प्राजक्ता माळीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिने एका पेपरवर Y हे इंग्रजी अक्षर लिहिले आहे. त्याखाली तिने #24 जून असेही म्हटले आहे. सध्या तिची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
वाचा-‘माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय घेण्यासाठी मला..’ अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत
नेमकी काय म्हणाली आहे या पोस्टमध्ये प्राजक्ता ?
या पोस्टला कॅप्शन देताना तिने म्हटलं आहे की, माझा पाठिंबा आहे ! आपला…?” असा प्रश्न तिनं विचारला आहे. त्यावर अनेक चाहत्यांनी कमेंट करत ‘माझा तुम्हाला पाठिंबा आहे’, अशी प्रतिक्रिया एकाने दिली आहे. तर आणखी एका नेटकऱ्याने ‘जिथे तुमचा पाठिंबा तिथे आमचा’ असे म्हटले आहे. तर आणखी एकाने प्रश्न विचारला आहे की, कशाला😮😮😮😍😍😍😍?कशासाठी😍😍😍आणि कोणासाठी❤️❤️❤️❤️❤️🔥🔥🔥🔥🔥…अशा कमेंट प्राजक्ताचा या पोस्टवर येत आहेत.
प्रादक्ता माळीनं अशी पोस्ट करण्यामागं कारण काय?
सध्या अभिनेत्री मुक्ता बर्वेच्या वाय सिनेमाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे. मुक्ता बर्वे या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन अजित सूर्यकांत वाडीकर यांनी केले आहे. तर सिनेमाची निर्मिती कन्ट्रोल एन् प्रॉडक्शनने केली आहे. हा सिनेमा सत्य घटनांवर आधरित आहे. सिनेमाचं पोस्टरची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. पोस्टर पाहून सिनेमा पाहण्याची उत्सुकता लागली आहे. 24 जूनला सिनेमा मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. मुक्ताला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. या सिनेमाचं सध्या प्राजक्त माळीनं सोशल मीडियावरून प्रमोशन केलं आहे.
Published by:News18 Trending Desk
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#मझ #पठब #आह #अभनतर #परजकत #मळच #त #पसट #नमक #कणबददल