Saturday, July 2, 2022
Home लाईफस्टाईल मजबूत हाडांसाठी रोजच्या आहारात 'या' तीन पदार्थांचा समावेश करा

मजबूत हाडांसाठी रोजच्या आहारात ‘या’ तीन पदार्थांचा समावेश करा


Bones Health : वाढत्या वयानुसार हाडांची झीज होते. तसेच हाडांच्या कमकुवतपणामुळे शरीर पोकळ होते आणि हाडे मजबूत होण्यासाठी कॅल्शियमसोबतच इतर अनेक पोषक तत्वांचीही गरज असते. यासाठी योग्य वयात हाडांची काळजी घेणे गरजेचे आहे. या ठिकाणी आम्ही तुम्हाला तीन काही खास पदार्थांबद्दल सांगणार आहोत. जे पूर्णपणे शाकाहारी आहेत. तसेच तुमची हाडे मजबूत करण्यासाठी त्यांचा विशेष वापर केला जाऊ शकतो. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकजण ते आरामात घेऊ शकतात. याबरोबरच नवजात बाळाल ज्म देणाऱ्या महिलांमध्ये सुद्धा कॅल्शिअमची कमतरता जावते. ते देखील या पदार्थांचा वापर करू शकतात.   

तीळ खा :

तिळाचा वापर आपल्या घरात खूप केला जातो. तीळ सहसा हिवाळ्यात वापरले जातात. सामान्यतः मिठाई, लाडू इत्यादींमध्ये तीळ खाल्ले जाते. तीळ खूप उष्ण असतात, त्यामुळे हिवाळ्यात ते जास्त खाल्ले जातात, परंतु, उन्हाळ्यात हाडे मजबूत करण्यासाठी आणि गरज पडल्यास मर्यादित प्रमाणात खाऊ शकता. जेव्हा तुम्ही तिळाचे सेवन करता तेव्हा रोजच्या आहारात दुधाचा अवश्य समावेश करा. तिळात कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असतात.

हिरव्या शेंगा खा :

हिरव्या शेंगा, ड्रमस्टिक शेंगा, गवार शेंगा, सुंदरी शेंगा, शेव शेंगा इत्यादी अशा शेंगा आहेत. ज्यामध्ये हाडांना पुरवणारे अनुकूल पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात. यामध्ये मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळतात. जे हाडांचे पोषण करतात आणि त्यांना आतून मजबूत करतात. दिवसाच्या एका जेवणात तुम्ही दररोज काही शेंगा खाल्ल्या तरी फायदा होईल. 

नाचणी खा : 

नाचणीच्या दाण्यांमध्ये कॅल्शियम भरपूर असते. ज्या महिला मुलांना दूध पाजत आहेत आणि ज्यांना पाठदुखीची समस्या आहे त्यांनी नाचणीचे सेवन केले पाहिजे. या दाण्यांचे नियमित सेवन केल्याने तुमच्या मुलाचे पोषणही होईल आणि हाडेही मजबूत होतील. 

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या : अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#मजबत #हडसठ #रजचय #आहरत #य #तन #पदरथच #समवश #कर

RELATED ARTICLES

Sanjay Kute on BJP Politics : देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्याच बेबनाव? ABP Majha

<p>शिवसेनेच्या बंडखोरीत आमदारांसोबत सातत्यानं दिसले ते भाजपचे संजय कुटे.... &nbsp;सुरतपासून शिवसेनेच्या आमदारांसोबत असलेल्या संजय कुटेंनी एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत दिलीए... संजय कुटे हे...

अभिनेता संतोष जुवेकरच्या FBपेजवर अश्लील फोटो; अभिनेत्यानं दिलं स्पष्टीकरण

मुंबई, 2 जुलै : सध्या सोशल मीडिया (Social media) हा जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. त्यामुळे आपण प्रत्येक गोष्ट सोशल माध्यमांवर शेअर...

टीम इंडियाच्या संकटमोचनचा खुलासा; इंग्लंडमध्ये विजयाचे उलगडलं रहस्य

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यात बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन येथे पाचवी आणि निर्णायक कसोटी खेळली जात आहे. भारतीय संघाचा पहिला डाव ४१६ धावांत गुंडाळला....

Most Popular

Todays Headline 2nd July : आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या

मुंबई : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम...

VIDEO: संयमी द्रविडचं हे रूप पाहिलं नसेल, पंतच्या शतकानंतर केलं असं सेलिब्रेशन

नवी दिल्ली, 02 जून : भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 व्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी ऋषभ पंतने एजबॅस्टन येथे 'वन मॅन शो' कामगिरी...

Flipkart वर सुरूये खास सेल, अवघ्या ७९ रुपयात मिळेल वस्तू; ८० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट उपलब्ध

नवी दिल्ली :Flipkart Big Bachat Dhamaal Sale: Flipkart वर बिग बचत धमाल सेल सुरू आहे. १ जुलैपासून सुरू झालेला हा सेल ३ जुलैपर्यंत...

Best Plan: ‘या’ प्लानने उडविली Jio ची झोप, वर्षभराच्या व्हॅलिडिटीसह ९१२ GB डेटा आणि फ्री Hotstar सह मिळताहेत हे बेनिफिट्स

नवी दिल्ली: Best Airtel Plans: Airtel ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपन्यांपैकी एक आहे. Reliance Jio नंतर, Airtel ही एकमेव कंपनी आहे. ज्याचा...

Health Tips : जास्त जांभूळ खात असाल तर वेळीच सावध व्हा; अन्यथा…

जांभळाचे जास्त सेवन केल्याने बद्धकोष्ठता होऊ शकते. वास्तविक, यामध्ये फायबरचे प्रमाण खूप जास्त असते, अशा परिस्थितीत त्याचे जास्त सेवन करणे बद्धकोष्ठतेचे कारण असू...