Saturday, July 2, 2022
Home क्रीडा महेंद्रसिंह धोनीच्या 'त्या' सल्ल्यानंतर खेळ बदलला! रविंद्र जडेजाचा खुलासा

महेंद्रसिंह धोनीच्या ‘त्या’ सल्ल्यानंतर खेळ बदलला! रविंद्र जडेजाचा खुलासा


मुंबई, 2 ऑगस्ट : रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) हा सध्या टीम इंडियाचा नंबर 1 ऑल राऊंडर आहे. क्रिकेटमधील तीन्ही प्रकारात त्याने उपयुक्तता सिद्ध केली आहे. जडेजाच्या बॅटींगमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये मोठा बदल झाला आहे. तो एक विश्वासू लोअर ऑर्डर बॅट्समन बनला आहे. जडेजानं बॅटींगमधील बदलाचं श्रेय महेंद्रसिंह धोनीला (MS Dhoni) दिलं आहे. धोनीनं 2015 साली दिलेल्या सल्ल्यानंतर आपली बॅटींग बदलली, असा खुलासा जडेजानं केला आहे.
काय दिला होता सल्ला?
जडेजानं एका मुलाखतीच्या दरम्यान हा खुलासा केला आहे. ‘ज्या बॉलवर शॉट मारणे शक्य नाही, त्यावर देखील मी मारण्याचा प्रयत्न करत आहे, असं धोनीनं मला 2015 च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या दरम्यान सांगितलं होतं. करिअरच्या सुरुवातीला माझ्या बॅटींगमधील जजमेंट योग्य नव्हते.  एखाद्या बॉलवर शॉट मारावा की नाही, यावर मी अनेकदा गोंधळात पडत असे. धोनीच्या त्या सल्ल्यानंतर माझं आयुष्य बदललं,’ असं जडेजानं सांगितलं.
आयपीएलमध्ये खेळणार एकत्र
जडेजा सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये (WTC Final) त्याला फार काही कमाल करता आली नव्हती. त्यानंतर आता इंग्लंड विरुद्ध पाच टेस्टमध्ये चांगली कामगिरी करण्याचा त्याचा प्रयत्न असेल. अर्थात इंग्लंडमधील फास्ट बॉलिंगला मदत करणारे पिच पाहता जडेजाला सर्व पाच टेस्टमध्ये खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.
IND vs ENG : पहिल्या टेस्टपूर्वी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! इंग्लंडचा ‘तो’ प्लॅन उघड
इंग्लंड दौऱ्यानंतर लगेच यूएईमध्ये होणाऱ्या आयपीएल स्पर्धेत जडेजा आणि धोनी चेन्नई सुपर किंग्स (CSK) टीमकडून एकत्र खेळणार आहेत. कोरोना व्हायरसमुळे स्पर्धा स्थगित होण्यापूर्वी जडेजा जोरदार फॉर्मात होता. तोच फॉर्म यूएईमध्ये कायम ठेवून सीएसकेला विजेतेपद मिळवून देण्याचा जडेजाचा प्रयत्न असेल.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#महदरसह #धनचय #तय #सललयनतर #खळ #बदलल #रवदर #जडजच #खलस

RELATED ARTICLES

Sanjay Kute on BJP Politics : देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्याच बेबनाव? ABP Majha

<p>शिवसेनेच्या बंडखोरीत आमदारांसोबत सातत्यानं दिसले ते भाजपचे संजय कुटे.... &nbsp;सुरतपासून शिवसेनेच्या आमदारांसोबत असलेल्या संजय कुटेंनी एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत दिलीए... संजय कुटे हे...

अभिनेता संतोष जुवेकरच्या FBपेजवर अश्लील फोटो; अभिनेत्यानं दिलं स्पष्टीकरण

मुंबई, 2 जुलै : सध्या सोशल मीडिया (Social media) हा जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. त्यामुळे आपण प्रत्येक गोष्ट सोशल माध्यमांवर शेअर...

Most Popular

Flipkart वर सुरूये खास सेल, अवघ्या ७९ रुपयात मिळेल वस्तू; ८० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट उपलब्ध

नवी दिल्ली :Flipkart Big Bachat Dhamaal Sale: Flipkart वर बिग बचत धमाल सेल सुरू आहे. १ जुलैपासून सुरू झालेला हा सेल ३ जुलैपर्यंत...

Amazing Facts About July Month Babies : जुलै महिन्यात जन्मलेल्या मुलांबाबत काही अमेझिंग फॅक्ट्स, ज्या पालकांना देखील करतील सरप्राईज

July Born Baby Facts : जुलै महिन्यात जन्माला आलेली मुलं ही अतिशय आनंदी आणि फ्रेंडली असतात. या महिन्यात जन्माला आलेली मुलं अतिशय आश्चर्यकारक,...

PHOTO: जस्मिन भसीनचा पिंक लूक, पाहा तिची किलर स्टाईल

PHOTO: जस्मिन भसीनचा पिंक लूक, पाहा तिची किलर स्टाईल अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...

IND vs ENG 5th Test Live Score, Day 2: इंग्लंड विरुद्ध भारत पाचवी कसोटी- दुसऱ्या दिवसाचे लाइव्ह अपडेट

बर्मिंगहॅम: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याला काल सुरूवात झाली आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताच्या ऋषभ पंतने धमाकेदार शतक केले....

शेणामुळे बनली जोडी! लगेच इम्प्रेस झालं तरुणीचं कुटुंब; तरुणाशी लावून दिलं लग्न

रायपूर, 02 जुलै : असे बरेच तरुण आहेत ज्यांचं काही ना काही कारणामुळे लग्न होत नाही आहे. वय वाढत जातं पण लग्नासाठी मुलगी...

Smartphone Offers: प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करण्याची योग्य वेळ, Samsung Galaxy S21 FE 5G वर मिळतोय ३७ हजारांपर्यंत ऑफ

नवी दिल्ली:Samsung Galaxy S21 FE 5G Price: प्रीमियम सेगमेंटचा स्मार्टफोन खरेदी करायची प्रत्येक युजरची इच्छा असते. पण, जास्त किमतींमुळे, असे हँडसेट बर्‍याच युजर्ससाठी...