Saturday, July 2, 2022
Home मुख्य बातम्या मराठा आरक्षण मिळवून देण्याची मोठी संधी भाजपने गमावली, लोकसभेत तरी भाजप खासदार...

मराठा आरक्षण मिळवून देण्याची मोठी संधी भाजपने गमावली, लोकसभेत तरी भाजप खासदार बोलणार का?
मुंबई : मराठा आरक्षणाचा न्यायालयीन लढा सुकर करण्याची संधी आज केंद्र सरकारला होती. परंतु याकडे दुर्लक्ष करून ही संधी भाजपने गमावली आहे, अशा शब्दांत मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. आज लोकसभेत 50 टक्क्यांची अट शिथिल करण्याबाबतची संधी होती. याबाबीचा घटनादुरुस्ती करताना समावेश झाला असता तर याचा नक्कीच फायदा झाला असता आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मार्ग सुकर झाला असता. परंतु याकडे केंद्राने दुर्लक्ष केलं. दुर्दैवी बाब म्हणजे याबाबत एकाही भाजपच्या खासदाराने आवाज उठवला नाही. आज त्यांना याबाबत बोलण्याची संधी होती परंतु ती संधी देखील खासदारांनी गमावली आहे. अशोक चव्हाण आज पत्रकार परिषदेत बोलत होते त्यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली.

याबाबत अधिक बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, राज्यांच्या अधिकारांबाबत घटना दुरुस्ती करताना 50 टक्के आरक्षण मर्यादा शिथिल करून मराठा आरक्षणाचा न्यायालयीन लढा सुकर करण्याची मोठी संधी केंद्र सरकारकडे होती. परंतु, केंद्राने ही संधी गमावली आहे. लोकसभेत मंजूर झालेल्या 127 व्या घटना दुरुस्तीबाबत प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. या विधेयकाचे चव्हाण यांनी स्वागत केले. पेगॅसिस, केंद्राचे काळे कृषी कायदे अशा अनेक मुद्यांवर संसद ठप्प असतानाही सर्व विरोधी पक्षांनी या महत्त्वपूर्ण विधेयकावर चर्चा केली व केंद्राला सहकार्य केले. परंतु, तसा समंजसपणा केंद्र सरकारला दाखवता आला नाही.

केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री डॉ. विरेंद्र कुमार यांनी आरक्षण मर्यादा शिथिल करण्याबाबत केंद्र सरकार योग्यवेळी विचार करेल, असे सांगितले. पण तो विचार करण्याची आणि संसदेत निर्णय घेण्याची हीच सुवर्ण संधी होती. आणखी किती काळ मराठा समाजाने न्यायालयीन लढाई लढायची? मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढ्याचा मार्ग सुकर करणे केंद्राला सहज शक्य होते. त्यासाठी सर्वंकषपणे बाजू उचलून धरण्याचे निर्देश काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधिर रंजन चौधरी यांना दिले होते. ते पश्चिम बंगालचे खासदार आहेत. पण त्यांनी मराठा आरक्षणाची आणि 50 टक्के आरक्षण मर्यादा शिथिल करण्याची बाजू भक्कमपणे लावून धरली.

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, खासदार प्रतापराव जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनीही मराठा आरक्षणासाठी जोरदार लढा दिला. पण केंद्र सरकारने त्याची गांभिर्याने दखल घेतली नाही. भाजपच्या महाराष्ट्रातील एकाही मराठा खासदाराने याबाबत लोकसभेत चकार शब्द काढू नये, हे महाराष्ट्राचे दुर्दैव असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#मरठ #आरकषण #मळवन #दणयच #मठ #सध #भजपन #गमवल #लकसभत #तर #भजप #खसदर #बलणर #क

RELATED ARTICLES

वेबविश्वात आणखी एक खळबळ! रानबाजारनंतर खुर्चीचं राजकारण; पानसेंची नवी वेबसिरीज भेटीला

मुंबई 1 जुलै: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलाढाली होत आहे. एक ना अनेक अनपेक्षित उलथापालथ सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या सध्याच्या याच पार्श्वभूमीवर...

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

‘E म्हणजे एकनाथ आणि D म्हणजे देवेंद्र हे आमचे ED चे राज्य’

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी पणजी, 1 जुलै : मुंबईत सध्या विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज...

Most Popular

‘रॉकेटरी’ ते ‘शाब्बास मिथू’, जुलै महिन्यात प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी!

July Upcoming Movies: या महिन्यात म्हणजेच जुलैमध्ये बॉलिवूडचे अनेक मोठे चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज होण्यासाठी सज्ज झाले आहेत....

आता Smartphone वर करता येईल कमाई, या Apps चा वापर करुन पैसे कमावण्याची संधी

नवी दिल्ली, 1 जुलै : सध्याच्या काळात इंटरनेट आणि स्मार्टफोन प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग बनला आहे. त्यामुळे जवळपास सर्वच गोष्टी ऑनलाइन करता येतात....

Mumbai Corona Update : मुंबईत शुक्रवारी 978 रुग्णांची नोंद, 1896 कोरोनामुक्त

Mumbai Coronavirus Cases : मुंबईमध्ये मागील काही दिवसांत कोरोना (Corona) रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांचा स्फोट...

VIDEO: विराट कोहली दाखवणार ‘पुष्पा’ अवतार! नेट प्रॅक्टिसवेळी दाखवला ट्रेलर

नवी दिल्ली, 01 जून : भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या एजबॅस्टन कसोटीपूर्वी त्याच्या 'पुष्पा' अवताराचा ट्रेलर दाखवला आहे. त्याने जणू संकेत दिले...

National Doctors’ Day : डॉक्टरांच्या जीवनाची ‘ही’ 4 चक्रे माहित आहेत का? तुमच्या विचारांच्या पलीकडील जग..!

भारत 1 जुलै हा 'नॅशनल डॉक्टर्स डे' (national doctors day) किंवा राष्ट्रीय डॉक्टर्स डे म्हणून साजरा करतो आणि दरवर्षी इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA)...

वसंतराव नाईक यांची जयंती; शेती क्षेत्रातील अमूल्य योगदान, कृषी दिनाचा इतिहास काय?

Maharashtra Krushi Day 2022 : राज्यात दरवर्षी 1 जुलैला राज्यात कृषी दिन साजरा करण्यात येत असून 1 जुलै...