Friday, May 20, 2022
Home करमणूक 'मी आणि नथुराम पुस्तक वाचल्यावर कळेल की हे..' अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

‘मी आणि नथुराम पुस्तक वाचल्यावर कळेल की हे..’ अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत


मुंबई, 14 मे- अभिनेत्री राधिका देशपांडे हिला अभिनयाशिवाय (Actress Radhika Deshpande) लेखनाची खूप आवड आहे. ती साहित्यामध्ये नेहमीच रमताना दिसते. नुकतीच तिनं ‘मी आणि नथुराम’ या अभिनेते शरद पोंक्षे यांच्या पुस्तकाबद्दल एक पोस्ट लिहिली आहे. सध्या तिची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.
नेमकी काय आहे पोस्ट?
अभिनेत्री राधिका देशपांडे हिनं शरद पोंक्षे यांच्या ‘मी आणि नथुराम’ या पुस्तकासोबत फोटो पोस्ट करत म्हटलं आहे की, ‘पुस्तकातला माणूस…एक सवय आहे मला प्रवासात पुस्तक नेण्याची. खिडकीतून डोकावून कंटाळा आला, सहप्रवश्यांबरोबर गप्पा मारून डोकं शिणलं की मी पुस्तकात डोकं घालून बसते. प्रवासाचा मला कंटाळा येत नाही आणि मला माणसं वाचायला आवडतात, मग आणलेलं पुस्तक तसंच purse मधे राहतं.

वाचा-नेहा कक्करच्या पतीसोबत घडला विचित्र प्रकार,फेमस होटेलमधून चोरीला गेल्या वस्तू
पण…. ह्या वेळेला तसं झालं नाही. मी होते आणि हे पुस्तक होतं. “मी आणि नथुराम”, शरद पोंक्षे ह्यांनी ते लिहिलं आहे.शरद दादा ला कोण नाही ओळखत. त्याचं आयुष्य उघड पुस्तका सारखं आहे असं मला सगळेच सांगायचे. आत बाहेर असं काहीच नाही म्हणायचे. एका कलाकाराचं आयुष्य आत एक अणि बाहेर एक असं असतं खरंतर. Emotional roller coaster ride म्हणूया. सतत टांगती तलवार आणि बंदुकीच्या जोरावर तयार असावं लागतं, पडेल ते काम करायला तत्पर.मला हे पुस्तक रिटर्न गिफ्ट होतं शरद दादा कडून. मी त्याला माझं पुस्तक दिलं, त्यानी त्याचं मला.दहा दिवस झाले माझं हे बेस्ट सेलर पुस्तक वाचणं होतच नव्हतं. मग “आम्ही घेतो वाचायला” अशी वक्र दृष्टी पुस्तकावर पडायला लागली म्हणून पुस्तकाचा प्रवास सुरू केला.

वाचा-PSI असलेली ‘ही’ अभिनेत्री लवकरच बांधणार लग्नगाठ, मेंदी आणि हळदीचा Video Viral
मी आणि मीच असं हे पुस्तक नाही, नथुराम आणि नथुरामच असं पण नाही, ह्यात घटना, प्रसंग, प्रेक्षक मंडळी, कलाकार मंडळी, माणसंच माणसं आहेत. हा प्रवास आहे एका कलाकाराचा जो आपल्या लेखणीच्या शाईने आपल्याला नेत राहतो एका प्रदेशात. त्या काळात आपण प्रवेश करतो आणि एखाद्या स्क्रीन प्ले सारखं आपल्या डोळ्यासमोर सगळं उभं राहतं. वेळेचं भान राहत नाही, ह्या प्रवासातली कितीतरी स्टेशनं झपाझप मागे सरतात. आपण कुठे आहोत ह्याचं भान राहत नाही. भानावर येतो जेंव्हा शरद दादा आपल्याशी आपल्या बाजूला बसून स्वतः सगळं सांगतो आहे असं वाटतं. हो, असं होतं. मग माझंच मला हसू येतं, ‘वेडी का खुळी तू‘ म्हणत मीच मला टपली मारते. हसू येण्यासारखे खूप प्रसंग ह्या पुस्तकात आहेत, डोळे पाणावणारे आहेत. राग येतो, वाईट वाटतं आणि “येस!” असा उद्गार येत आनंद ही होतो.

