Saturday, July 2, 2022
Home मुख्य बातम्या मुख्यमंत्री थोड्याच वेळात जाहीर करणार निर्णय, Facebook Live मधून करणार घोषणा

मुख्यमंत्री थोड्याच वेळात जाहीर करणार निर्णय, Facebook Live मधून करणार घोषणा


मुंबई, 22 जून : राज्यातील राजकारणात भूकंप झालेला असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackery) संध्याकाळी 5 वाजता फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्री यावेळी त्यांचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडीवर मुख्यंमंत्री त्यांची बाजू मांडणार असून ते या लाईव्हमध्ये रजीनामा देणार की एकनाथ शिंदे यांना आव्हान देणार हे थोड्य़ाच वेळात स्पष्ट होईल.

उद्धव ठाकरे (Uddhav  Thackeray) सरकार अल्पमतामध्ये आल्याचं स्पष्ट झालंय. शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधानसभा उपाध्य़क्ष नरहरी झिरवाळ यांना पत्र लिहलंय. या पत्रामध्ये 34 आमदारांच्या सह्या आहेत. शिवसेनेच्या 55 पैकी 34 आमदारांच्या या पत्रावर सह्या असल्यानं बहुसंख्य आमदार हे शिंदे यांच्यासोबत आहेत, त्यामुळे ठाकरे सरकार आता अल्पमतामध्ये आलं आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा आता बरखास्तीकडे चालली आहे, असं सूचक ट्वीट केलं आहे. त्यामुळे ठाकरे सरकाराचा संसार अखेरीस अडीच वर्षात आटोपला आहे, असं मानलं जात आहे.महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने, असं म्हणत संजय राऊत यांनी ठाकरे सरकारच्या अस्ताचे संकेत दिले आहेत. गेल्या दोन दिवसांमध्ये घडत असलेल्या या सर्व घडामोडींवर मुख्यमंत्री त्यांची बाजू या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मांडणार आहेत.

तुमच्या शहरातून (मुंबई)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#मखयमतर #थडयच #वळत #जहर #करणर #नरणय #Facebook #Live #मधन #करणर #घषण

RELATED ARTICLES

वेबविश्वात आणखी एक खळबळ! रानबाजारनंतर खुर्चीचं राजकारण; पानसेंची नवी वेबसिरीज भेटीला

मुंबई 1 जुलै: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलाढाली होत आहे. एक ना अनेक अनपेक्षित उलथापालथ सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या सध्याच्या याच पार्श्वभूमीवर...

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

‘E म्हणजे एकनाथ आणि D म्हणजे देवेंद्र हे आमचे ED चे राज्य’

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी पणजी, 1 जुलै : मुंबईत सध्या विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज...

Most Popular

भारत-इंग्लंड कसोटी मालिका : बुमराच्या नेतृत्वाची ‘कसोटी’!; इंग्लंडविरुद्धचा प्रलंबित पाचवा सामना आजपासून; रोहित मुकणार

पीटीआय, बर्मिगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील प्रलंबित पाचव्या कसोटी क्रिकेट सामन्याला शुक्रवारपासून सुरुवात होणार असून अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा पाहुण्या संघाच्या...

दे दणादण… रिषभ पंतने तुफानी फलंदाजी करत केली इंग्लंडची धुलाई, भारताचा धावांचा डोंगर

रिषभ पंत हा कसोटीच्या पहिल्या दिवसाचा हिरो ठरला. चेतेश्वर पुजारा, विराट कोहली या अनुभवी फलंदाजांसह शुभमन गिल, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी अपयशी ठरले....

एकनाथ शिंदेंना खरंच मोठा झटका? व्हायरल पत्रामुळे संभ्रम वाढला

मुंबई, 1 जुलै : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सोशल मीडियावर...

Shocking! अनेक महिलांशी शारीरिक संबंध; 15 वर्षांच्या मुलीशी लग्न करणाऱ्या सेलिब्रिटीला 30 वर्षांचा कारावास

मुंबई : जागतिक कलाजगताला हादरा देणारी बातमी नुकतीच समोर आली आहे. एका सेलिब्रिटीकडून घडलेल्या गुन्ह्यामुळं त्याला तब्बल 30 वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली...

अभिनेत्री प्रियांकाला कशाची कमी, आता का विकतेय भांडी?

लेकीच्या जन्मानंतर काय काय करतेय देसी गर्ल, चाहत्यांनाही पडलाय प्रश्न; आधी जेवण आता भांडी पुढे काय अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित...