इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे. तामिळनाडू राज्यातील कोईम्बतूर जिल्ह्याच्या आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. पी. अरुणा यांनी या नवीन आजाराबद्दल माहिती दिली आहे.
टोमॅटो फ्लू म्हणजे काय?
डॉ. अरुणा सांगतात की, या फ्लूचा पाच वर्षांखालील मुलांवर परिणाम होत आहे. या फ्लूच्या लक्षणांमध्ये त्वचेवर पुरळ उठणे, चिडचिड होणे आणि निर्जलीकरण यांचा समावेश होतो. अनेक अहवालांनुसार, फ्लूमुळे थकवा, सांधेदुखी, पोटदुखी, मळमळ, उलट्या, जुलाब, खोकला, शिंका येणे, नाक वाहणे, खूप ताप आणि अंगदुखी होऊ शकते. काही प्रकरणांमध्ये पाय आणि हातांच्या त्वचेचा रंग देखील बदलू (What is Tomato Fever) शकतो. या विषाणूजन्य संसर्गाला टोमॅटो फ्लूचे नाव मिळाले आहे, कारण हे फोड सामान्यतः गोलाकार आणि लाल रंगाचे असतात.
टोमॅटो फ्लूचा उपचार कसा केला जाऊ शकतो?
डॉ. अरुणा म्हणाल्या, इतर विषाणूजन्य आजारांप्रमाणेच त्याचा प्रसार होतो आहे. परंतु, या फ्लूसाठी कोणतेही विशिष्ट औषध नाही, जर रुग्णाची योग्य काळजी घेतली तर त्याची लक्षणे वेळेनुसार स्वतःच संपतात. एखाद्याला या फ्लूची लागण झाली असेल तर त्याला वेगळे ठेवणे आवश्यक आहे, कारण हा आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे वेगाने पसरतो.
मुलांना प्रभावित करतो –
डॉ. अरुणा म्हणाल्या की, लहान मुलांवर या फ्लूचा मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे, अधिकारी देखील जिल्हाभरातील अंगणवाडी केंद्रांची तपासणी करत आहेत आणि चाचण्या करण्यासाठी आरोग्य अधिकार्यांसह सुमारे 24 फिरती पथके तैनात करण्यात आली आहेत. मुलांना फ्लूमुळे होणारे फोड खाजवण्यापासून रोखले पाहिजे. फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी संक्रमित व्यक्तींनी वापरलेली भांडी, कपडे आणि इतर वस्तू नियमितपणे स्वच्छ केल्या पाहिजेत. याशिवाय, द्रवपदार्थाचे सेवन केले पाहिजे, यामुळे डिहायड्रेशनचा सामना करण्यास मदत होईल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळीच लक्षणे ओळखून लगेच तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
तामिळनाडूने खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत
केरळमध्ये टोमॅटो फ्लूची प्रकरणे समोर आल्यानंतर तामिळनाडूने आपल्या सीमेवर पाळत ठेवली आहे. तामिळनाडू-केरळ सीमेवर तैनात अधिकाऱ्यांचे पथक शेजारील राज्यातून येणाऱ्या लोकांची तपासणी करत आहेत.
हे वाचा – Gold Price Today :एका आठवड्यात 1500 रुपये स्वस्त झालं सोनं, तपासा आजचा भाव
टोमॅटो तापाची लक्षणे –
त्याच्या मुख्य लक्षणांमध्ये निर्जलीकरण, त्वचेवर पुरळ उठणे, त्वचेची जळजळ किंवा खाज सुटणे यांचा समावेश होतो. या संसर्गाने बाधित झालेल्या मुलांच्या शरीरावर टोमॅटोच्या आकाराचे लाल पुरळ दिसून येतात. यासोबतच खूप ताप येणं, सांधे सुजणे, थकवा येणे, अंगदुखी अशी लक्षणेही दिसू शकतात. डिहायड्रेशनमुळे संक्रमित मुलाच्या तोंडात अस्वस्थता जाणवू शकते. तोंड कोरडे पडू शकते. हात, गुडघे, नितंब यांचा रंग बदलणे हे देखील दुसरे लक्षण आहे. काहींना खूप तहानही लागू शकते.
हे वाचा – रखरखत्या उन्हात बाहेर जाताना डोळ्यांची अशी घ्या काळजी; जराही त्रास नाही होणार
टोमॅटो ताप टाळण्यासाठी टिप्स –
मुलांमध्ये वरीलपैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.
संक्रमित मुलाला उकळलेले स्वच्छ पाणी द्या, जेणेकरून तो हायड्रेटेड राहू शकेल.
फोड किंवा पुरळांना स्पर्श करणे किंवा खाजवणे टाळा.
पुरेशी स्वच्छता राखा, घर आणि मुलांभोवती स्वच्छता ठेवा.
कोमट पाण्याने आंघोळ करावी.
संक्रमित व्यक्तीपासून अंतर ठेवा.
सकस आहार घ्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#मलन #हणरय #टमट #फलमळ #भतच #वतवरण #लकषण #ओळखन #लगच #घय #उपचर