Thursday, July 7, 2022
Home लाईफस्टाईल मालकाच्या Work From Home मुळे आजारी पडली मांजर; डॉक्टरांनी सांगितलं शॉकिंग कारण

मालकाच्या Work From Home मुळे आजारी पडली मांजर; डॉक्टरांनी सांगितलं शॉकिंग कारण


लंडन, 26 मे : कोरोना काळात बऱ्याच लोकांनी वर्क फ्रॉम होम (Work from home side effect) केलं. काही ऑफिसेस आता सुरळीत झाले असले तर काही कंपन्यांनी आणखी काही महिने किंवा कायम घरून काम करण्याचा पर्याय निवडला आहे. वर्क फ्रॉम होममुळे काही लोकांन बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. आता तर याला पाळीव प्राणीही अपवाद ठरले नाहीत असंच म्हणावं लागेल. कारण असंच एक शॉकिंग प्रकरण समोर आलं आहे. मालकाच्या वर्क फ्रॉम होममुळे एक मांजर आजारी पडलं आहे (Cat ill due to owner’s work from home).
25 वर्षांचा हॅरी जॉन्स ज्याची मांजर त्याच्यासाठी खूप खास आहे. पण हॅरी जेव्हापासून घरून काम करू लागला तेव्हापासून त्याची मांजर विचित्र वागू लागली. एक दिवस तर मांजर रडू लागलं. ती दरवाजावर आपली नखं मारत होती. त्यामुळे तो अस्वस्थ झाला. त्याला तिची चिंता वाटू लागली. घाबरलेल्या हॅरीने तिला घेऊन पशूतज्ज्ञांकडे धाव घेतली. प्राण्यांच्या डॉक्टरांनी मांजरीची तपासणी केली, त्यानंतर त्यांनी जे सांगितलं ते हैराण करणारं होतं. तिच्या आजारपणाचं कारण दुसरंतिसरं काही नाही तर खुद्द हॅरीच होता. तो घरात पूर्ण दिवस असल्याने ती अशी वागत होती.
हे वाचा – Video Game खेळत टॉयलेट सीटवर बसला, खालून सापाने साधला डाव; गुप्तांगात दात घुसले आणि…
डॉक्टर सांगितल्यानुसार, हॅरीची मांजर पूर्णपणे ठिक आहे. तिला कोणताच आजार नाही. पण हॅरीच्या वर्क फ्रॉममुळे ती वैतागली. तिला घरात कमी जागा मिळत असल्याने ती त्रस्त आणि नाराज होती.  जेव्हा हॅरी ऑफिसला जायचा तेव्हा घरात तिच्या एकटीचं राज्य असायचं. संपूर्ण घरात ती आपल्या मर्जीने खेळायची, मस्ती करायची, हिंडायची. पण जेव्हापासून हॅरी घरातून काम करू लागला तशी तिला जागा कमी, घर लहान वाटू लागलं. तिचा दिनक्रम बदलला, स्वातंत्र्य हिरावून घेतल्यासारखं वाटू लागलं आणि हळूहळू तीसुद्धा बदलू लगली. तिचा स्वभाव बदलला, ती चिडचिड करू लागली.  जेव्हा हॅरी ऑफिस आणि घरी असा असेल तेव्ही तिची ही समस्या आपोआप सुटेल.
हे वाचा – बापरे बाप! वृद्ध व्यक्तीला सिंहाने जबड्यात धरून फरफटत नेलं; कॅमेऱ्यात कैद झालं भयावह दृश्य
पशूतज्ज्ञांच्या मते, प्राण्यांमध्ये असा बदला सामान्य आहे. घरात एखादं सामान आणल्यास, घरात बरेच लोक किंवा पार्टीच्या निमित्ताने पाहुणे आल्यासही असं होऊ शकतं. हा बदल कोणत्याही प्रकारे असू शकतो. अशा त्रासामुळे मांजरांन सिस्टिटिस होऊ शकतो. त्यामुळे घरात जास्त वेळ राहणाऱ्या मालकांनी त्यांच्यापासून लपून राहण्याचा प्रयत्न करावा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#मलकचय #Work #Home #मळ #आजर #पडल #मजर #डकटरन #सगतल #शकग #करण

RELATED ARTICLES

कोच बदलल्यानंतर टीम इंडियाची कामगिरीही बदलली, राहुल द्रविड का आलाय निशाण्यावर?

मुंबई, 6 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये टीम इंडियाची (India vs England 5th Test) कामगिरी निराशाजनक झाली आहे. चौथ्या इनिंगमध्ये इंग्लंडला विजयासाठी 378...

एक-दोन नाही 38 खून मीच केले’; जामकरसमोर कबुली देणाऱ्या अजितची नवी खेळी?

मुंबई 6 जुलै: झी मराठीवरील (Zee Marathi) देवमाणूस 2 (Devmanus 2) ही मालिका सध्या वेगवेगळ्या ट्विस्टने भरून गेली आहे. एकीकडे डिम्पल आणि डॉक्टर...

पीटी उषा, इलैयाराजांसह 4 दिग्गज राज्यसभेत, पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली, 6 जुलै : भारताची महान ऍथलीट पीटी उषा (PT Usha) यांची राज्यसभा खासदार (Rajya Sabha Nominated) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे....

Most Popular

Amravati : उमेश कोल्हेंच्या हत्येतील मुख्य आरोपीला बलात्कारच्या गुन्ह्यात जेल, ‘लवजिहाद’चा आरोप

Amravati Crime News : उमेश कोल्हे यांच्या हत्येतील मुख्य आरोपी असलेला इरफान याला मध्यप्रदेश मधील इंदोर पोलिसांनी बलात्कारच्या...

Special Report :बंडखोरांचं थेट टीकास्त्र, मात्र बंडखोरांच्या आरोपांबाबत संजय राऊतांचं का मौन

<p><strong>Special Report :</strong> राज्याच्या राजकारणाला वळण लावणारं बंडखोरांचं सत्तांतर नाट्य राज्यात सुरू झालं..आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या..याच आरोपांमध्ये आता बंडखोरांनी थेट संजय राऊतांवरच...

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -  काली पोस्टर वादावर ट्वीटरने उचललं मोठं पाऊल; लीना...

दीपिका नव्हे तर रणवीरच्या आयुष्यात असती अनुष्का शर्मा ! ‘त्या’ तरुणीमुळे प्रेमभंग

दीपिकाच्या आधी रणवीरच्या आयुष्यात अनुष्का शर्माला खास जागा, 'त्या' तरुणीमुळे बिनसल   अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे...

Healthy Poha : ब्रेकफास्टमध्ये पोहे खाताय; जाणून घ्या आरोग्यदायी फायदे!

Healthy Poha : ब्रेकफास्टमध्ये पोहे खाताय? जाणून घ्या, आरोग्यदायी फायदे! अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

Aurangabad: संजय राऊत यांनी महिला आमदारांबद्दल अपशब्द वापरल्याचा भुमरेंचा आरोप; काय म्हणाले…

Aurangabad News: शिवसेनेतून बंडखोरी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवीन सरकार स्थापन केले आहे. मात्र गेल्या दोन आठवड्यात...