Monday, July 4, 2022
Home लाईफस्टाईल मांजर खातपित नाही म्हणून डॉक्टरकडे नेलं; मेडिकल रिपोर्ट पाहून मालकाला बसला धक्का

मांजर खातपित नाही म्हणून डॉक्टरकडे नेलं; मेडिकल रिपोर्ट पाहून मालकाला बसला धक्का


लखनऊ, 22 जून : माणसांप्रमाणे प्राण्यांनाही बऱ्याच समस्या उद्भवतात. आजार जडतात. त्यामुळे त्यांच्या वागण्यातही बदल होतो. असाच बदल एका व्यक्तीने आपल्या मांजरात पाहिला. त्या व्यक्तीच्या मांजराने खाणंपिणं सोडलं होतं. त्यामुळे तिला चिंता वाटू लागली. अखेर आपलं मांजर का खातपित नाही, यामागील कारण जाणून घेण्यासाठी मालकाने मांजरीला डॉक्टरांकडे नेले. वैद्यकीय रिपोर्ट पाहून त्याला धक्काच बसला (Needle stuck in cat neck).
उत्तर प्रदेशच्या अलिगढमधील हे प्रकरण आहे. जकारिया मार्केटजवळ राहणारे अशहब यांनी एक मांजर पाळलं आहे. बऱ्याच दिवसांपासून त्यांची मांजर काही खातपित नव्हती. तिच्या घशात समस्या असल्यासारखं त्यांना वाटत नव्हतं. पण नेमकं कारण समजत नव्हतं. शेवटी त्यांनी तिला डॉक्टरांकडे नेलं. सुरेंद्र नगरमधील एका डॉक्टरांना तिला दाखवण्यात आलं. तिथं तिच्या घशात काही समस्या आहे का, हे तपासण्यासाठी तिच्या काही चाचण्या करण्यात आल्या. तिचा एक्स-रे रिपोर्टमध्ये जे दिसलं ते पाहून मालक शॉक झाला. मांजरीच्या घशात चक्क सुईदोरा होता.
हे वाचा – VIDEO : हातात साधा पॅन घेऊन खतरनाक मगरीला मारायला गेले आजोबा; धक्कादायक शेवट
डॉक्टरांनी मांजरीच्या घशातील हा सुईदोरा काढण्याचं ठरवलं. पण ते तितकं सोपं नव्हतं. तब्बल दोन तासांच्या प्रयत्नांनंतर मांजरीच्या घशातील हा सुईदोरा मांजरीला कोणतीही दुखापत न करता काढण्यात डॉक्टरांना यश मिळालं. त्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून मांजर नीट खाऊपिऊ लागलं.
टीव्ही 9 हिंदीच्या रिपोर्टनुसार या मांजरीवर उपचार करणारे पशूतज्ज्ञ डॉ. विराम यांनी सांगितलं की, घशातून सुईदोरा काढल्यानंतर मांजर आता नीट खाते-पिते आहेत. ती पूर्णपणे नीट आहे. पण घरात प्राणी पाळताना अशा छोट्या-छोट्या वस्तूंपासून त्यांना दूर ठेवायला हवं नाहीतर ते त्यांच्यासाठी जीवघेणं ठरू शकतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#मजर #खतपत #नह #महणन #डकटरकड #नल #मडकल #रपरट #पहन #मलकल #बसल #धकक

RELATED ARTICLES

July Born Baby Names: तुमच्या बाळांना द्या ‘ही’ सर्वात हटके अन् गोंडस नावं

मुंबई, 4 जुलै: आपल्या बाळाचं नाव (Baby Names) हटके असावं, असं प्रत्येकाला वाटतं. त्याचं नाव सुंदर असावं, त्याचा अर्थही चांगला असावा आणि ते नाव प्रत्येकाला...

गुजरातसोबत महाराष्ट्रात निवडणुका होतील, संजय राऊतांचा दावा

मुंबई, 04 जुलै :  'आता ही तात्पुरती केलेली व्यवस्था आहे. ही कायम स्वरुपाची नाही. भाजपला शिवसेना फोडायची होती. त्यांनी फोडून दाखवली. फुटीर गटाला...

ताब्यात घ्यायला शिवसेना म्हणजे काय युक्रेन आहे का? संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut On Maharashtra Election :  शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बंडखोर शिंदे गटाला थेट आव्हान दिलं आहे....

Most Popular

‘मिर्झापूर’ फेम अभिनेत्याचा एकाच महिन्यात येतो दोनदा बर्थडे, काय आहे हे गुपित?

मुंबई 04 जुलै: मिर्झापूरमध्ये एका गँगस्टरच्या रूपात आलेले बॉलिवूड अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) सध्या एकदम प्रकाशझोतात असतात. ज्या वयात लोक रिटायरमेंट कडे...

चित्रपटाच्या सेटवर रणबीरचा छळ; मारहाण केली तरी कुणी?

रणबीरनंच केला धक्कादायक उलगडा अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. #चतरपटचय #सटवर...

बहुप्रतीक्षित Asus ROG Phone 6 मार्केटमध्ये एन्ट्री करण्यास सज्ज, प्रोसेसर- फीचर असतील बेस्ट, पाहा लाँच डेट

नवी दिल्ली : Asus ROG Phone 6 Luanch Date: Asus ROG Phone 6 बाबत बाजारात बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू होती. फॅन्स या ROG...

Martin Cooper: जगातील पहिला मोबाइल फोन बनवणारी व्यक्ती फक्त ‘एवढ्या’ वेळ वापरते डिव्हाइस, दिला लाखमोलाचा सल्ला

नवी दिल्ली:Martin Cooper Inventor of Mobile Phone: आज जवळपास सर्वांच्याच हातात स्मार्टफोन पाहायला मिळतो. एकही घर असे नसेल जेथे स्मार्टफोनचा वापर केला जात...

स्टोक्सला मिळाल्या दोन लाईफलाईन, पण लॉर्ड ठाकूरने केलं काम तमाम! Video

एजबॅस्टन, 3 जुलै : भारत आणि इंग्लंड (India vs England 5th Test) यांच्यातल्या पाचव्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी बेन स्टोक्स (Ben Stokes) आणि जॉनी...

हंगामी सर्दी-तापाची लक्षणं कशी असतात? कोरोना आणि हंगामी तापातील फरक असा ओळखा

नवी दिल्ली, 04 जुलै : सीझनल फ्लू म्हणजे हंगामी ताप हा सर्व ऋतूंमध्ये आढळणारा फ्लू आहे. उन्हाळ्यात उष्माघात किंवा निर्जलीकरणामुळे होतो तर पावसाळ्यात...