Saturday, August 13, 2022
Home करमणूक माझ्या मुलांना यात ओढू नका, राज कुंद्रा प्रकरणावर शिल्पानं मौन सोडलं

माझ्या मुलांना यात ओढू नका, राज कुंद्रा प्रकरणावर शिल्पानं मौन सोडलं


हायलाइट्स:

  • पोर्नोग्राफी प्रकरणी शिल्पा शेट्टीने सोशल मीडियावर मांडली भूमिका
  • याप्रकरणापासून मुलांना आणि कुटुंबाला दूर ठेवण्याचे केले आवाहन
  • माझा मुंबई पोलिस आणि भारतीय न्याय यंत्रणेवर विश्वास आहे-शिल्पा

मुंबई : पोर्नोग्राफी प्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा आणि उद्योगपती राज कुंद्राला अटक झाली आहे. राज कुंद्रामुळे शिल्पा शेट्टी खूपच चर्चेत आली आहे. शिल्पा शेट्टीबद्दल अनेक बातम्या सातत्याने समोर येत आहेत. इतके दिवस शिल्पाने या सर्वांवर मौन बाळगले होते. परंतु आता तिने याप्रकरणावर तिने तिची भूमिका सोशल मीडियावर पोस्ट द्वारे व्यक्त केली आहे.

काय म्हणाली शिल्पा शेट्टी

शिल्पा शेट्टीने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, ‘हो! गेले काही दिवस आमच्यासाठी खूपच आव्हानात्मक होते. आमच्याबाबत खूप अफवा पसरल्या आणि आरोप झाले आहेत. माध्यमांनी आणि (नसलेल्या) हितचिंतकांनी माझ्यावर ब-याच अनावश्यक टिपण्या केल्या. आमच्या विरोधात खूप सारे ट्रोलिंग केले, आम्हांला प्रश्न विचारले… फक्त मलाच नाही तर माझ्या कुटुंबालाही. याप्रकरणावर मी कोणतेही भाष्य केलेले नाही. कारण हे प्रकरण न्यायालयात आहे. मी बोलत नाही म्हणून म्हणून कृपया माझ्या वतीने खोटे कोट देणे थांबवा.

शिल्पाने पुढे लिहिले आहे की, ‘एक सेलिब्रिटी म्हणून “कधीही तक्रार करू नका, कधीही खुलासा देऊ नका” या माझ्या तत्त्वज्ञानाची पुनरावृत्ती करेन. मी एवढेच म्हणेन की, ही चालू असलेली तपासणी न्यायालयीन असल्याने मला मुंबई पोलीस आणि भारतीय न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे.’

शिल्पाने पुढे लिहिले आहे की, ‘एक कुटुंब म्हणून, आम्ही आमच्या सर्व उपलब्ध कायदेशीर उपायांचा अवलंब करत आहोत. पण, तोपर्यंत मी तुम्हाला नम्रपणे विनंती करते – विशेषत: आई म्हणून – माझ्या मुलांच्या भविष्यासाठी आमच्या खासगीपणाचा आदर करा आणि तुम्हाला विनंती करते की, सत्यता पडताळल्याशिवाय अर्धवट माहितीवरून वक्तव्य करण्यापासून दूर राहा.’

शिल्पाने असेही नमूद केले आहे की, ‘मी कायद्याचे पालन करणारी एक भारतीय नागरिक आहे आणि गेली २९ वर्षांपासून खूप मेहनतीने काम करत आहे. लोकांनी नेहमीच माझ्यावर विश्वास ठेवला आहे आणि मी कोणालाही निराश केलेले नाही. तर, सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मी तुम्हाला विनंती करतो की, या काळात माझ्या कुटुंबाचा आणि माझ्या गोपनीयतेच्या अधिकाराचा आदर करा. आम्हाला मीडिया ट्रायलची गरज नाही. कृपया कायद्याला मार्ग दाखवू द्या.’ सत्यमेव जयते!

अशा शब्दांत शिल्पाने तिची भूमिका मांडली आहे.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#मझय #मलन #यत #ओढ #नक #रज #कदर #परकरणवर #शलपन #मन #सडल

RELATED ARTICLES

Thackeray vs Shinde : प्रतिसेना भवनावरुन आरोप-प्रत्यारोप ABP Majha

<p>शिंदे गटाकडून दादरमध्ये प्रति सेनाभवन उभारण्यात येणार आहे. &nbsp;शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. यासोबतच शिंदे गटाकडून प्रत्येक प्रभागामध्ये...

24 वेळा पाहिला अनुष्काचा सिनेमा; तो सीन पाहून पेटवून घेतलं, तरुणाचा मृत्यू

या तरुणाने स्वतःवरच 20 लिटर पेट्रोल ओतून घेतलं आणि स्वतःलाच पेटवलं. या घटनेत तो गंभीररित्या भाजला. गंभीर अवस्थेच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं,...

Track location: एखाद्या व्यक्तीचे लोकेशन ट्रॅक करता येते का? जाणून घ्या संपूर्ण माहिती…

मुंबई: आजकाल असे बरेच अ‍ॅप्स आले आहेत. ज्यांच्या मदतीने आपण अगदी सहजपणे एखाद्या व्यक्तीचे लोकेशन ट्रॅक करू शकतो. त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या हालचालींवर लक्ष...

Most Popular

विश्वचषक फुटबॉल स्पर्धा २१ ऐवजी २० नोव्हेंबरपासून

एपी, जीनिव्हा : यजमान कतारला सलामीचा सामना खेळता यावा आणि त्यापूर्वी उद्घाटन सोहळय़ाचे आयोजन करता यावे, या हेतूने आगामी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला नियोजित...

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी लक्ष्मण मुख्य प्रशिक्षक

नवी दिल्ली : राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मणची झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे, अशी माहिती ‘बीसीसीआय’चे...

Todays Headline 13th August : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या 

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत...

Thackeray vs Shinde : प्रतिसेना भवनावरुन आरोप-प्रत्यारोप ABP Majha

<p>शिंदे गटाकडून दादरमध्ये प्रति सेनाभवन उभारण्यात येणार आहे. &nbsp;शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. यासोबतच शिंदे गटाकडून प्रत्येक प्रभागामध्ये...

पुण्यश्र्लोक महाराणी अहिल्याबाई होळकर यांची आज पुण्यतिथी; यानिमित्त जाणून घ्या त्यांचे जीवनचरित

Ahilyabai Holkar Death Aniversary : एक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण आणि कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar)...