प्रियाला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत. पण प्रिया मराठी चित्रपटांमध्ये दिसत नसल्यानं चाहत्यांमध्ये एक वेगळीच चर्चा सुरू आहे. तिला मराठी चित्रपट करायचे नाहीत, असंही म्हटलं जात आहे. मराठी चित्रपटात काम करण्यास उत्सुक नसल्याच्या चर्चेवर आता खुद्द प्रियानंच मौन सोडलं आहे.
मला मराठी चित्रपट करायचे नाहीत असं म्हटलं जात आहे, पण हे खरं नाही, हा एक माझ्याविषयीचा गैरसमज निर्माण झालाय, असं प्रियानं म्हटलं आहे.
प्रियानं २०१८ मध्ये ‘आम्ही दोघी’ हा चित्रपट केला. त्यानंतर ती मराठी चित्रपटांत दिसली नाही. मला मराठी चित्रपट करायचा नाही, असा गैरसमज सध्या पसरला आहे, असं प्रिया सांगते. ती म्हणाली, ‘मला चांगल्या भूमिका करायच्या आहेत. खरं तर या चित्रपटानंतर मराठीत मला चांगल्या भूमिका मिळाल्या नाहीत. त्यामुळे चांगल्या भूमिकेची वाट पाहत आहे.’ असंही प्रियानं स्पष्ट केलं आहे.
विस्फोट
प्रिया लवकरच ‘विस्फोट’ या हिंदी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात प्रियासोबत फरदीन खान रितेश देशमुख असणार आहेत.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#मरठ #चतरपट #करयच #नहत #परय #बपट #सपषटच #बलल