Saturday, July 2, 2022
Home लाईफस्टाईल माधुरी दीक्षितने बोल्डनेसची केली हद्दपार, लुक असा की तुम्हीही म्हणाल सौंदर्य असावं...

माधुरी दीक्षितने बोल्डनेसची केली हद्दपार, लुक असा की तुम्हीही म्हणाल सौंदर्य असावं तर असं!


बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितच्या (Madhuri Dixit) सौंदर्याचे लाखो दिवाने आहेत. प्रत्येक लुकमध्ये ती अगदी सुंदर आणि आकर्षक दिसते. अभिनयामुळे माधुरी सातासमुद्रापलिकडे पोहोचली. पण ती तिच्या हटके फॅशनमुळे देखील ओळखील जाते. तिच्या प्रत्येक आउटफिटची बी-टाउनमध्ये चांगलीच चर्चा रंगताना दिसते. वेस्टर्न आउटफिट असो वा पारंपरिक पोषाख माधुरीचं सौंदर्य हे प्रत्येक ड्रेसमध्ये अगदी खुलून दिसतं. आता हेच बघा ना वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही तिचं सौंदर्य तसुभरही कमी झालेलं नाही.

आजही बॉलिवूडच्या टॉप तरुण अभिनेत्रींना ती तगडी टक्कर देते. पारंपरिक पोषाखामध्ये देखील माधुरी विविध प्रयोग करताना दिसते. साध्या सरळ लुकला देखील बोल्ड लुक कसा देता येईल याकडे ती आवर्जून लक्ष देते. ग्लॅमरस अभिनेत्रींच्या यादीमध्ये ती नेहमीच टॉपला राहिली आहे. माधुरीकडे सुंदर साड्यांचे अगदी कमालीचं कलेक्शन आहे. तिच्या प्रत्येक फोटोमधून ते लक्षात येतंच. साडीमधील तिचा लुक पाहून तर माधुरीवर कौतुकाचा वर्षाव होतो. तिचा असाच एक लुक प्रचंड व्हायरल झाला होता. पण साडीवर तिने परिधान केलेला बोल्ड ब्लाउज अधिक चर्चेचा विषय ठरला. तिचा हा लुक नेमका कसा होता यावर एक नजर टाकुया.
(फोटो सौजन्य – इंडिया टाइम्स, इन्स्टाग्राम @madhuridixit, @shaleenanathani)

सिल्क साडीमधील आकर्षक लुक

माधुरी तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून वेगवेगळ्या लुकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. तिच्या या फोटोंवर काही मिनिटांमध्येच लाइक्स आणि कमेंट्सचा पाउस पडतो. एका डान्स रिएलिटी शोसाठी देखील माधुरीने सिल्क साडी परिधान केली होती. जांभळ्या रंगाच्या या साडीमध्ये ती भलतीच सुंदर दिसत होती. फॅशन लेबल रॉ मँगोच्या या साडीचा रंग अगदी गडद होता. यामुळे तिचा लुक अगदी खुलून दिसत होता. ही साडी तयार करण्यासाठी सिल्क आणि ब्रोकेड फॅब्रिकचा वापर करण्यात आला होता. माधुरीने केलेली साडीची निवड अगदी परफेक्ट होती.

(एकीकडे बेबोच्या भावाचा मेंदी सोहळा, दुसरीकडे करिश्माने सुंदर कुर्ता घालून उडवला धुरळा)

​माधुरीची दिलखेच अदा

माधुरीने परिधान केलेली गडद रंगाची साडी दिसायला अगदी साधी असली तरी साडीवर प्रत्येक ठिकाणी गोल डिझाइनमध्ये सोनेरी रंगाची फुलं, जियोमॅट्रिकल मोटिफ्स तयार करण्यात आले होते. तसेच डिझाइनला मॅचिंग अशीच सोनेरी रंगाची बॉर्डर साडीला देण्यात आली होती. या बॉर्डवर जरी वर्क करत फ्लोरल पॅटर्न तयार करण्यात आला होता. तसेच साडीचा पदर अगदी हेवी होता. साडीच्या पदरावर सोनेरी रंगाची डिझाइन करण्यात आली होती. साडी दिसायला जेवढी साधी होती तितकाच तिचा लुकही अगदी सुंदर आणि हटके होता. खरं तर साडीचा गडद रंग माधुरीला अगदी शोभून दिसत होता.

(Oops! जेव्हा रॅम्पवर चालता-चालता अक्षरशः कोसळल्या ‘या’ अभिनेत्री आणि मग पुढे…)

​बोल्ड ब्लाउज

माधुरी बोल्ड लुकमध्येही अगदी कमालीची दिसते. तिला आजवर आपण अनेक बोल्ड आणि हॉट लुकमध्ये पाहिलं आहे. आजही तरुणींना लाजवेल असं तिचं सौंदर्य आणि फिटनेस आहे. पारंपरिक साडी असेल तर त्याला बोल्ड टच कसा देता येईल हे तिला चांगलंच ठाउक आहे. म्हणूनच या साध्या आणि आकर्षक साडीवर देखील तिने बोल्ड ब्लाउज परिधान करणं पसंत केलं होतं. सोनेरी रंगाचा स्लीव्हलेस ब्लाउज माधुरीने परिधान केला होता. या ब्लाउजला डिप यू कट नेकलाइन टच देण्यात आला होता. ब्लाउजला मॅचिंग एक सुंदर दोरी देखील होती. इतकंच काय तर हा ब्लाउज बॅकलेस असल्याने अभिनेत्रीचा बोल्ड लुक अगदी उठून दिसत होता. या साडीमध्ये तिने छोटं फोटोशूट देखील केलं होतं.

