Friday, May 20, 2022
Home करमणूक मुमताजसमोर आलं होतं पतीच्या अफेअरचं सत्य, धक्का बसल्याने परतल्या होत्या भारतात

मुमताजसमोर आलं होतं पतीच्या अफेअरचं सत्य, धक्का बसल्याने परतल्या होत्या भारतात


मुंबई : बॉलिवूडमध्ये साठ ते सत्तरचं दशक गाजवणारी अभिनेत्री मुमताज यांचं नाव जरी आठवलं तरी अनेक गाजलेले सिनेमे आणि हिट गाणी डोळयासमोर आल्याशिवाय राहत नाही. अभिनयाचं करिअर शिखरावर असताना मुमताज यांनी अमेरिकास्थित मयुर माधवानींशी लग्न केलं. बॉलिवूडला रामराम करून मुमताज अमेरिकेत स्थायिक झाल्या. सगळं काही सुखाने सुरू असतानाच मुमताजच्या समोर त्यांच्या पतीची एक अशी गोष्ट उघड झाली की मुमताजना धक्का बसला. एका मुलाखतीत काही दिवसांपूर्वी मुमताज त्यांनी त्यांच्या पतीच्या बाबतीत घडलेली ही गोष्ट सांगितली.


मुमताजनी मुलाखतीत सांगितलं, ‘लग्न करून आम्ही अमेरिकेत असताना पतीच्या आयुष्यात एक दुसरी मुलगी आली. पती मयुर तिच्या प्रेमात पडला. समाजात पुरूषांसाठी लग्नानंतरचे अन्य स्त्रीसोबतचे संबंध ही सामान्य गोष्ट असू शकते, मात्र त्याचा त्रास पत्नीला होत असतो. मी काही काळासाठी या त्रासातून गेले आहे. त्यावेळी मला स्वत:ला खूप एकटं एकटं वाटत होतं. मी माझ्या पतीचा खूप आदर करत होते. त्यामुळे जेव्हा मला त्यांच्या विवाहबाह्य संबंधांबाबत कळलं, तेव्हा आम्ही सविस्तर बोललो. तेव्हा मयुर मला म्हणाला की , माझ्या आयुष्यात दुसरी मुलगी आहे हे खरं आहे, मात्र मी तुझ्यावर कायम प्रेम करेन आणि तुला कधीच सोडून जाणार नाही.’

लता मंगेशकर यांना विष देऊन मारण्याचा केला होता प्रयत्न, ‘नाम रह जाएगा’मध्ये उलगडणार सत्य


मुमताजच्या पतीने जरी त्यांची चूक मान्य केली असली तरी या धक्क्यातून मुमताज सावरल्या नव्हत्या. त्या काही काळासाठी भारतात परत आल्या होत्या. पण नंतर मात्र पती मयुरने अशी चूक पुन्हा होणार नाही असं सांगितलं. ‘तो काळ खूप कमी दिवसांचा होता यातच समाधान मानून मी पुन्हा अमेरिकेला परत गेले. आता मी पतीसोबत अगदी राणीसारखं आयुष्य जगत आहे.’

‘कभी ईद कभी दिवाली’मधला सलमान खानचा लुक झाला Viral


गेल्या महिन्यात पोटात इन्फेक्शन झाल्याने मुमताज यांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. आता त्यांची तब्येत बरी आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी मुमताजच्या तब्येतीची चौकशी केली होती. १९६० ला स्त्री या सिनेमातून मुमताज यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. १९९० साली आंधिया हा त्यांचा प्रदर्शित झालेला शेवटचा सिनेमा आहे. त्यानंतर मुमताज बॉलिवूडपासून लांब आहेत, मात्र सोशल मीडियावर त्या अॅक्टिव्ह असतात.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#ममतजसमर #आल #हत #पतचय #अफअरच #सतय #धकक #बसलयन #परतलय #हतय #भरतत

RELATED ARTICLES

अनशा पोटी हे खाल्लंत तर दररोज पोट होईल साफ; कधीच होणार नाही बद्धकोष्ठतेचा त्रास

दिल्ली, 19 मे: जीवनशैलीतले बदल अनेक व्याधींना आमंत्रण देतात. बदललेल्या जीवनशैलीत (Lifestyle) आहार तर बदलतोच, शिवाय व्यायामाचाही अभाव असतो. खाण्यापिण्याच्या वेळा बदलत असतात....

Heavy Rain: वादळी पावसाचा कहर; 25 जणांचा मृत्यू, सहा बोटी बुडाल्या

पाटणा, 20 मे: बिहारमध्ये गुरुवारी वादळी (storm) पावसाने (Heavy rain) कहर केला. बिहारच्या (Bihar) अनेक भागांमध्ये गुरुवारी 25 ते 60 किमी प्रतितास वेगाने...

महिलांसाठी Taliban चा नवा फर्मान, ऐकून तुम्हीही डोक्याला हात लावाल

काबूल, 20 मे: तालिबाननं (Taliban) आता एक नवं फर्मान काढलं आहे. तालिबाननं गुरुवारी निर्देश दिले की सर्व टीव्ही चॅनेलवर काम करणाऱ्या सर्व महिला...

Most Popular

Live Updates: मुंबई महापालिकेच्या शाळेतील 130 शिक्षक निलंबित

ओबीसी आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी भाजपचं शिष्टमंडळ  1 जूनला मध्य प्रदेशात जाणार,  पंकजा मुंडेंच्या नेतृत्वाखाली भाजपचं शिष्टमंडळ मध्य प्रदेशात जाणार;  चंद्रशेखर बावनकुळे, योगेश टिळेकर, प्रवीण घुगेंसह पदाधिकाऱ्यांचा...

प्रियांका चोप्राचा दीपिकाला जोरदार झटका…नाव मात्र आलिया, कॅटरिनाचं

प्रियांका चोप्रा सध्या 'जी ले जरा' या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान बोलताना प्रियांकाने दीपिका पदुकोणवर निशाणा लगावलाय   अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी...

सदाभाऊ खोतांच्या ‘जागर शेतकऱ्याचा, आक्रोश महाराष्ट्राचा’ अभियानाचा आज समारोप, फडणवीसांची सभा

Devendra Fadnavis : शेतकरी प्रश्नासंदर्भात सरकारला जाग येण्यासाठी रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी 'जागर...

Oppo Smartphones: लवकरच लाँच होणार Oppo Reno 8 Series चे तीन स्मार्टफोन्स, ५० MP कॅमेरासह मिळतील हे फीचर्स

नवी दिल्ली : Upcoming Oppo Smartphones: Oppo आपली आगामी Reno 8 स्मार्टफोन सीरीज २३ मे रोजी चीनमध्ये लाँच करणार असून रिपोर्ट्सनुसार, आगामी फ्लॅगशिप...

वास्तुशास्त्रानुसार घरात जास्वंदीचं झाड लावण्याचे आहेत फायदे; पण दिशा महत्त्वाची

दिल्ली, 19 मे: घर आकर्षक दिसावं, त्यातलं वातावरण चांगलं राहावं, यासाठी अनेक जण घरात किंवा घराच्या परिसरात शोभेची झाडं किंवा फुलझाडं लावतात. काही...