Monday, July 4, 2022
Home लाईफस्टाईल मुलाचं प्लॅनिंग कधी? विचित्र प्रश्नांमुळे हैराण झालेल्या अभिनेत्रीने व्हिडिओ शेअर करत दिलं...

मुलाचं प्लॅनिंग कधी? विचित्र प्रश्नांमुळे हैराण झालेल्या अभिनेत्रीने व्हिडिओ शेअर करत दिलं सडेतोड उत्तर


आपल्या खाजगी आयुष्याबाबत खुलेपणाने व्यक्त होणं बऱ्याच सेलिब्रिटी मंडळींना आवडत नाही. मात्र अभिनेत्री गौहर खान याला अपवाद आहे. आपलं आयुष्य आपल्या हिंमतीवर आणि स्वतःच्या मतांवर जगणाऱ्या अभिनेत्रींपैकी गौहर एक आहे. तिचं खाजगी आयुष्य तसेच कामाच्याबाबतीत देखील हे दिसून येतं. एखादा प्रोजेक्ट करायचा असेल तरी देखील ती स्वतःला पटला तरच करते. गौहरने तिच्या लग्नाबाबत असाच काहीसा निर्णय घेतला होता. गौहरने गेल्याच वर्षी जैद दरबारबरोबर लग्न गाठ बांधली आणि सध्या हे दोघं सुखाचा संसार करत आहे.

दोघंही सोशल मीडियाद्वारे एकमेकांबरोबरचे फोटो सतत शेअर करत असतात. पण लग्न करण्यापूर्वी गौहरला तू लग्न कधी करणार असा प्रश्न विचारण्यात यायचा. मात्र लग्नानंतर तर तिला अनेक विचित्र प्रश्न विचारले जात आहेत. फक्त गौहरलाच नव्हे तर बऱ्याच सामान्य महिलांना देखील अशा अनेक प्रश्नांचा सामना करावा लागतो. गौहरने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून विचित्र प्रश्न विचारणाऱ्यांना तिने सडेतोड उत्तर दिलं आहे.
(फोटो सौजन्य – इंडिया टाइम्स)

​मुलांचं प्लॅनिंग कधी?

लग्नापूर्वी लोकं एखाद्या मुलीला लग्न कधी करणार असा प्रश्न सतत विचारत असतात. लग्न झालं आता कोणत्याही प्रश्नांना उत्तर द्यावं लागणार नाही असं मुलींना वाटत असतानाच लोकांकडून काही भलतेच प्रश्न विचारण्यात येतात. हा अनुभव अभिनेत्री गौहर खानला देखील आला आहे. इतरांच्या खाजगी आयुष्यामध्ये डोकावून पाहणे काही लोकांना प्रचंड आवडत. अशांनाच गौहरने सडेतोड उत्तर दिलं आहे. मुलाचं प्लॅनिंग कधी? असा प्रश्न गौहरला सतत विचारण्यात येत होता. यावर तिने म्हटलं आहे की ‘जेव्हा देवाची इच्छा असेल तेव्हा’. तुम्हाला देखील लग्नानंतर सतत हाच प्रश्न कोणी विचारत असेल तर तुमच्यासाठी हे उत्तर अगदी योग्य आहे.

(‘लग्नानंतरही एक्स गर्लफ्रेंडला डबल डेट करायचं आहे’ प्रेमामध्ये सैराट झालेल्या अभिनेत्याचा अजब कारभार, मुलाखतीमध्ये व्यक्त केली इच्छा)

​सासू-सासऱ्यांबरोबर का राहत नाही?

गौहरचं सासरही मुंबईमध्येच आहे. पण जैद आणि गौहरने दुसरं घर खरेदी करत वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. तिचा हा खाजगी निर्णय आहे. परंतू तिचा हा विषय देखील चर्चेचा मुद्दा ठरतो. तू सासू-सासऱ्यांबरोबर का राहत नाही? हा प्रश्न तिला सतत विचारण्यात येतो. वेगळं राहणं मला आणि माझ्या पतीला योग्य वाटलं असं उत्तर तिने या प्रश्नावर दिलं आहे. जर एखादी महिला तिच्या पतीबरोबर वेगळी राहत असेल आणि सासू-सासरे वेगळे राहत असतील तर याबाबत खूप काही प्रश्न लोकं निर्माण करतात. सासू-सासऱ्यांपासून लांब राहण्याबाबत काही जणं महिलांनाच दोषी ठरवतात.

