Thursday, May 26, 2022
Home मुख्य बातम्या मुंबईत पहिल्या भारतीय आंतरराष्ट्रीय क्रूझ परिषदेचे आयोजन

मुंबईत पहिल्या भारतीय आंतरराष्ट्रीय क्रूझ परिषदेचे आयोजन
मुंबई : भारतात क्रूझ पर्यटनाला चालना मिळावी सोबतच जलमार्गाचा वापर अधिकाधिक व्हावा आणि यातून लाखोंना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी मुंबईत पहिल्या भारतीय आंतरराष्ट्रीय क्रूझ परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी केंद्रीय बंदरे, शिपिंग आणि जलमार्गांचं सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. येत्या काळात भारताला क्रूझ हब म्हणून ओळख निर्माण करुन देण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी दिली.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, खासदार अरविंद सावंत, खासदार राहुल शेवाळे आणि मोठ्या प्रमाणात अधिकारी वर्गाची उपस्थिती होती. केंद्र सरकार, मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि फिक्कीकडून या क्रूझ परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीजवळील लाईट हाऊसचे देखील ऑनलाईन अनावरण करण्यात आले.

यावेळी माध्यमांशी बोलताना सोनोवाल म्हणाले की, "भारतात समुद्री पर्यटन आणि रिव्हर पर्यटनाला चालना देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. ज्यात देश आणि परदेशातून वेगवेगळे प्लेयर इथे आले आहेत. केंद्राकडून क्रूझ पर्यटनाला चालना मिळावी यासाठी एका टास्कफोर्सची स्थापना देखील करण्यात आली आहे. ज्यात जलमार्गातून होणाऱ्या पर्यटनाला चालना देण्याचा आणि सागरी मार्गातील आपली शक्तीचा वापर कसा करायचा यावर खलबतं होत आहेत."

भारतीय आंतरराष्ट्रीय क्रूझ परिषदेत देखील क्रूझ पर्यटनाबद्दल चर्चा होईल आणि या उद्योगाला चालना मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करु, असा विश्वास सोनोवाल यांनी व्यक्त केला. देशातील वेगळ्या प्रांतातील पर्यटन मंत्री आणि अधिकारी वर्गाची या क्रूझ परिषदेला उपस्थिती बघायला मिळाली.

भारत सरकारकडून टास्क फोर्स आणि पोर्ट, शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालयाकडून देखील चालना मिळवी म्हणून मदत करतील, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री सोनोवाल यांनी केले. ज्यात अधिकारी आणि क्रूझ पर्यटनातील कंपन्यांचा देखील समावेश करणार असून खासगी कंपन्या देखील आपल्या सूचना देऊ शकतील.

केंद्र सरकारचा क्रूझ पर्यटनातून मोठ्या प्रमाणात रोजगार तयार व्हावा हा उद्देश आहे. सोबतच जलशक्तीचा आणि जलमार्गाचा वापर अधिक व्हावा यासाठी प्रयत्नात मोदी सरकारच्या पहिल्या टर्मपासून होत असल्याचं बघायला मिळत आहे.

जलमार्ग आणि क्रूझ पर्यटनात आधुनिकीकरण करण्याचा देखील केंद्राचा विचार आहे. यासंदर्भात केंद्रीय बंदरे, शिपिंग आणि जलमार्गमंत्रालयाकडून देखील पुढाकार घेण्यात येणार आहे.

"कोविडमुळे यात व्यत्यय आला होता, मात्र आता पुन्हा क्रूझ पर्यटन सुरु होईल ज्यामुळे रोजगार मिळण्यास आणि पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होईल," असं देखील केंद्रीय मंत्री सोनोवाल म्हणाले.

येत्या काही दिवसात या क्षेत्राला एका उंचीवर नेण्यासाठी भारत सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल असा विश्वास केंद्रीय मंत्री सर्बानंदसोनोवाल यांनी व्यक्त केला.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#मबईत #पहलय #भरतय #आतररषटरय #करझ #परषदच #आयजन

RELATED ARTICLES

‘हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार’, संयमी एकनाथ शिंदे भडकले

मुंबई, 26 मे : शिवसेनेचे (Shiv Sena) ठाण्यातील बडे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी परिवहन मंत्री अनिल परब...

Iron Rich Food : लाल रंगांच्या फळांमध्ये आहे लोहाची कमतरता दूर करण्याची क्षमता

Iron Rich Food : लाल रंगांच्या फळांमध्ये आहे लोहाची कमतरता दूर करण्याची क्षमता अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...

यूजर्सच्या गोपनीयतेचा केला भंग, ट्विटरला 15 कोटी डॉलर्सचा दंड

Fine On Twitter: मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरवर आपल्या वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे ट्विटरला 15...

Most Popular

अगायाया खतरनाक! ‘या‘ शेतकऱ्यांने पिकवलेल्या आंब्याला चक्क 2 ते 3 लाख रुपये किलो

नवी दिल्ली, 25 मे : ओडिशाच्या बारगढ जिल्ह्यातील (Odisha bargadh district) एका शेतकऱ्याने (farmer) जगातील सर्वात महागड्या आंब्यांमध्ये गणल्या जाणार्‍या आंब्याच्या प्रजातीचे झाड मोठे...

कारागृह अधीक्षकाच्या मुलाची पुण्यात हत्या; तरुणीसह पाच जण ताब्यात, घटनेनं खळबळ

Pune Crime : पुण्यात एका युवकाच्या हत्येच्या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे. गिरीधर गायकवाड (giridhar gaikwad) असे हत्या...

Skin Care for Men : मुलांनो, वयापेक्षा लहान व तरूण दिसाल, फक्त ताबडतोब सोडा ‘या’ 4 घाणेरड्या सवयी, लग्नात नवरीपेक्षा चमकेल चेहरा..!

सौंदर्य वा स्कीन केअर ही गोष्ट केवळ स्त्रियांनीच केली पाहिजे असं काही नाही. पुरुषांनी देखील याकडे लक्ष दिले पाहिजे. जर नाही दिले तर...

एलिमिनेटर सामन्यात बंगळुरुचा लखनऊवर थरारक विजय, क्वॉलिफायर-२ मध्ये राजस्थानसोबत करणार दोन हात

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) या टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेमध्ये आज एलिमिनेटर लढत खेळवली गेली. लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघांमध्ये खेळवलेल्या...

IPL 2022 मध्ये दोन भावांच्या दोन कहाण्या, एक हिरो तर दुसरा झिरो!

मुंबई, 25 मे : आयपीएल 2022 आता (IPL 2022) शेवटच्या टप्प्यावर आली आहे. स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच खेळत असलेल्या गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि लखनऊ...

IPL 2022 : विराट कोहलीची बॅटींग पाहून बदलला गांगुलीचा चेहरा, पाहा VIDEO

मुंबई, 26 मे : रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं लखनऊ सुपर जायंट्सचा (RCB vs LSG) 14 रननं पराभव करत आयपीएल 2022 मधील दुसऱ्या क्वालिफायरमध्ये प्रवेश...