Thursday, May 26, 2022
Home करमणूक महिला कलाकारांसोबत गैरवर्तवणूक, समज देऊनही शिस्तभंग; अभिनेते किरण माने प्रकरणी स्टार प्रवाहचे...

महिला कलाकारांसोबत गैरवर्तवणूक, समज देऊनही शिस्तभंग; अभिनेते किरण माने प्रकरणी स्टार प्रवाहचे स्पष्टीकरण


दरम्यान या संपूर्ण प्रकरणी स्टार प्रवाह वाहिनीने सविस्तर निवदेन दिले आहे.

अभिनेते किरण माने हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. कोणतीही पूर्वसूचना न देता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून त्यांना काढण्यात आल्यानंतर या चर्चा सुरु झाल्या आहेत. राजकीय भूमिका घेत असल्याचे कारण देत ही कारवाई करण्यात आली. या घटनेनंतर अनेक कलाकारांनी त्यांना पुढे येऊन पाठिंबा दिला. तर दुसरीकडे राजकीय दबावाखाली येऊन मानेंना मालिकेतून काढण्यात आलं असल्याच्या आरोपाचं निर्मात्यांनी मात्र खंडन केलं आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणी स्टार प्रवाह वाहिनीने सविस्तर निवदेन दिले आहे.

‘मुलगी झाली हो’ ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर प्रदर्शित होते. गेल्या अनेक महिन्यांपासून या मालिकेत विविध ट्वीस्ट पाहायला मिळत आहे. दरम्यान नुकतंच या मालिकेत माऊच्या वडिलांची म्हणजे विलास पाटील ही भूमिका साकारणारे अभिनेते किरण माने यांना काढून टाकण्यात आले होते. राजकीय भूमिका घेत असल्याचे कारण देत ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता. याप्रकरणी आता स्टार प्रवाह वाहिनीने जाहीर निवदेन दिले आहे.

स्टार प्रवाहचे निवेदन

“मुलगी झाली हो’ या शोमध्ये विलास पाटील यांची व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेते किरण माने यांनी लावलेले आरोप बिनबुडाचे आणि काल्पनिक असल्याचे आम्हाला समजले आहे. त्यामुळे अशाप्रकारचे आरोप करणे दुर्देवी आहे.”

“या मालिकेच्या प्रोडक्शन हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, माने यांना शोमधून काढून टाकण्याचा निर्णय त्यांनी अनेक सह-कलाकारांसोबत, विशेषतः महिला नायिकेसोबत केलेल्या गैरवर्तनामुळे घेतला होता. अनेक सहकलाकार, दिग्दर्शक आणि शोच्या इतर युनिट सदस्यांचा ते अनादर करायचे. या आक्षेपार्ह वागणुकीविरुद्ध त्यांच्याविरोधात अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.”

“या तक्रारीनंतर किरण माने यांना अनेकदा समज देण्यात आली होती. पण, माने यांच्या वर्तनात कोणताही बदल झाला नाही. त्यांच्या या वागणुकीमुळे सेटवरील शिस्त आणि वातावरण बिघडू लागलं. त्यासोबत सहकलाकारांना, त्यातही महिलांना अवमानकारक वर्तणूक मिळत असल्याने त्यांना या मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.”

“आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संपूर्ण आदर करतो. पण त्यासोबतच आमच्या कलाकारांना, विशेषतः महिलांना एक सुरक्षित कार्यक्षेत्र देण्यास कटिबद्ध आहोत. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे,” असे जाहीर स्पष्टीकरण स्टार प्रवाह वाहिनीतर्फे देण्यात आले आहे.

“अशा प्रवृत्तीला यापुढे आमच्या हद्दीत प्रवेश नाही”, साताऱ्यात ‘मुलगी झाली हो’ मालिकेच्या शूटींगला नाकारली परवानगी

नेमकं प्रकरण काय?

