स्टार प्रवाहने अलिकडेच या नव्या शोचा ट्रेलर लॉन्च केला. (Dance show) नृत्याचे वेगवेगळे प्रकार हटके पद्धतीने या शोमध्ये दाखवले जाणार आहेत. त्यामुळे ही स्पर्धा नक्कीच प्रचंड अटीतटीची असणार आहे. या स्पर्धकांमधून सुपरस्टार निवडण्याची मोठी जबाबदारी अंकुश चौधरीच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे.
‘पुरुषांच्या चुकीसाठी महिला दोषी नसतात’; रिचा चड्ढाचा शिल्पा शेट्टीला पाठिंबा
अर्जुन-जान्हवीच्या नात्यात का होता दुरावा? 15 वर्ष केलं नव्हतं संभाषण
‘मी होणार सुपरस्टार’ या रिअलिटी शोविषयी सांगताना अंकुश म्हणाला, “पंधरा वर्षांनंतर पुन्हा एकदा टेलिव्हिजनकडे वळताना अतिशय आनंद होत आहे. विशेष म्हणजे मी महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी स्टार प्रवाहसोबत पहिल्यांदाच जोडला जातोय आणि जजची भूमिकाही पहिल्यांदाच पार पाडतोय. डान्स हा माझ्या अतिशय आवडीचा विषय आहे. या शोमध्ये जरी मी जज असलो तरी मी टीव्हीसमोर बसलेल्या प्रेक्षकांच्या प्रतिनिधीची जबाबदारी पार पाडणार आहे. फरक एवढाच असेल की प्रेक्षक या कार्यक्रमाचा आनंद घरबसल्या घेतील आणि मी प्रत्यक्ष घेईन.”
Published by:Mandar Gurav
First published:
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#म #हणर #सपरसटर #अकश #चधरच #वरषनतर #छटय #पडदयवर #पनरगमन