, तेव्हा मी पहाटे 3-4 वाजेपर्यंत टॅक्सी चालवायचे. नवभारत टाईम्सच्या माहितीनुसार, ही लक्ष्मीची कहाणी अनेकांना विचार करायला लावणारी आहे.

हे वाचा – विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळ! एकाच खोलीत पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग; अन्..

‘सासरच्या लोकांनी रात्री 2 वाजता मारहाण करून घराबाहेर काढलं’

लक्ष्मी म्हणते, ‘माझ्या आई-वडिलांना मुलगा हवा होता, तो मिळाला नाही. उलट देवाने त्यांना 7 मुली दिल्या. आठवीपर्यंत शिकल्यानंतर माझं लग्न झाल. लग्नानंतर मला पहिली मुलगी झाल्यापासून माझा पती आणि सासरच्या लोकांनी मला मारहाण करण्यास सुरुवात केली. माझं दुसरं मूलदेखील मुलगीच होती. यावर रात्री 2 वाजता सासरच्या लोकांनी मला मारहाण करून घरातून हाकलून दिलं. मग मी ठरवलं की, मी कुटुंबाला आणि समाजाला आरसा दाखवेन आणि दाखवून देईन की, मुलीही खूप काही करू शकतात.

हे वाचा – ”आम्ही कोणाच्या रिमोट कंट्रोलनं…”, Navneet Rana पुन्हा एकदा लाईमलाईटमध्ये

घरखर्च चालवण्यासाठी धुणी-भांडीही केली

लक्ष्मी सांगते की तिने घराघरांमध्ये भांडीही धुतली आहेत. यातून घरचा खर्च भागायचा. पण माझ्या कुटुंबात किंवा समाजात काहीही बदल होऊ शकला नाही. त्यासाठी मी गाडी चालवायला सुरुवात केली. आता मला स्वतःसाठी आणि माझ्या मुलींसाठी काहीतरी करायचं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#मल #झलयन #नवऱयन #घरबहर #कढल #हमत #न #हरत #तन #धरलय #बसच #सटरग

RELATED ARTICLES

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर प्रश्नचिन्ह, दौरा स्थगित होण्याची शक्यता

मुंबई, 20 मे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे 5 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर (Raj Thackeray Ayodhya Tour) जाणार आहेत. मात्र,...

अनशा पोटी हे खाल्लंत तर दररोज पोट होईल साफ; कधीच होणार नाही बद्धकोष्ठतेचा त्रास

दिल्ली, 19 मे: जीवनशैलीतले बदल अनेक व्याधींना आमंत्रण देतात. बदललेल्या जीवनशैलीत (Lifestyle) आहार तर बदलतोच, शिवाय व्यायामाचाही अभाव असतो. खाण्यापिण्याच्या वेळा बदलत असतात....

Heavy Rain: वादळी पावसाचा कहर; 25 जणांचा मृत्यू, सहा बोटी बुडाल्या

पाटणा, 20 मे: बिहारमध्ये गुरुवारी वादळी (storm) पावसाने (Heavy rain) कहर केला. बिहारच्या (Bihar) अनेक भागांमध्ये गुरुवारी 25 ते 60 किमी प्रतितास वेगाने...

Most Popular

केतकीला समज देऊन सोडून दिलं पाहिजे, पंकजा मुंडेंचा राष्ट्रवादीला सल्ला

मुंबई, 19 मे -राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे ( Ketaki Chitale Case...

जागतिक बॉक्सिंग स्पर्धा : निखतची सोनेरी मोहोर | World Boxing Championship Nikhat Golden Bloom Indian boxer Gold medal World Boxing Championships ysh 95

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : भारताची बॉक्सिंगपटू निखत झरीनने (५२ किलो) इस्तंबुल येथे झालेल्या १२व्या महिला जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. जागतिक...

IPL 2022 : ‘उडता मॅक्सी’, डू ऑर डाय सामन्यात मॅक्सवेलने घेतला सुपर कॅच, VIDEO

मुंबई, 19 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) आरसीबी (RCB vs Gujarat Titans) त्यांचा महत्त्वाचा सामना खेळत आहे. प्ले-ऑफच्या (IPL Play Off)...

प्रियांका चोप्राचा दीपिकाला जोरदार झटका…नाव मात्र आलिया, कॅटरिनाचं

प्रियांका चोप्रा सध्या 'जी ले जरा' या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान बोलताना प्रियांकाने दीपिका पदुकोणवर निशाणा लगावलाय   अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी...

सदाभाऊ खोतांच्या ‘जागर शेतकऱ्याचा, आक्रोश महाराष्ट्राचा’ अभियानाचा आज समारोप, फडणवीसांची सभा

Devendra Fadnavis : शेतकरी प्रश्नासंदर्भात सरकारला जाग येण्यासाठी रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी 'जागर...

कांद्याने केला पुन्हा वांदा, देशातील कांदा उत्पादक पुन्हा संकटात; दरात मोठी घसरण

मुंबई, 19 मे : किमान आधारभूत किमतीपेक्षा (msp) 2-4 रुपये किलोने अधिक भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना चांगले दिवस आल्याचे चित्र दिसत आहे परंतु हे...