Thursday, July 7, 2022
Home विश्व मारियुपोलमध्ये रशियाला शरण आलेले युक्रेनी सैनिक युद्धकैदी; झिल्येन्स्की यांनी केली महत्त्वाची मागणी

मारियुपोलमध्ये रशियाला शरण आलेले युक्रेनी सैनिक युद्धकैदी; झिल्येन्स्की यांनी केली महत्त्वाची मागणी


वृत्तसंस्था, कीव्हः मारियुपोलमधील पोलाद प्रकल्पावर रशियाच्या हल्ल्यापासून नागरिकांचे संरक्षण करताना शरण आलेल्या युक्रेनी सैनिकांना युद्धकैदी ठरवण्यात आले आहे. या सैनिकांना आंतरराष्ट्रीय मदत मिळावी अशी मागणी युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमिर झिल्येन्स्की यांनी केली आहे.

आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस समितीने शेकडो सैनिकांचे नाव, जन्म तारीख, जवळचे नातेवाइक यांची माहिती संकलित केली आहे. युद्धकैदी जाहीर केल्याने या सैनिकांना जीनिव्हा करारानुसार मानवी वागणूक मिळावी यासाठी या माहितीचे संकलन केल्याचे रेड क्रॉसने म्हटले आहे. अझोवस्तल पोलाद प्रकल्पातील १७०० युक्रेनी सैनिक सोमवारी शरण आल्याचे रशियन प्रशासनाने सांगितले आहे. मारियुपोल शहरात या सैनिकांनी तीन महिने रशियासोबत संघर्ष केला. रशियन लष्कराने काही सैनिकांना रशियाचा पाठिंबा असलेल्या फुटीरतावाद्यांच्या ताब्यातील प्रदेशात नेले होते. दरम्यान, रशियन लष्कर आपल्या सैनिकांना मारियुपोलमधून दुसरीकडे हलवणार असल्याची शक्यता ब्रिटनने व्यक्त केली आहे. पूर्व युक्रेनमध्ये हल्ले तीव्र करण्यासाठी रशियन लष्कर सैनिकांना तैनात करू शकते, असे ब्रिटनने म्हटले आहे.

‘रशियाने अन्नधान्य रोखले’

न्यूयॉर्क : ‘रशियाने युक्रेनविरोधातील संघर्षात अन्नाचा शस्त्रासारखा वापर केला असून, लक्षावधी लोकांचे अन्नधान्य रोखून धरले आहे,’ असा आरोप अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिकंन यांनी केला. रशिया युक्रेनमध्ये आक्रमण करून तेथील नागरिकांचे धैर्य मोडू शकला नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीच्या बैठकीत ते बोलत होते. युद्धामुळे काळ्या समुद्रातील सागरी व्यापार ठप्प झाला असून, हा प्रदेश नौकानयनासाठी असुरक्षित बनला आहे. त्यामुळे युक्रेनमधील कृषी निर्यात अडकली असून, जागतिक अन्नपुरवठा विस्कळित झाला आहे, असेही ब्लिंकन म्हणाले.

रशियाच्या हल्ल्यात १२ ठार

कीव्ह : युक्रेनमधील लिसिचान्स्क आणि सेव्हरोदोनेत्स्क या शहरांत रशियाने केलेल्या हल्ल्यात १२ जण ठार झाल्याची माहिती ल्युहान्स्क प्रांताचे गव्हर्नर सेरहिय हैदाई यांनी शुक्रवारी दिली. या हल्ल्यात ६० घरे उद्‌ध्वस्त झाल्याचे त्यांनी सांगितले. सेव्हरोदोनेत्स्क येथील हल्ल्यात रशियाचे नुकसान झाल्याचा दावाही त्यांनी केला.

युद्धातील घडामोडी

– युक्रेनला १८ अब्ज डॉलरची मदत देण्यास जी-७ देशांच्या गटाने मंजुरी दिल्याचे जर्मनीचे अर्थमंत्री ख्रिस्तियान लिंडनर यांनी सांगितले.