सिनेमा बघितला की आपल्याला कळतं तो सुपर हिट का झाला तसंच ह्या पुस्तकाचं आहे. वाचल्यावर तुम्हाला कळेल हे पुस्तक book shelf मधे front centre का असावं. मी हे पुस्तक पुरवून पुरवून वाचलं. उशाशी ठेवून प्रत्येक पानावरची वाक्य वेचत. शब्दांची माळ गळ्यात घालून सकारात्मक प्रवास सुरू केला. शरद दादा थेट आहे, सच्चा आहे, प्रेमळ आहे, निर्भीड आहे, असाधारण कलाकार आहे, माणूस धर्म पाळणारा एक साधारण माणूस ही आहे. दादा, तू इथे आमच्याशी नुसता संवाद साधत नाहीस तर थेट हृदयात घर करतोस’. हे पुस्तक कोणी वाचावं?..अस म्हणत तिनं तिच्या ब्लॉगची लिंक देखील शेअर केली आहे. सध्या तिची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#म #आण #नथरम #पसतक #वचलयवर #कळल #क #ह #अभनतरच #पसट #चरचत

RELATED ARTICLES

Raj Thackeray : राज ठाकरेंकडून अयोध्या दौरा स्थगित केल्याची घोषणा; पण पुण्यातील सभा होणार

Raj Thackeray :  गेले अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा अयोध्या दौरा अखेर...

ज्याची भिती होती ते घडलंच; भारतात कोरोनाच्या सब-व्हेरिएंटचा सापडला पहिला रूग्ण

ओमिक्रॉनचा नवा व्हेरियंट सापडल्याने पुन्हा नवं संकट उभं राहिलं आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर प्रश्नचिन्ह, दौरा स्थगित होण्याची शक्यता

मुंबई, 20 मे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे 5 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर (Raj Thackeray Ayodhya Tour) जाणार आहेत. मात्र,...

Most Popular

Oppo Smartphones: लवकरच लाँच होणार Oppo Reno 8 Series चे तीन स्मार्टफोन्स, ५० MP कॅमेरासह मिळतील हे फीचर्स

नवी दिल्ली : Upcoming Oppo Smartphones: Oppo आपली आगामी Reno 8 स्मार्टफोन सीरीज २३ मे रोजी चीनमध्ये लाँच करणार असून रिपोर्ट्सनुसार, आगामी फ्लॅगशिप...

बालकलाकार म्हणून मनोरंजन विश्वात पदार्पण, आता साऊथ इंडस्ट्रीवर राज्य करतोय ज्युनियर एनटीआर!

Jr. NTR Birthday : साउथ इंडस्ट्रीचा सुपरस्टार ज्युनियर एनटी रामाराव अर्थात ज्युनियर एनटीआर (Jr. NTR ) आज (20...

महिलांसाठी Taliban चा नवा फर्मान, ऐकून तुम्हीही डोक्याला हात लावाल

काबूल, 20 मे: तालिबाननं (Taliban) आता एक नवं फर्मान काढलं आहे. तालिबाननं गुरुवारी निर्देश दिले की सर्व टीव्ही चॅनेलवर काम करणाऱ्या सर्व महिला...

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर प्रश्नचिन्ह, दौरा स्थगित होण्याची शक्यता

मुंबई, 20 मे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे 5 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर (Raj Thackeray Ayodhya Tour) जाणार आहेत. मात्र,...

भारतीयांची चिंता वाढवणारी बातमी; देशात सापडला ओमिक्रॉनच्या BA.4 व्हेरियंटचा पहिला रुग्ण

हैदराबादः भारतात करोना संसर्ग आता आटोक्यात येत आहे. महाराष्ट्रातही करोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असताना भारतीयांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. भारतात...

IPL 2022 : विराटने गुजरातला धुतलं, तरी मुंबईच ठरवणार RCB चं भवितव्य!

मुंबई, 19 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) करो या मरो सामन्यात आरसीबीने गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans vs RCB) 8 विकेटने पराभव...