Friday, August 12, 2022
Home मुख्य बातम्या ‘मी शब्द पाळला’ अजित पवारांच्या दाव्यावर राज्यापालांनी फेरलं पाणी!

‘मी शब्द पाळला’ अजित पवारांच्या दाव्यावर राज्यापालांनी फेरलं पाणी!


मुंबई, 04 ॲागस्ट : mpsc आयोगाच्या सदस्य नियुक्ती विलंब वादावरून आता थेट राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor of Maharashtra )यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांवर (ajit pawar) पलटवार केला आहे. अजितदादांनी mpsc यादीचा निर्णय 31 तारखेला घेतला असं सांगितलं. पण राज्यपालांनी सदरील यादी २ ॲागस्टला यादी मिळल्याचा खुलासा केला आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ट्वीट करून अजित पवारांचा दाव्यातून हवा काढण्याचा प्रयत्न केला आहे. एमपीएससी सदस्य नियुक्तीची फाईल राजभवन येथे सोमवारी प्राप्त झाली आहे.

‘एमपीएससी सदस्य नियुक्तीची फाईल अगोदरच राजभवन येथे पाठविली आहे अशा आशयाच्या बातम्या काही वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. त्या अनुषंगाने स्पष्ट करण्यात येते की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांच्या नियुक्तीसंदर्भात शिफारस असलेली नस्ती सोमवार दिनांक २ ऑगस्ट रोजी दुपारनंतर राजभवन येथे प्राप्त झाली असून ती राज्यपालांच्या विचाराधीन आहे’, असं राजभवनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

विशेष म्हणजे, mpsc परीक्षार्थिंनी 31 जुलैनंतर क्या हुआ तेरा वादा? असं म्हणत थेट अजित पवारांनाच टार्गेट केलं होतं. त्यावर खुलासा करण्यासाठी रोहित पवार मैदानात उतरले होते. mpsc आयोग नियुक्तीसंबंधी यादी अजित पवारांनी या पूर्वीच राज्यपालांकडे पाठवली असल्याचं tweet करत अजित पवारांनी आपला शब्द पाळल्याचा दावा केला होता.

थोडक्यात पवारांनी या विलंबासाठी मी नाहीतर राज्यपाल जबाबदार असल्याचं सुचित केलं होतं. पण त्यावर राज्यपालांनी थेट tweet द्वारेच पलटवार करून आपल्याकडे यासंबंधीची नस्ती ही मुळात 2 ऑगस्टला प्राप्त झाल्याचं सांगून अजित पवारांना उघड पाडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राज्यपाल आणि सरकारमधलं tweet वॉर पुढे नेमकं कसं वळणं घेतंय हे पाहणं मोठं रंजक ठरू शकतं.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#म #शबद #पळल #अजत #पवरचय #दवयवर #रजयपलन #फरल #पण

RELATED ARTICLES

आशिया खंडातील दुसऱ्या सगळ्यात मोठ्या होर्डिंगवर झळकलं दगडी चाळ 2 चं पोस्टर

मुंबई, 12 ऑगस्ट-   मराठी चित्रपटांची सध्या चांगलीच हवा दिसून येत आहे. नुकतंच 'चंद्रमुखी' या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान चित्रपटाचं पोस्टर चक्क विमानावर झळकलं...

पालिकेच्या वॉर्ड पुनर्रचनेत बदल, शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाणार 

Shivsena : शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर मुंबई महानगर पालिकेच्या (mumbai municipal corporation) वॉर्ड पुनर्रचनेत बदल करण्यात...

जगातील सर्वात प्राचीन भाषा अशी ओळख असलेल्या संस्कृत दिनाचा इतिहास काय? जाणून घ्या सविस्तर

World Sanskrit Day 2022 : हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रावण (Shravan 2022) महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी संस्कृत दिवस साजरा केला...

Most Popular

मुंबईकरांनो सावधान! शहरात एका दिवसात 79% कोरोनाचे रुग्ण वाढले

 आरोग्य विभागाच्या आकडेवारीत ही माहिती समोर आली आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित...

तांदळाचे दरही आता वाढणार?; भातपिकाखालील क्षेत्रात १३ टक्क्यांनी घट

वृत्तसंस्था, नवी दिल्लीमहागाईपाठोपाठ देशात तांदूळटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. चालू खरीप हंगामात पाच ऑगस्टपर्यंत देशातील भातपिकाखालील क्षेत्रात १३ टक्क्यांनी घट झाली असून, कमी...

कला विश्वात शोककळा, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या गायकाचं निधन

नवी दिल्ली : कला विश्वात सध्या मोठ्या घटना घडत आहेत. सगळ्यांना खळखळून हसवणारे राजू श्रीवास्तव यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू...

Ind vs Zim: लोकेश राहुल फिट, झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची नव्यानं घोषणा

मुंबई, 11 ऑगस्ट: 18 ऑगस्टपासून भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्याला सुरुवात होत आहे. या दौऱ्यासाठी बीसीसीआयनं काही दिवसांपूर्वीच संघाची घोषणा केली होती. दुखापतीमुळे लोकेश राहुलच...

विस्ताराला 40 दिवस, आता खातेवाटपही रखडलं! महत्वाची दोन कारणं, ज्यामुळं खातेवाटपाची प्रतीक्षा

Maharashtra Cabinet News : शिंदे-फडणवीस सरकारचा 40 दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार (cabinet expansion) झाला मात्र आता खातेवाटप रखडलं आहे....

12th August 2022 Important Events : 12 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

12th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. याचबरोबर श्रावण महिन्यालाही सुरुवात झाली आहे. श्रावण...