– अमेरिकेने मंजूर ४० अब्ज डॉलरच्या मदती व्यतिरिक्त युक्रेनला आणखी एक कोटी डॉलर मूल्याची लष्करी उपकरणे देण्याचे जाहीर केले.

– युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमिर झिल्येन्स्की यांनी अमेरिकेने मंजूर केलेल्या ४० अब्ज डॉलरच्या मदतीबद्दल आभार व्यक्त केले आहेत.

– रशियाने डोनबास भागात हल्ले तीव्र केल्याचे युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमिर झिल्येन्स्की यांनी म्हटले आहे.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#मरयपलमधय #रशयल #शरण #आलल #यकरन #सनक #यदधकद #झलयनसक #यन #कल #महततवच #मगण

RELATED ARTICLES

कोच बदलल्यानंतर टीम इंडियाची कामगिरीही बदलली, राहुल द्रविड का आलाय निशाण्यावर?

मुंबई, 6 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये टीम इंडियाची (India vs England 5th Test) कामगिरी निराशाजनक झाली आहे. चौथ्या इनिंगमध्ये इंग्लंडला विजयासाठी 378...

एक-दोन नाही 38 खून मीच केले’; जामकरसमोर कबुली देणाऱ्या अजितची नवी खेळी?

मुंबई 6 जुलै: झी मराठीवरील (Zee Marathi) देवमाणूस 2 (Devmanus 2) ही मालिका सध्या वेगवेगळ्या ट्विस्टने भरून गेली आहे. एकीकडे डिम्पल आणि डॉक्टर...

पीटी उषा, इलैयाराजांसह 4 दिग्गज राज्यसभेत, पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली, 6 जुलै : भारताची महान ऍथलीट पीटी उषा (PT Usha) यांची राज्यसभा खासदार (Rajya Sabha Nominated) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे....

Most Popular

कन्फर्म! १४ जुलैला येतोय सॅमसंगचा 6000mAh बॅटरीचा स्मार्टफोन, किंमत खूपच कमी

नवी दिल्लीः Samsung ने Galaxy M13 सीरीज ला भारतात लाँच करण्याच्या तारखेची घोषणा केली आहे. कंपनी १४ जुलै रोजी भारतात आपला Galaxy M13...

ब्रिटिश सरकारमध्येही बंड? 2 मंत्र्यांचा अचानक राजीनामा

मुंबई, 6 जुलै : महाराष्ट्रातील सत्ताबदलाचं नाट्य शांत झालेलं असतानाच ब्रिटनमध्येही बंडाचे वारे वाहू लागले आहेत. ब्रिटनचे आरोग्य मंत्री साजिद जाविद (Sajid Javid)...

Solar Stove : महागड्या सिलेंडरला करा बाय-बाय, बाजारात आलाय सरकारी सोलार स्टोव्ह

वाढत्या सिंलेंडरच्या दराचे काळजी करु नका. आता बाजारात त्याला ही नवा पर्याय आला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

Heart Attack Cause : महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये हदयविकाराचा धोका जास्त, वाचा यामागचं कारण

Cause Of Heart Attack In Males : आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे हदयासंबंधित आजारांचं प्रमाण वाढताना दिसत आहे. मागील काही...

Marathi News : Marathi batmya, मराठी बातम्या, Latest News in Marathi, Live Breaking Marathi News | Lokmat News18

आज दिनांक ६ जुलै २०२२ वार बुधवार .आज आषाढ शुक्ल सप्तमी आहे.चंद्र कन्या राशीतून भ्रमण करेल.तिथून तो गुरूसोबत प्रतियोग करेल. पाहूया आजचे बारा...

Maharashtra Rain Update : राज्यातील या भागात अलर्ट, पुढचे 4 ते 5 दिवस मुसळधार…

मुंबई, 6 जुलै : राज्यात सध्या विविध ठिकाणी जोरदार (Maharashtra Rain) पाऊस होत आहे. सातारा, सांगली कोल्हापूर, मुंबई यासह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस...