हायलाइट्स:
- रिलायन्स जिओची दमदार ऑफर.
- मोफत देत आहे जिओफोन.
- १,९९९ रुपये आणि १,४९९ रुपयांच्या प्लान्समध्ये मिळेल विशेष फायदे.
वाचाः TWS Earbuds खरेदी करताना ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात, होणार नाही नुकसान
Jio Phone: स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स
जिओफोन एक कॉम्पॅक्ट डिझाइनसह येणारा फीचर फोन आहे. यामध्ये २.४ इंच QVGA डिस्प्ले देण्यात आला असून, १५००एमएएचची बॅटरी मिळते, जी ९ तासांचा टॉकटाइम ऑफर करते.
जिओच्या या फोनमध्ये १२८ जीबीपर्यंत मायक्रोएसडी कार्ड सपोर्ट मिळतो. फोनमध्ये अल्फान्युमेरिक कीपॅड देण्यात आला असून, यामध्ये ४ नेव्हिगेशन बटन मिळतात. हँडसेटमध्ये ३.५ एमएम हेडफोन जॅक मिळतो. जिओ फीचर फोनमध्ये टॉर्चलाइट, एफएम रेडिओ, रिंगटोन, मायक्रोफोन आणि स्पीकर्स देण्यात आले आहे. यात ०.३ मेगापिक्सल रियर आणि फ्रंट कॅमेरा मिळतो. पॉवरफुल स्पीकर आणि मायक्रोफोन देण्यात आला आहे.
जिओचा हा ४जी फीचर फोन वॉइस असिस्टेंटसह येतो. म्हणजेच विना टाइप करता मेसेज पाठवू शकता व कॉलची सुविधा मिळेल. ही फोन हिंदी, इंग्रजीसह १८ भाषांना सपोर्ट करतो. यामध्ये My Jio, JioPay, JioCinema, JioSaavn, JioGames, JioRail, WhatsApp, Google Assistant, JioVideocall, Messages सारखे अॅप्स इंस्टॉल मिळतील.
जिओच्या या ४जी फीचर फोनला तुम्ही जिओ मीडिया केबलद्वारे टीव्हीशी देखील कनेक्ट करू शकता. हा फोन ४जी LTE, VoLTE आणि व्हिडीओ कॉल सपोर्ट करतो.
JioPhone २०२१ ऑफर
JioPhone २०२१ ऑफर अंतर्गत जिओफोन मोफत देत आहे. यूजर्सला १,९९९ रुपये आणि १,४९९ रुपयांच्या प्लान्ससोबत जिओफोन मोफत मिळेल.
जिओच्या १,९९९ रुपयांच्या प्लानची वैधता २ वर्ष आहे. या प्लानमध्ये ४८ जीबी डेटा आणि अनलिमिटेड वॉइस कॉलिंगची सुविधा मिळते. विशेष म्हणजे या प्लानमध्ये ४जी जिओफोन मोफत मिळतो. तसेच, जिओ अॅप्सचे सबस्क्रिप्शन देखील मोफत मिळेल.
१,४९९ रुपयांच्या जिओ प्लानची वैधता १ वर्ष आहे. या प्लानमध्ये अनलिमिटेड वॉइस कॉल आणि २४ जीबी डेटा मिळतो. यामध्ये ग्राहकांना जिओ अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन आणि जिओफोन मोफत मिळत आहे.
वाचाः फेसबुकची मक्तेदारी मोडीत, ‘हे’ बनले जगातील सर्वाधिक डाउनलोड करण्यात आलेले अॅप
वाचाः १०८ मेगापिक्सल कॅमेऱ्यासह येतात ‘हे’ स्मार्टफोन, किंमत २५ हजारांपेक्षा कमी
वाचाः आपोआप डिलीट होत आहे WhatsApp चॅट? जाणून घ्या काय आहे समस्या
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#मसतच #चकक #मफत #मळत #आह #Jio #Phone #कलगडटसह #मळतल #अनक #फयद #पह #डटलस