(सोनाक्षी सिन्हाला पारदर्शक ड्रेसमध्ये पाहून भडकले लोक, हॉट अवतार पाहून म्हणाले…)

​सौंदर्य असं की…

धकधक गर्लच्या सौंदर्याचं करावं तितकं कौतुक कमीच आहे. या वयातही ती फॅशन बाबतीत करत असलेले प्रयोग तर क्या बात…आता हेच बघा ना साधी-सरळ साडी पण यामध्येही तिने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. आणि तेही बोल्ड ब्लाउजमुळे. तिचं सौंदर्य असं की ते पाहून प्रत्येकाच्या तोंडून हमखास निघतं ही सौंदर्याची खाण आहे. माधुरीला साधा आणि नॅचरल मेकअप आवडतो. या साडीवर देखील तिने अगदी साधा मेकअप केला होता. मोठी लाल टिकली, लाइट गुलाबी रंगाची लिपस्टिक, लाइट टोन फाउंडेशन, काजळ, डार्क आयब्रोज, मिडल पार्टेट हेअरस्टाइल असा तिचा लुक होता.

(बिपाशाने जेव्हा २३ हजार रुपयांचा ड्रेस लाखोंचा असल्याचं सांगितलं, रेड कार्पेटवरच Price Tagमुळे सत्य आलं समोर)

सुंदर दागिने

अभिनेत्रीच्या चेहऱ्यावरील हास्य तिच्या सौंदर्यामध्ये अधिक भर घालतं. तिचे प्रत्येक लुकमधील फोटो हे अगदी पाहण्यासारखे असतात. या साडीवरचे माधुरीचे फोटो देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. विशेष म्हणजे तिची दागिन्यांची निवड कमालीची होती. हिऱ्यांनी सजलेले मोठे इयररिंग्स, हातात सोनेरी रंगाचे हिऱ्यांनी सजलेलेच कडे, हातात अंगठी असे दागिने तिने परिधान केले होते. विशेष म्हणजे केसामध्ये तिने गजरा माळला होता. तिचा हा पारंपरिक लुक समोरच्याला मोहात पाडणारा होता.

(कृति सेनॉनने स्वेटशर्टसह परिधान केली ही पँट! फोटो पाहून म्हणाल, ‘काय म्हणायचं या स्टाइलला’)अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#मधर #दकषतन #बलडनसच #कल #हददपर #लक #अस #क #तमहह #महणल #सदरय #असव #तर #अस

RELATED ARTICLES

वेबविश्वात आणखी एक खळबळ! रानबाजारनंतर खुर्चीचं राजकारण; पानसेंची नवी वेबसिरीज भेटीला

मुंबई 1 जुलै: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलाढाली होत आहे. एक ना अनेक अनपेक्षित उलथापालथ सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या सध्याच्या याच पार्श्वभूमीवर...

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

‘E म्हणजे एकनाथ आणि D म्हणजे देवेंद्र हे आमचे ED चे राज्य’

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी पणजी, 1 जुलै : मुंबईत सध्या विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज...

Most Popular

९९९ रुपयात ५० तास चालणारे ईयरबड्स, फक्त १० मिनिटाच्या चार्जिंगवर ३ तासाचा बॅटरी बॅकअप

नवी दिल्लीः जर तुम्हाला कमी बजेट मध्ये मोठी बॅटरी लाइफचे ईयरबड्स खरेदी करायचे असतील तर Defy Gravity Z ईयरबड्स तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतात....

जिन्स पँटच्या पाठीमागच्या खिशात फोन ठेवताय?, ‘या’ ५ समस्याला तुम्ही निमंत्रण देताय

never keep phone in your back pocket : रस्त्यांवरून जात असताना आपल्या समोर असलेल्या व्यक्तीच्या मागच्या खिशात ठेवलेला स्मार्टफोन आपल्याला बऱ्याच वेळा दिसला...

Guilty Minds Review: ‘गिल्टी माईंड’ कोर्टरुम ड्रामा, वैयक्तिक नातेसंबंध अन् वास्तविकता…

Guilty Minds Drama Director: Shefali Bhushan Starring: Shriya Pilgaonkar, Varun Mitra, Karishma Tanna, Sugandha Garg, Namrata Sheth Guilty Minds Review :...

उदयपूर हत्याकांडात मोठा खुलासा! आरोपी गौस मोहम्मद 30 लोकांना घेऊन गेला होता पाकिस्तानात

Udaipur Murder Case : राजस्थानमधील उदयपूर येथील कन्हैया लाल या तरूणाच्या हत्येचा तपास करणाऱ्या एसआयटी टीमला धक्कादायक माहिती...

sushmita sen shared her experience about work with mahesh bhatt in her debut film | “मी रागात होते अन् त्यांनी माझा हात पकडला…” सुष्मितानं...

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन सोशल मीडियावर नेहमची काही ना काही कारणानं चर्चेत असते. काही वर्षं चित्रपटांतून ब्रेक घेतल्यानंतर सुष्मितानं ‘आर्या’ या वेब सीरिजमधून...

विराटचं चाललंय तरी काय, अशाप्रकारे बाद झाला की तुम्हीच कपाळाला हात लावाल

बर्मिंगहम, 1 जुलै : क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) इंग्लंडविरुद्धच्या (Ind Vs Eng Test Match) कसोटीत ज्याप्रकारे बाद झाला त्यावरुन त्याच्यावर टीका केली...