Saturday, November 27, 2021
Home मुख्य बातम्या मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी! मुंबईतील सर्व उद्याने, मैदाने, चौपाट्या सकाळी 6 ते रात्री...

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी! मुंबईतील सर्व उद्याने, मैदाने, चौपाट्या सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत सुरू


मुंबई, 16 ऑगस्ट : मुंबई महानगरपालिकेने (BMC) नवीन नियमावली जाहीर केली आहे. यानुसार आता निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेत मुंबईतील (Mumbai) सर्व उद्याने (Gardens), मैदाने (Play grounds), चौपाट्या सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, असे असले तरी कोविड संबंधित सर्व नियमांचे अर्थात सोशल डिस्टन्सिंग, चेहऱ्यावर मास्क परिधान करणे अनिवार्य आहे. या संदर्भात मुंबई महानगरपालिकेने एक पत्रकही काढलं आहे. (BMC allows opening of grounds, gardens, beaches & seafronts from 6 am to 10 pm)

आपल्या पत्रकात मुंबई महानगरपालिकेने म्हटलं आहे की, कोविड 19 प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करण्यात अडचणी येण्याची शक्यता लक्षात घेऊन कोविड प्रसाराला आळा घालण्यासाठी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात निर्बंधांबाबत यापूर्वी वेळोवेळी पारित केलेले आदेश या आदेशाद्वारे रद्द करण्यात येत आहेत. तथापि, राज्य शासनाच्या आदेशातील अनुक्रमांक 8मध्ये दिलेल्या अधिकारानुसार, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मैदाने, उद्याने, चौपाट्या आणि समुद्रकिनारे केवळ सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी असेल.

महाराष्ट्रात Delta Plus व्हेरिएंटचा धोका वाढला; विषाणूचे तीन वेगवेगळे रूप आढळले

ब्रेक-द-चेन अंतर्गत राज्य शासनाने 11 ऑगस्ट 2021 रोजी पारित केलेल्या आदेशातील इतर सर्व तरतुदी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पुढील आदेशापर्यंत जशाच्या तशा लागू होतील. शासनाने वेळोवेळी जाहीर केल्याप्रमाणे आणि 11 ऑगस्ट 2021 रोजीच्या आदेशातील नमूद केल्यानुसार सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर व इतर उपाययोजना अनिवार्य राहतील.

सदर आदेशाची अंमलबजावणी करण्यास कोणत्याही व्यक्तीने टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शवल्यास संबंधितांचे विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 मधील कलम 51 ते 60 व भारतीय दंड संहिता, 1860 मधील कलम 188 आणि लागू असणाऱ्या इतर कायदेशीर तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल असंही पत्रकात म्हटलं आहे.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#मबईकरसठ #दलसदयक #बतम #मबईतल #सरव #उदयन #मदन #चपटय #सकळ #त #रतर #परयत #सर

RELATED ARTICLES

वाईट! दलित नवरदेव घोड्यावर बसला म्हणून केली दगडफेक, 12 जण जखमी

राजस्थान, 27 नोव्हेंबर: राजस्थानची (Rajasthan)राजधानी जयपूर (Jaipur) ग्रामीणमधील पावटा भागात गुरुवारी रात्री उशिरा गोंधळ झाला. दलित व्यक्तीच्या वरातीवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली...

Parambir Singh : परमबीर सिंहांची आता सीआयडी चौकशी! मुंबईत दाखल होताच चौकशीचा ससेमिरा

Parambir Singh : मुंबईत दाखल झाल्यानंतर चौकशीसाठी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात हजेरी लावणाऱ्या परमबीर सिंह (Parambir Singh)यांना आता सीआयडी...

विकी आणि कतरिनाच्या लग्नाबद्दल विकीच्या बहिणीने दिली माहिती; म्हणाली…

Katrina Kaif Vicky Kaushal Wedding :  अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) हे...

Most Popular

गंभीर आजाराशी झुंजतायत अनिल कपूर? जर्मनीतून व्हिडीओ शेअर

अनिल कपूर यांच्या चाहत्यांना मोठा धक्का  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही....

संप अखेर मिटला? कर्मचाऱ्यांनी कामावर जाण्याचे ST कृती समितीचं आवाहन

मुंबई, 26 नोव्हेंबर : एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी ठाम राहणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचा (st bus strike) संप अखेर मिटल्यात जमा झाला आहे....

IND vs NZ: श्रेयससाठी संकटमोचक ठरला सूर्या, 2 मुंबईकरांच्या नात्याचा पाहा VIDEO

कानपूर, 27 नोव्हेंबर:  कानपूर टेस्टमध्ये शतक झळकाल्यानं श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या चर्चेत आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणातच शतक झळकावणाऱ्या श्रेयसचं सध्या सर्वजण कौतुक...

Corona च्या नव्या स्ट्रेनला WHO नं दिलं नाव, म्हणाले…

जिनेव्हा, 27 नोव्हेंबर: कोरोना व्हायरस (Corona Virus) पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसत आहे. कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरिएंटनं सर्वांचीच चिंता वाढवली आहे. जागतिक...

Petrol, Diesel Price : दिवाळीपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमती जैसे थे

Petrol, Diesel Price Today, Petrol Diesel Rate 27 November : देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती सलग 25व्या दिवशी बदललेल्या नाहीत....

“अनिल देशमुखांप्रमाणे मलाही अडकवण्याचं कटकारस्थान, अमित शहांकडे तक्रार करणार”

Nawab Malik : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत खळबळजनक आरोप केला आहे. आपल्याला अडकवण्याचा कट रचला जात असल्याचं मलिकांनी...