Saturday, August 13, 2022
Home करमणूक 'मन उडु उडु झालं' मालिकेतून हृता दुर्गुळे येणार प्रेक्षकांच्या भेटीला, सोबत असेल...

‘मन उडु उडु झालं’ मालिकेतून हृता दुर्गुळे येणार प्रेक्षकांच्या भेटीला, सोबत असेल अजिंक्य राऊत


मुंबई: ‘फुलपाखरू’ मालिकेमुळे अभिनेत्री हृता दुर्गुळे घराघरात लोकप्रिय झाली. विशेष करून युवा वर्गामध्ये हृता खूपच प्रसिद्ध आहे. हृताच्या गोडवा, तिचे लाघवी हसणे सर्वांना वेड लावते. फुलपाखरू मालिकेत हृताने साकारलेल्या वैदेही या भूमिकेमुळे ती तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनली होती. ही मालिका बंद झाल्यामुळे हृता आता दिसणार नाही म्हणून अनेक चाहते नाराजही झाले होते. मात्र, हृता पुन्हा एकदा नवीन मालिकेत झळकणार आहे.

झी मराठीवरील अनेक जुन्या मालिका आता अखेरच्या टप्प्यावर येऊन पोहोचल्या आहेत. त्यांची जागी आता नवीन मालिका सुरू होत आहे. झी मराठीवरून एकापाठोपाठ एक अशा पाच मालिका नवीन मालिका प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी दाखल होत आहेत. त्यातील एक मालिका म्हणजे ‘मन उडु उडु झालं’ या मालिकेतून तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेली हृता दुर्गुळे पुन्हा एकदा दिसणार आहे. या मालिकेचा एक प्रोमो नुकताच रिलीज झाला. ही मालिका ३० ऑगस्ट पासून संध्याकाळी ७.३० वाजता प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे.


‘मन उडु उडु झालं’ ही एक रोमँटिक मालिका असणार आहे. मालिकेत हृतासोबत ‘विठूमाऊली’ फेम अभिनेता अजिंक्य राऊत असणार आहे. अजिंक्य आणि हृता पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. या फ्रेश जोडीची केमिस्ट्री कशी असले हे पाहण्यासाठी आता चाहते उत्सुक आहेत.


प्रोमोमध्ये हृता अगदी सिंपल लुकमध्ये दिसून येतं आहे. अथर्व आणि हृता रेल्वे स्टेशनवर एकमेकांसमोर येतात. हिरो तेथे एकाला मारपीट करत असतो. मात्र हृताला पाहताच तो त्या व्यक्तीला चक्क सोडून देतो आणि हिरोईनला पाहताक्षणी तिच्या प्रेमात पडतो, असा हा प्रोमो आहे. आता मालिकेची नेमकी कथा काय असणार याबद्दल चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. या मालिकेबद्दल हृता देखील खूपच उत्सुक आहे. तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर झी मराठीला टॅग करत ‘पुन्हा घरी आल्यासारखं वाटतंय’ असे लिहून हार्टचं इमोजी पोस्ट केला आहे.

AssignmentImage-1710605887-1628061041

हृताने अभिनयाच्या क्षेत्रात आठ वर्षे पूर्ण केली आहेत. हृताची पहिली मालिका होती दुर्वा. हृताला खरी लोकप्रियता मिळाली ती फुलपाखरू मधील वैदेहीमुळे. या मालिकेत हृता आणि यशोमन आपटे यांची जोडी खूपच गाजली होती. ही मालिका संपल्यानंतर ‘दादा एक गुड न्यूज आहे’ या नाटकात तिने उमेश कामतसोबत काम केले होते. त्याशिवाय सिगिंग स्टार या कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही केले होते. आता पुन्हा एकदा ‘मन उडु उडु झालं’ या मालिकेतून पुन्हा एकदा छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#मन #उड #उड #झल #मलकतन #हत #दरगळ #यणर #परकषकचय #भटल #सबत #असल #अजकय #रऊत

RELATED ARTICLES

देशपांडे सिस्टर्समध्ये कोण आहे चप्पलचोर; गौतमी मृण्मयीचा नवा व्हिडिओ VIRAL

मुंबई 12 ऑगस्ट: मराठीमध्ये सध्या दोन बहिणी धुमाकूळ घालत असतात त्या म्हणजे मृण्मयी आणि गौतमी देशपांडे. या दोघी गेले अनेक दिवस धमाकेदार व्हिडिओच्या...

13th August 2022 Important Events : 13 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

13th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. याचबरोबर श्रावण महिन्यालाही सुरुवात झाली आहे. श्रावण...

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

Most Popular

वाढदिवस साजरा करण्यासाठी जॅकलिन फर्नांडिस थेट पोहोचली कामाख्या देवीच्या दर्शनाला

मुंबई, 11 ऑगस्ट : बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे जॅकलिन फर्नांडिस. तिने तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने अनेकांची मने जिंकली आहेत.  ती...

कोयना धरणाचे 6 वक्री दरवाजे दीड फुटांनी उचलले, 10 हजार 100 क्युसेकने नदीत पाण्याचा विसर्ग 

Koyna Dam : कोयना धरणाची पाणीपातळी 2 हजार 147 फुटांवर गेली असून एकूण पाणीसाठा 85.31 टीएमसी झाला आहे....

तुम्हालाही माठातील थंडगार पाणी प्यायची सवय आहे? मग ‘या’ गोष्टींची घ्या खबरदारी

मुंबई, 12 ऑगस्ट: उन्हाळ्यात माठातलं पाणी पिणं शरीरासाठी उत्तम असतं. फक्त उन्हाळ्यातच नाही, तर एरव्हीही माठातलं पाणी प्यावं. त्याचे अनेक फायदे आहेत. हे...

Kolhapur Rain : पंचगंगेची पाणी पातळी स्थिर असल्याने दिलासा, राधानगरी धरणाचा एक दरवाजा बंद 

<p style="text-align: justify;"><strong>Kolhapur Rain Update :</strong> गेल्या 48 तासांमध्ये कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाने उघडीप दिली आहे. गेल्या 24 तासांमध्ये पंचगंगेची पातळी स्थिर असल्याने...

अनन्या पांडेचा छोटाश्या फ्रॉकमधील हॉट लुक

अनन्या पांडेने (Ananya panday) इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री घेतल्यापासून आपल्या लुक्सवर खूप जास्त मेहनत घेतली आहे. जेव्हा तिने आपल्या पहिल्या चित्रपटातून पदार्पण केले तेव्हा...