उदय सामंत यांची प्रतिक्रिया
“गेले कित्येक दिवस मंत्रालयांच्या समोरचे बंगले आणि त्यांचे नावं ही गडकिल्यांची असावी यासाठी शिवप्रेमी संघटना आणि शिवप्रेमी प्रयत्न करत होते. याच पार्श्वभूमीवर मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेतली होती. मला सांगताना आनंद होतोय की, आजपासून सर्व मंत्र्यांची बंगले ही गड-किल्ल्यांच्या नावाने ओळखली जातील. उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नावं बदलण्याचा निर्णय सरकारने घेतला. याबद्दल मी सरकारचं अभिनंदन करतो. शिवप्रेमींची मागणी मान्य झाली त्याबद्दल समाधान व्यक्त करतो”, असं उदय सामंत यांनी सांगितलं.
हेही वाचा : आई-वडिलांसाठी खंबीरपणे उभी राहिली मैथिली; लेकीची माया पाहून हृदय पिळवटून निघेल
मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्याचंही नाव बदलणार?
राज्य सरकारने मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानांना गड आणि किल्यांचे नाव देण्याचं ठरविल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्याचंही नाव बदलणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नामांतर केलेल्या बंगल्यांमध्ये मलबार हिल परिसरात असणाऱ्या बंगल्यांचा समावेश नाही. मलबार हिलच्या बंगल्यांबाबत कदाचित विचार केला जाण्याची शक्यता आहे. पण आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार मंत्रालयासमोरील मंत्र्यांच्या बंगल्यांचं नामांतरण करण्यात आलं आहे.
Published by:Chetan Patil
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#मतरयचय #बगलयन #आत #गडकललयच #नव #वरष #बगलयचह #नव #बदलणर