Saturday, August 13, 2022
Home मुख्य बातम्या मनसुख हिरेणची हत्या करण्यासाठी आरोपींच्या खात्यात टाकले 45 लाख रूपये

मनसुख हिरेणची हत्या करण्यासाठी आरोपींच्या खात्यात टाकले 45 लाख रूपये


मुंबई : मनसुख हिरेनची हत्या करण्यासाठी आरोपींच्या खात्यात 45 लाख रूपये जमा करण्यात आले होते. मात्र हे पैसे कोणी दिले होते?, याचा तपास करणं अजून बाकी आहे. त्यामुळे याप्रकरणी आरोरपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी राष्ट्रीय तपासयंत्रणा एनआयएच्यावतीनं मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टात करण्यात आली. एनआयएनं कोर्टाकडे आणखीन 30 दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. 

यापूर्वी विशेष एनआयए कोर्टानं तपासयंत्रणेला 9 जून रोजी आरोपपत्र दाखल करण्यासाठी 2 महिन्यांची मुदतवाढ दिली होती. याप्रकरणी एपीआय सचिन वाझे, एन्काऊंटर फेम प्रदीप शर्मासह अन्य काही पोलीस अधिकारी आणि इतरांना एनआयएनं अटक केली आहे.

जगप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या दक्षिण मुंबईतील निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली एक स्कॉर्पिओ गाडी सोडण्यात आली. त्या गाडीचा मालक मनसुख हिरेन याच्या अचानक मृत्यूनंतर हे प्रकरण खूप गाजलं. त्यानंतर एनआयएनं याप्रकरणाची सारी सुत्र आपल्या हाती घेत मुंबई पोलिसांच्या गुन्हे गुप्तचर शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक केली होती. त्यानंतर हा तपासात नवनवी माहिती समोर येत गेली आणि एकापाठोपाठ एक मोठे खुलासे होत गेले. या प्रकरणात अटक करण्यात आलेली सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

संबंधित बातम्या :

Mansukh Hiren Murder Case : मनसुख हिरण हत्या प्रकरणातील मुख्य दुवे जोडण्यात NIA ला यशअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#मनसख #हरणच #हतय #करणयसठ #आरपचय #खतयत #टकल #लख #रपय

RELATED ARTICLES

देशपांडे सिस्टर्समध्ये कोण आहे चप्पलचोर; गौतमी मृण्मयीचा नवा व्हिडिओ VIRAL

मुंबई 12 ऑगस्ट: मराठीमध्ये सध्या दोन बहिणी धुमाकूळ घालत असतात त्या म्हणजे मृण्मयी आणि गौतमी देशपांडे. या दोघी गेले अनेक दिवस धमाकेदार व्हिडिओच्या...

13th August 2022 Important Events : 13 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

13th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. याचबरोबर श्रावण महिन्यालाही सुरुवात झाली आहे. श्रावण...

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

Most Popular

अनुष्काचा सिनेमा १५ वेळा पाहिला, डोक्यात एकच खूळ, शेवटी २० लीटर पेट्रोल अंगावर ओतून पेटवलं

बंगळुरु: साऊथची सुपरस्टार अभिनेत्री अनुष्का शेट्टीचा अरुंधती हा चित्रपट पाहून एका २३ वर्षीय तरुणाने अत्यंत भयानक पद्धतीने आत्महत्या केली आहे. ही घटना कर्नाटकातील...

कोयना धरणाचे 6 वक्री दरवाजे दीड फुटांनी उचलले, 10 हजार 100 क्युसेकने नदीत पाण्याचा विसर्ग 

Koyna Dam : कोयना धरणाची पाणीपातळी 2 हजार 147 फुटांवर गेली असून एकूण पाणीसाठा 85.31 टीएमसी झाला आहे....

काहींचे डोळे तपकिरी तर काहींचे निळे का असतात? डोळ्याच्या रंगामागचे संपूर्ण सायन्स समजून घ्या

मुंबई : आपण जेव्हाही एखाद्या नवीन व्यक्तीला भेटतो, तेव्हा आपण त्याचा चेहरा नीट पाहातो, जेणेकरुन आपल्याला त्याचा चेहरा लक्षात राहिल. एवढेच काय तर...

Health : ऋतु कोणताही असो, निरोगी आरोग्यासाठी मुलांच्या आहारात या गोष्टी हव्याच

नवी दिल्ली, 12 ऑगस्ट : लहान मुलांना सकस आहार खायला घालणे, हे एक आव्हान आहे. मुलांचा आहार फक्त आरोग्यदायी नव्हे तर चविष्टही असावा,...

अशी कोणती कागदपत्रं ट्रम्पकडे आहेत, ज्यामुळे FBI घरापर्यंत पोहचली; अमेरिका हादरली

Donald Trump: अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवासस्थानी FBIने टाकलेले छापे कशासाठी होते या संदर्भात एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. अस्वीकरण: ही...

Ukraine Russia War : युक्रेनमधील पॉवर प्लांटजवळ रशियाचा हल्ला, भारताचं संयम राखण्याचं आवाहन

Ukraine Russia Conflict : युक्रेनमधील झापोरिझ्झ्या अणू ऊर्जा प्रकल्पाजवळ रशियाकडून हल्ले सुरु आहेत. झापोरिझ्झ्या अणू ऊर्जा प्रकल्प (...