Monday, July 4, 2022
Home क्रीडा मुंबई क्रिकेट असोसिएशनचे ग्राउंड्समन होणार मालामाल! प्रत्येकी मिळणार एक लाख रुपये

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे ग्राउंड्समन होणार मालामाल! प्रत्येकी मिळणार एक लाख रुपयेयावर्षी २६ मार्च ते २९ जून या कालावधीमध्ये इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) १५वा हंगाम पार पडला. कोविड-१९ आजारामुळे यावर्षी महाराष्ट्रातील चार ठिकाणी आयपीएलचे साखळी सामने आयोजित करण्यात आले होता. त्यामध्ये मुंबईतील ब्रेबॉर्न आणि वानखेडे स्टेडियम, नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियम आणि पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमचा समावेश होता. या चार ठिकाणी एकूण ७० सामने खेळवण्यात आले होते. या ठिकाणच्या सर्व सामन्यांचे प्रत्यक्ष नियोजन करण्यात तेथील ग्राऊंड स्टाफने बीसीसीआयला मोलाची साथ दिली. म्हणून, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती. त्यापाठोपाठ आता मुंबई क्रिकेट असोसिएशनदेखील आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस देण्याच्या तयारीत आहे.

आयपीएल दरम्यान केलेल्या कामगिरीसाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे (एमसीए) ४८ ग्राउंड्समनला प्रत्येकी एक लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. एमसीएच्या सर्वोच्च परिषदेच्या बैठकीत या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे. ‘आयपीएलच्या काळात एमसीएच्या ग्राउंड्समननी सराव आणि प्रत्यक्ष सामन्यांच्या खेळपट्ट्या तयार करण्यासाठी दिवस-रात्र काम केले. एप्रिल-मेच्या कडाक्याच्या उन्हात दररोज सामने खेळले जात असतानाही खेळपट्ट्यांबद्दल एकही तक्रार आली नव्हती. हे सर्व कर्मचाऱ्यांच्या काबाड कष्टामुळे शक्य झाले. त्यांच्या प्रामाणिक कष्टांचे कौतुक म्हणून ४८ ग्राउंड्समनला प्रत्येक एक लाख रुपये बक्षिस देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे,’ असे एमसीएमे सांगितले आहे.

हेही वाचा – IND vs ENG: रोहित आणि विराटच्या चुकीमुळे भारतीय संघाला मिळाली वॉर्निंग! का ते वाचा

मुंबईच्या वानखेडे स्टेडियममधील ५७ वर्षीय ग्राउंड्समन वसंत मोहिते यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, ‘या पूर्वीच्या आयपीएल हंगामांमध्ये ते स्टेडियममध्येच एका छोट्याशा खोलीत रात्र काढत असत. कारण, रात्री उशिरा सामना संपूपर्यंत रेल्वे सेवा बंद होत असे. १५व्या हंगामादरम्यान मात्र, असे झाले नाही. एमसीएने कॅडबरी या खासगी कंपनीशी करार केला होता. ज्यामुळे वानखेडे स्टेडियमच्या ग्राउंड स्टाफला पंचतारांकित हॉटेलमध्ये राहता आले. सामन्याच्या दिवसात राहण्याची आणि प्रवासाची सर्व काळजी कंपनीने घेतली.’अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#मबई #करकट #अससएशनच #गरउडसमन #हणर #मलमल #परतयक #मळणर #एक #लख #रपय

RELATED ARTICLES

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

Most Popular

ठाकरे सरकारने घेतलेले निर्णय शिंदे सरकार रद्द करणार? फडणवीसांचं मोठं विधान

मुंबई, 3 जुलै : राज्यात विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचं (Maha Vikas Aghadi) ठाकरे सरकार (Thackeray Government) स्थापन झालं होतं. या सरकारने...

Emotional Father: 6 वर्षाच्या मुलाचा गणिताचा निकाल पाहून वडिलांची झाली अशी अवस्था

आपली मुलं परीक्षेत टॉप यावी यासाठी प्रत्येक पालक प्रयत्नशील असतो. पालक आपल्या मुलांवर परीक्षेत टॉप येण्यासाठी खूप दबाव टाकतात. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी...

IND vs ENG : ‘जे झालं ते…’, आयपीएलमधील वादावर जडेजानं दिली प्रतिक्रिया

मुंबई, 3 जुलै :  भारत विरूद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यात एजबस्टनमध्ये सुरू असलेल्या पाचव्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी ऑल राऊंडर रविंद्र जडेजानं (Ravindra...

खरंच गरम पाणी प्यायल्याने कोलेस्ट्रॉल कमी होतो? धोका वाढण्यापूर्वी जाणून घ्या सत्य

काही लोकांचा असा विश्वास आहे की गरम पाणी प्यायल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होते. चला तर मग जाणून घेऊया गरम पाण्याने कोलेस्ट्रॉल खरंच कमी...

शिंदे सरकारचा आज पहिला ‘पेपर’, फडणवीसांच्या रणनीतीने सरकार होणार ‘पास’?

मुंबई, 03 जुलै : शिवसेनेत बंडखोरी (Shiv Sena Rebel MLAs)  करून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदी (cm eknath shinde) झेप घेतली आहे. आता पहिल्यांदाच...

रविवार विशेष : मुंबई क्रिकेटला नवसंजीवनी!

अन्वय सावंत देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात यशस्वी संघ अशी मुंबईची ख्याती आहे. परंतु याच मुंबईला गेल्या काही हंगामांमध्ये लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश येत होते....