दुसऱ्या प्रेग्नेंसीदरम्यान गीताला खूप त्रास सहन करावा लागला. यादरम्यान तिला दोन वेळा गर्भपाताला देखील सामोरं जावं लागलं. पण या कठीण काळात तिच्या कुटुंबियांसह पती हरभजन देखील तिच्या मागे खंबीरपणे उभा राहिला. मात्र हा काळ आई म्हणून गीतासाठी फार कठीण होता. तिला शारीरिकदृष्ट्या देखील काही समस्यांचा सामना करावा लागला. तिचा हा अनुभव कसा होता हे जाणून घेऊया. (Geeta Basra Miscarriages)
‘माझ्यासाठी हा काळ कठीण होता’

गीताने तिच्या मुलाखतीमध्ये गर्भपाताबाबत खुलेपणाने बोलणं पसंत केलं. ती म्हणाली, ‘दोन वेळा गर्भपात होणं माझ्यासाठी कठीण होतं. पण मी आत्मविश्वास गमावला नाही. हिंमत ठेवली. त्याचबरोबरीने कमकुवत झाली नाही. गर्भपातानंतर मी सासू-सासऱ्यांबरोबर पंजाबमध्ये गेले. तिथे कुटुंबियांबरोबरच राहिले. कुटुंबाची साथ मिळाली म्हणून गर्भपाताच्या दुःखामधून मी बाहेर पडू शकले. तिथेच असताना मला माझ्या चौथ्या प्रेग्नेंसीबाबत कळालं. म्हणून पहिल्या ट्रायमेस्टरपर्यंत मी कुटुंबाबरोबरच राहण्याचा निर्णय घेतला.’ गीताचा हा अनुभव अंगावर काटा आणणारा होता.
(वयाच्या चाळीशीमध्ये नेहा धुपिया पुन्हा बनणार आई, दुसऱ्या प्रेग्नेंसीचं प्लॅनिंग लगेचंच करणं योग्य आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत)
पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये काळजी घेणं गरजेचं

गीता सांगते की, ‘माझे दोन्ही गर्भपात हे पहिल्या ट्रायमेस्टरमध्येच झाले. म्हणूनच चौथ्या प्रेग्नेंसीदरम्यान मी स्वतःची खूप काळजी घेतली. प्रेग्नेंसीचे पहिले तीन महिने पूर्ण होईपर्यंत मी पंजाबमध्येच थांबले. आणि त्यानंतर मी मुंबईमधील आमच्या राहत्या घरी आले. तसेच इथे असताना देखील स्वतःला शारीरिक तसेच मानसिक रित्या फिट ठेवण्याचा मी प्रयत्न केला. स्वतःची योग्य ती काळजी घेतली.’ गीताचा पहिला गर्भपात २०१९मध्ये झाला. तर दुसरा गर्भपात २०२०मध्ये झाला. गर्भपात झाल्यावर सर्वाधिक दुःख हे इतर कोणाच्या तुलनेमध्ये आईला जास्त होतं असं गीताने स्पष्टपणे सांगितलं. तिच्यासाठी हा अनुभव अगदी वेदनादायी होता.
(Baby Development : लक्ष द्या, ‘या’ गोष्टी २ महिन्यांची मुलं करत नसतील तर पालकांनी वेळीच घ्यावा डॉक्टरांचा सल्ला)
गर्भपात म्हणजे काय?

प्रेग्नेंसीला २० आठवडे पूर्ण होऊन गर्भातच बाळाचा मृत्यु होणे म्हणजे गर्भपात. जवळपास १० ते २० टक्के महिलांना गर्भपाताचा सामना करावा लागतो. अनियंत्रित मधुमेह किंवा इतर गर्भाशयाच्या समस्या असल्यास गर्भपाताच्या समस्येला सामोरं जावं लागतं. सामान्यतः महिलांना एकदाच गर्भपाताचा सामना करावा लागतो. त्यानंतर त्या कंसीव करू शकतात. पण एका अभ्यासानूसार, ५ टक्के महिलांना दोन वेळा गर्भपाताच्या समस्येला सामोरं जावं लागतं. तसेच १ टक्के महिलांना दोन पेक्षा अधिक गर्भपाताचा सामना करावा लागतो.
(Baby Hair Growth Tips : मुलांच्या केस वाढीसाठी प्रयत्न करताय? फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स)
स्वतःला वेळ द्या

गर्भपात झाल्यानंतर बहुतांश महिला या मानसिकरित्या खचतात. पण यादरम्यान खचून न जाता महिलांनी स्वतःला वेळ देणं गरजेचं आहे. अशावेळी दुःख, राग मनात ठेवणं चुकीचं आहे. गर्भपातानंतर जर तुम्ही पुन्हा कंसीव करू इच्छित असाल तर किमान एक किंवा दोन मासिक पाळीची वाट पाहणं गरजेचं आहे. यामुळे तुम्ही मानसिक तसेच शारीरिक रित्या पूर्णपणे सक्षम होता. पहिल्या गर्भपातानंतर जर तुम्ही ६ महिने थांबत असाल तर हेल्दी प्रेग्नेंसीचा लाभ तुम्हाला मिळू शकतो. वय वर्ष ३५ किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या महिलांनी लवकरात लवकर कंसीव करणं गरजेचं आहे.
(वयाच्या ४७व्या वर्षी दुसऱ्यांदा आई बनणार ऐश्वर्या? ‘या’ वयात प्रेग्नेंसी खरंच शक्य आहे का?)
स्त्रीरोग तज्ज्ञांशी संवाद साधा

गर्भपातानंतर बऱ्याच महिलांना आरोग्यविषयक समस्यांचा देखील सामना करावा लागतो. मग अशावेळी तुम्ही स्त्रीरोग तज्ज्ञांशी संवाद साधणं गरजेचं आहे. तेच तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करू शकतील. तसेच तुमची आरोग्यस्थिती नेमकी काय आहे? हे जाणून घेण्यासाठी डॉक्टर तुम्हाला काही चाचण्या करण्याचा सल्ला देखील देतील. यामुळे तुमची शारीरिक स्थिती काय आहे याचा अंदाज येईल. यादरम्यान पुन्हा प्रेग्नेंसीसाठी तुम्ही कधी तयार असावं याची माहिती देखील तुम्हाला मिळेल.
(Baby Food Tips : ६ ते १२ महिन्यांच्या मुलांना काय खायला द्याल? ‘या’ पदार्थांमुळे प्रत्येक आईचं टेन्शन होईल दूर)
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#मलचय #जनमच #आनद #पणसपरसदध #अभनतरन #सगतलल #त #अनभव #ऐकन #यईल #अगवर #कट