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मा लोकप्रिय मालिकेमध्ये अभिनेते किरण माने यांनी विलास पाटील हे पात्र साकारलं होतं. अल्पावधीतच हे पात्र घराघरांमध्ये पोहचलं. किरण माने हे अनेकदा त्यांच्या भूमिकेबरोबरच सोशल मीडियावरील पोस्टमुळे सुद्धा चर्चेत असतात. ग्रामीण भाषेतील लहेजा त्यांच्या लेखणीमधून स्पष्टपणे जाणवतो. अनेकदा ते राजकीय भूमिकाही मांडताना दिसतात. मात्र आता याच राजकीय भूमिकांमुळे ते अडचणी सापडले आहेत. त्यांना राजकीय भूमिका घेतल्याने ‘मुलगी झाली हो’ मालिकेमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर #istandwith_KiranMane हा हॅशटॅग चर्चेचा विषय ठरतोय. अनेकांनी किरण मानेंवर झालेली कारवाई ही चुकीची असल्याचं म्हटलंय. मात्र त्याच वेळेस त्यांच्यावर टीकाही केली जाते आहे. 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.





अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#महल #कलकरसबत #गरवरतवणक #समज #दऊनह #शसतभग #अभनत #करण #मन #परकरण #सटर #परवहच #सपषटकरण

RELATED ARTICLES

यूजर्सच्या गोपनीयतेचा केला भंग, ट्विटरला 15 कोटी डॉलर्सचा दंड

Fine On Twitter: मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरवर आपल्या वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे ट्विटरला 15...

बॅकलेस ड्रेस घालून Karan Johar च्या पार्टीत पोहचली Ananya Panday

.सध्या बी-टाऊनमध्ये जर कशाची चर्चा होत असेल तर ती म्हणजे करण जोहरच्या बर्थडे पार्टीची अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

मालकाच्या Work From Home मुळे आजारी पडली मांजर; डॉक्टरांनी सांगितलं शॉकिंग कारण

लंडन, 26 मे : कोरोना काळात बऱ्याच लोकांनी वर्क फ्रॉम होम (Work from home side effect) केलं. काही ऑफिसेस आता सुरळीत झाले असले तर...

Most Popular

अनिल परबांच्या घरावर EDची धाड, परबांच्या संबंधित सात मालमत्तांवर ईडीकडून छापा

मुंबई, 26 मे : शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या मालमत्तांवर ईडीकडून धाड टाकण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,...

धक्कादायक! क्रिकेटर Shikhar Dhawan ला लाथा-बुक्क्यांनी मारहाण

मुंबई : आयपीएल 2022 च्या प्लेऑफसाठी 4 टीम पात्र ठरल्या. पण यामध्ये शिखर धवनची टीम पंजाब किंग्जचं नशीब यंदाही खराब ठरलं. पंजाबला प्लेऑफमध्ये...

IAS अधिकाऱ्यांना कुत्रे घेऊन फिरण्यासाठी खेळाडूंची स्टेडिअमधून हकालपट्टी

मुंबई, 26 मे : कोणत्याही स्टेडिअमवर पहिला हक्क हा खेळाडूंचा असतो. वेगवेगळ्या प्रकारातील सामन्यांबरोबरच खेळाडूंच्या सरावासाठी देखील स्टेडिअम महत्त्वाची आहेत. या स्टेडिअमवर आयएएस...

टॉपच घालायला विसरली मलायका, करण जोहरच्या पार्टी लूकमुळे ट्रोल

मलायका अरोरा करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीत टॉप घालायला विसरली, तिने बोल्ड इनरवेअर केले फ्लॉंट  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

IPL Memes: ‘विराटनं अखेर बदला घेतलाच’, RCB जिंकताच गौतम गंभीर ट्रोल, LSG ची उडवतायेत खिल्ली

IPL 2022 च्या दुसऱ्या प्लेऑफ सामन्यात रॉयल चॅलेजर्स बँगलोरनं (Royal Challengers Bangalore) बाजी मारली. त्यांनी लखनऊ सुपर जायंटचा (Lucknow Super Giants) तब्बल १४...

इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : माझ्याबाबतच्या चर्चेत लोकांना रस -हार्दिक | Indian Premier League Cricket People interested talking hardik pandya ysh 95

पीटीआय, कोलकाता : भारताचा अष्टपैलू हार्दिक पंडय़ाने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत अनेक चढ-उतार, दुखापती, शस्त्रक्रिया आणि वादविवादांचा सामना केला आहे. आक्रमक आणि बिनधास्त वृत्तीमुळे...