Saturday, July 2, 2022
Home मुख्य बातम्या 'महाराष्ट्रातील सत्तानाट्यात अजून बरंच काही होणे बाकी'; प्रकाश आंबेडकरांचं महत्वाचं भाष्य

‘महाराष्ट्रातील सत्तानाट्यात अजून बरंच काही होणे बाकी’; प्रकाश आंबेडकरांचं महत्वाचं भाष्य


Prakash Ambedkar Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातल्या राजकीय उलथापालथीवर प्रकाश आंबेडकरांनी सूचक ट्वीट केलं होतं. त्यानंतर एबीपी माझानं त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी सत्तानाट्यावर भाष्य करत महत्वाच्या बाबींवर मत व्यक्त केलं. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं की, या प्रक्रियेत विधानसभेच्या उपाध्यक्षांची भूमिका महत्वाची आहे. उपाध्यक्षांना कायद्याने इतके जास्त अधिकार आहेत की नाही ते पाहावं लागेल.  एकनाथ शिंदेंकडून सादर करण्यात येणाऱ्या पत्रावर ज्या आमदारांच्या सह्या आहेत त्या प्रत्येक आमदाराला प्रत्यक्ष बोलावून त्यांनी खरंच सही केलीय का? आणि केली असेल तर कोणत्या मानसिक अवस्थेत केलीय हे उपाध्यक्ष विचारु शकतात.

आंबेडकर यांनी म्हटलं की, एकनाथ शिंदेनी जरी राज्यपालांकडे आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र दिले तरी राज्यपाल फ्लोअर टेस्ट शिवाय सरकार बरखास्त करु शकणार नाहीत.  कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची इच्छा फ्लोअर टेस्ट व्हावी ही असणार. या आधी इतर राज्यात बहुमत सिद्ध करण्यासाठी न्यायालयानेही फ्लोअर टेस्टचे आदेश दिले आहेत, असं ते म्हणाले. 

त्यांनी म्हटलं की, एकनाथ शिंदे यांच्याकडे दोन तृतीयांश पेक्षा जास्त आमदार सध्या दिसत असले तरी भाजपसोबत सरकार स्थापन करण्यासाठी त्यांना त्यांच्या गट भाजपमध्ये विलिन करावा लागू शकतो. त्यामुळे त्यांचं शिवसेना म्हणून स्वतंत्र अस्तित्व राहणार नाही. एकनाथ शिंदे याला तयार होतील का? असंही आंबेडकर म्हणाले. 

आंबेडकर यांनी म्हटलं की, भारतीय जनता पक्षाकडून अजून पत्ते खुले करण्यात आलेले नाहीत. भारतीय जनता पक्षाकडून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंची कोंडी करण्यात आली आहे. आज जे भाजपविरोधी ते हिंदू विरोधी हे भाजपने सेट केलेले नॅरेटिव्ह विरोधी पक्षांना ब्रेक करता येत नाही. तेवढं धाडस त्यांच्यात नाही. महाराष्ट्रातील सत्ता नाट्यात अजून बरेच काही होणे बाकी आहे, असंही ते म्हणाले. 

प्रकाश आंबेडकर यांच्या ट्वीटनंतर राजकीय वर्तुळात वेगळी चर्चा

सरकार स्थापन करण्यासाठी भाजपमध्ये विलिनीकरण होण्याची अट शिंदे गटासमोर ठेवलीय का असा प्रश्न प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केला होता. प्रकाश आंबेडकर यांच्या या ट्वीटनंतर राजकीय वर्तुळात वेगळी चर्चा होऊ लागली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या गटाने भाजपमध्ये विलीन व्हावे आणि मगच सरकार स्थापन होईल अशी अट भाजपने एकनाथ शिंदेंना घातली आहे? असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. 

 अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#महरषटरतल #सततनटयत #अजन #बरच #कह #हण #बक #परकश #आबडकरच #महतवच #भषय

RELATED ARTICLES

वेबविश्वात आणखी एक खळबळ! रानबाजारनंतर खुर्चीचं राजकारण; पानसेंची नवी वेबसिरीज भेटीला

मुंबई 1 जुलै: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलाढाली होत आहे. एक ना अनेक अनपेक्षित उलथापालथ सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या सध्याच्या याच पार्श्वभूमीवर...

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

2 July 2022 Important Events : 2 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

2 July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

Most Popular

ब्रिटनच्या महाराणीला पब्लिक पर्समधून मिळणार £30m ‘बोनस’! सोबत राजेशाही उत्पन्नही मिळणार

Queen to Receive £30m Bonus : ब्रिटनच्या महाराणीला पुढील दोन वर्षांत सार्वजनिक पर्समधून सुमारे £30m चा महागाईसाठी "बोनस"...

इथं ठाकरेंचं, इस्त्राइलमध्ये बेनेट सरकार पडले, साडेतीन वर्षात पाचव्यांदा निवडणुकीची रणधुमाळी

इस्त्राइलमध्ये सार्वत्रिक निवडणुकांमध्ये राजकीय नेत्यांना मतदान करण्याऐवजी पक्षाला मतदान केलं जातं. त्यामुळं आघाडीची सरकार सत्तेवर येतात. आता साडेतीन वर्षात पाचव्यांदा निवडणूक होणार आहे. बेंजामिन...

आत्महत्या मुक्त महाराष्ट्र निर्माण करण्याचा मुख्यमंत्र्यांचा संकल्प – दीपक केसरकर

पणजी, गोवा : CM Eknath Shinde News : महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आत्महत्या केला आहेत. ही एक चिंतेची बाब आहे. त्यामुळे कृषी दिनी मुख्यमंत्री...

IND vs ENG Edgbaston Test Ollie Pope to field at short leg with Camera on Helmet vkk 95

इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाचवा कसोटी सामना आजपासून (१ जुलै) एजबस्टन येथे होत आहे. या कसोटीदरम्यान ब्रॉडकास्टर एक अनोखा प्रयोग करण्याची तयारी करत...