Monday, July 4, 2022
Home टेक-गॅजेट मुंबई एअरपोर्ट जगात भारी, सर्वोत्तम 100 विमानतळांमध्ये भारतातील चार विमानतळांचा समावेश

मुंबई एअरपोर्ट जगात भारी, सर्वोत्तम 100 विमानतळांमध्ये भारतातील चार विमानतळांचा समावेश


Skytrax World Airport Awards 2022: जगभरातील हवाई प्रवाशासाठी सर्वोत्तम विमानतळ निवडण्यासाठी आधुनिकता, भव्यता आणि कार्यक्षमता लक्षात ठेवावी लागेल. भारतातही विमानतळांच्या विद्यमान पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. त्याचा सकारात्मक परिणामही दिसून येत आहे. जगातील 100 सर्वोत्तम विमानतळांच्या यादीत भारतातील चार विमानतळांचा समावेश झाला आहे.

स्कायट्रॅक्सने जाहीर केली यादी 

Skytrax ने त्यांची जागतिक विमानतळ पुरस्कार 2022 यादी (Skytrax World Airport Awards 2022) प्रसिद्ध केली आहे. यामध्ये चार भारतीय विमानतळांनी स्थान मिळवले असून ही देशासाठी एक सकारात्मक बातमी आहे. सर्वोत्तम 100 विमानतळांच्या यादीमध्ये दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, बेंगळुरूमधील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ, हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ यांचा समावेश आहे.

दिल्ली विमानतळ हे भारतातील सर्वोत्कृष्ट विमानतळ असून या यादीत हे 37 व्या क्रमांकावर आहे. बेंगळुरू विमानतळ 61 व्या, हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ 63 व्या, तर मुंबई विमानतळ 65 व्या क्रमांकावर आहे. हा पुरस्कार सोहळा 16 जून रोजी पॅरिस, फ्रान्समधील पॅसेंजर टर्मिनल एक्स्पो येथे आयोजित करण्यात आला होता. ज्यात जगभरातील 500 हून अधिक विमानतळांचा समावेश करण्यात आला आहे.

छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई

छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई, सांताक्रूझ आणि सहार उपनगरांमध्ये सुमारे 1450 एकर परिसरात पसरलेले आहे. मुंबईचे हे विमानतळ वर्षाला सुमारे अडीच कोटी प्रवाशांना सेवा देते.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Sri Lanka Crisis : पेट्रोल पंपावर पाच दिवसांपासून रांगा, रांगेतील ट्रक चालकाचा मृत्यू, आतापर्यंत दहा जणांना गमवावे लागले प्राण 
Afghanistan Earthquake : अफगाणिस्तानमध्ये निसर्गाचा प्रकोप, भूकंपाच्या धक्क्याने 1000 जणांचा मृत्यू, 1500 हून अधिक जखमी
Miss France : ‘मिस फ्रान्स’ आयोजकांचा मोठा निर्णय; आता स्पर्धेत सहभागी होण्यास वयोमर्यादा नाही, बदलले हे नियम

 अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#मबई #एअरपरट #जगत #भर #सरवततम #वमनतळमधय #भरततल #चर #वमनतळच #समवश

RELATED ARTICLES

मुंढवा परिसरातील बँक, मेडिकल स्टोअर फोडण्याचा प्रयत्न; पोलिसांकडून तपास सुरु

<p><strong>Pune Crime News:</strong> पुण्यातील (Pune crime) केशवनगर येथील साधना सहकारी बँकेची &nbsp;शाखा आणि बँकेजवळील मेडिकल स्टोअर अज्ञात चोरट्यांनी &nbsp;फोडण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी बँकेच्या...

Black Pepper for Men : पुरुषांसाठी काळी मिरी गुणकारी; ‘या’ समस्या करते दूर

Black Pepper for Men : पुरुषांसाठी काळी मिरी गुणकारी; 'या' समस्या करते दूर अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...

दररोज मिळेल २ जीबी डेटासह अनेक फायदे, Jio, Airtel आणि VI चे ‘हे’ स्वस्त प्लान्स एकदा पाहाच

Best Recharge Plans: खासगी टेलिकॉम कंपन्या रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि वोडाफोन आयडिया ग्राहकांना वेगवेगळी वैधता आणि डेली डेटा लिमिटसह येणारे प्लान्स ऑफर...

Most Popular

धर्म, मानवता आणि वेदांताचा सुरेख मिलाप घालणारे स्वामी विवेकानंद यांच्याविषयी थोडक्यात…

Swami Vivekananda Death Anniversary : स्वामी विवेकानंद हे वेदांताचे प्रख्यात आणि प्रभावशाली आध्यात्मिक गुरु होते. स्वामी विवेकानंद यांचा...

विम्बल्डन टेनिस स्पर्धा : किरियॉसकडून त्सित्सिपासचा पराभव; नदाल उपउपांत्यपूर्व फेरीत; महिलांमध्ये बदोसा, रायबाकिनाची आगेकूच

लंडन : ऑस्ट्रेलियाचा बिगरमानांकित खेळाडू निक किरियॉसने पिछाडीवरून दमदार पुनरागमन करताना चौथ्या मानांकित स्टेफानोस त्सित्सिपासचा पराभव करत विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश...

July Born Baby Names: तुमच्या बाळांना द्या ‘ही’ सर्वात हटके अन् गोंडस नावं

मुंबई, 4 जुलै: आपल्या बाळाचं नाव (Baby Names) हटके असावं, असं प्रत्येकाला वाटतं. त्याचं नाव सुंदर असावं, त्याचा अर्थही चांगला असावा आणि ते नाव प्रत्येकाला...

भारत-श्रीलंका एकदिवसीय मालिका : श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या सामन्यात ; भारताच्या सलामीवीरांवर नजर

पालेकेले : श्रीलंकेविरुद्ध सोमवारी होणारा दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना जिंकत तीन सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी घेण्याचे भारतीय महिला संघाचे लक्ष्य आहे. या सामन्यात...

इंग्लंडचा पराभव निश्चित; बर्मिंघम फक्त एकदा असे घडले, भारताला इतिहास घडवण्याची सुवर्णसंधी

बर्मिंघम: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीला सुरूवात होण्याआधी टीम इंडियाला मोठा झटका बसला होता. कर्णधार रोहित शर्माला करोना झाल्याने तो संघाबाहेर झाला आणि जसप्रीत बुमराहकडे...

पकडलेला लश्करचा दहशतवादी निघाला भाजपचा सदस्य?, नेत्याने म्हटले…

काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणांनी दोन दहशतवाद्यांना अटक केलीय. आता या अटकेवरून राजकारण सुरू झालं आहे. एक दहशतवादी हा भाजपशी संबंधित असल्याचा आरोप केला जातोय....