(३ वर्षांनी मोठ्या असणाऱ्या ऐश्वर्या रायशीच अभिषेकने का केलं लग्न? एका कारणामुळे अभिनेत्याला सौंदर्यवतीची पडली भूरळ)

पर्सनल स्पेसची गरज

काही जणं लग्न झाल्यानंतर कुटुंबाच्या सहमतीनेच वेगळं राहण्याचा निर्णय घेतात. लग्नानंतर प्रत्येक जोडप्याला त्यांच्या पर्सनल स्पेसची गरज असते. लग्नानंतरचे काही सुरुवातीचे दिवस हे पती-पत्नीच्या नात्यासाठी महत्त्वाचे असतात. या काही दिवसांमुळेच दोन व्यक्तींमधील नातं अधिकाधिक मजबूत बनत जातं. पती-पत्नी जर लग्नानंतर एकत्र राहत असतील तर एकमेकांकडे उत्तमरित्या लक्ष देऊ शकतात. यामुळे दोघांमधील समजूतदारपणा देखील अधिक वाढत जातो. सासू-साऱ्यांपासून वेगळं राहायचं की नाही हा प्रत्येकाचा खाजगी निर्णय आहे. जर एखादी महिला सासू-सासऱ्यांपासून लांब राहून देखील त्यांची उत्तम काळजी आणि देखभाल करत असेल तर याबाबत कोणालाच तक्रार नसते.

(रेखा यांच्या कपाळावरील कुंकू पाहून ढसाढसा रडू लागल्या जया बच्चन, अमिताभही होते पण… )

​लग्नानंतर तू सतत काम का करते?

गौहर तिच्या लग्नानंतर कोणत्या ना कोणत्या कामामध्ये सतत व्यस्त आहे. सतत ती करत असलेलं काम पाहून लग्नानंतर तू सतत काम का करते? असा प्रश्न तिला विचारण्यात येत आहे. यावर गौहरने अगदी चांगल्या पद्धतीने उत्तर दिलं आहे. तिने म्हटलं की, मी गेल्या २० वर्षांपासून काम करत आहे. आणि वयाच्या ८० वर्षापर्यंत काम करावं अशी माझी इच्छा आहे. लग्नानंतर मुलींनी स्वप्न पाहणं बंद केलं पाहिजे असं नाही. घरातील जबाबदाऱ्या सांभाळत मुलींनी आपलं करिअर देखील सांभाळलं पाहिजे.

(सगळं सुरळीत सुरू असताना झाला घटस्फोट, बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध कपलच्या नात्यामध्ये का पडली फूट?)

व्हिडिओ शेअर करत दिलं सडेतोड उत्तर

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#मलच #पलनग #कध #वचतर #परशनमळ #हरण #झललय #अभनतरन #वहडओ #शअर #करत #दल #सडतड #उततर

RELATED ARTICLES

धर्म, मानवता आणि वेदांताचा सुरेख मिलाप घालणारे स्वामी विवेकानंद यांच्याविषयी थोडक्यात…

Swami Vivekananda Death Anniversary : स्वामी विवेकानंद हे वेदांताचे प्रख्यात आणि प्रभावशाली आध्यात्मिक गुरु होते. स्वामी विवेकानंद यांचा...

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

Most Popular

ब्रेस्ट मिल्क विक्रीमुळे कंपनी वादात? आईचं दूध विकणारी आशियातील पहिलीच कंपनी

नवी दिल्ली, 3 जुलै : पैशाने बाजारात सगळं मिळतं, पण आई मिळत नाही, असं मराठीत म्हटलं जातं. मात्र, आई मिळत नसली तरी तिचं...

IND vs ENG : पुजाराचं अर्धशतक, पंतची साथ, भारताला 257 रनची मोठी आघाडी

एजबॅस्टन, 3 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टच्या तिसऱ्या दिवसाअखेरीस भारताचा (India vs England 5th Test) स्कोअर 125/3 एवढा झाला आहे, त्यामुळे टीम इंडियाची...

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

धर्म, मानवता आणि वेदांताचा सुरेख मिलाप घालणारे स्वामी विवेकानंद यांच्याविषयी थोडक्यात…

Swami Vivekananda Death Anniversary : स्वामी विवेकानंद हे वेदांताचे प्रख्यात आणि प्रभावशाली आध्यात्मिक गुरु होते. स्वामी विवेकानंद यांचा...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...